मुंबई: भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दिशा सालियन प्रकरणाची कधीच चौकशी केली नसल्याचा सीबीआयने दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पोहोचली. राहुल गांधी आज राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेणार. त्यानंतर पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीचंही दर्शन घेणार. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
लोणावळ्यात गेल्या दोन तासांपासून वाहतूक कोंडी जैसे-थै
बेशिस्त वाहनचालकांमुळे मोठी वाहतूक कोंडी
स्थानिकही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करताहेत
लोणावळा ग्रामीण पोलीस वाहतूक कोंडी सोडवणार केव्हा?
राज्यात सर्व शासकीय कार्यालयात मास्कसक्ती होणार असल्याची माहिती
मुंबई, नागपूर , पुणे , औरंगाबाद यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये मास्कबंदी
सरकारी कार्यालयामध्ये मास वापर बंधनकारक होणार असल्याची माहिती
चीनमध्ये कोवीडचा वाढत असल्याने राज्य सरकार कोविडबाबत ठोस पावले उचलण्याच्या तयारीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता
पुण्यातील सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील धक्कादायक घटना
कचरा डेपोच्या बाजूला सर्रास होत आहे सरकारी वाहनातून डिझेल चोरी
अधिकाऱ्याच्या संगनमताने प्रकार चालू असल्याची स्थानिकांची माहिती
सविस्तर चौकशी करण्याचे पुणे महानगरपालिकेचे आदेश
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात भाजपचा कोण उमेदवार असणार?
निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपची मागणी
घरातील उमेदवार दिला तरच निवडणूक बिनविरोध होणार, काँग्रेसचा दावा
अंधेरी आणि कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिला होता
त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महाविकास आघाडी निर्णय घेणार
मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांना भाजप उमेदवारी देण्याची शक्यता
शिंदे सरकार विरोधात घोषणाबाजी करीत बोंब मारो आंदोलन केले
उस्मानाबाद शहरातील 30 कोटी रुपयांच्या विकास कामाला शिंदे-फडणवीस सरकारने दिली स्थगिती दिलीय
स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे गटाचे उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु आहे आमरण उपोषण
प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याने शिवसैनिक आक्रमक, आज झोपा काढो आंदोलन करणार
औरंगाबाद शहरात आज महास्वच्छता अभियान
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड स्वच्छता अभियानात सहभागी
डॉ. भागवत कराड यांनीही हातात झाडू घेऊन केली शहरात साफसफाई
सिडको परिसरात डॉ. भागवत कराड यांनी केली साफसफाई
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
ख्रिसमस नात्याच्या सुट्टीमुळे अंबाबाई मंदिर मध्ये भाविकांची अलोट गर्दी
अंबाबाई मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना मास्क घालण्याचे देवस्थान प्रशासनाकडून केले आवाहन
औरंगाबाद जिल्ह्यातील कचनेर इथल्या जैन मंदिरातून सोन्याची मूर्ती चोरीला
सोन्याच्या मूर्तीच्या जागी दुसरी मूर्ती ठेवून सोन्याची मूर्ती चोरीला गेली
सोन्याची मूर्ती चोरला गेल्याचा प्रकार शनिवारी दुपारी उघड झाला
जैन मंदिरातूनच सोन्याची मूर्ती चोरीला गेल्यामुळे खळबळ
औरंगाबाद जिल्ह्यातील कचनेरजैन मंदिर सर्वात प्रसिद्ध मंदिर
राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्याकडून वाजपेयींना अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वाजपेयींना अभिवादन
दिल्लीतील अटल समाधी स्थळावर दिग्गज नेत्यांची हजेरी
नव्या दराविरोधात भाजी विक्रेते आक्रमक, नवीन दर लागू करू नये, विक्रेत्यांची मागणी
अगोदर गाळाधारकांना दिवसाला 35 रुपये मोजावे लागायचे आता 50 रुपये द्यावे लागणार आहेत
तर अनधिकृत दुकानांना अगोदर प्रतिदिवस 35 रुपये होते, आता 2000 रुपये प्रतिमहा द्यावे लागणार आहेत
येत्या 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाचं आयोजन
जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता
सिंदखेडराजा इथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त लाखो शिवप्रेमी येत असतात
यंदा उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे
कांदिवली पश्चिम पोलीस वसाहतीत आज सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी बंद झाल्यामुळे लोक त्रस्त
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 10 नंतर या भागात पाणी येणार आहे
3 किलोमीटर 5 किलोमीटर 8 किलोमीटर आणि 21 किलोमीटर पर्यंतच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे
राज्यभरातील एकूण 1800 पेक्षा अधिक स्पर्धकांनी या मॅरेथॉन मध्ये घेतला सहभाग
पाच लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट
अजय मोरे पुण्याचे नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी
विजय देशमुख यांची बदली करण्यात आली
देशमुख यांच्या जागी आता अजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
काल त्यांनी पदभार स्विकारला
मोबाईल आणि खर्राप्रकरणी तीन कैद्यांची चौकशी
कारागृहाच्या भिंतीजवळून भंडारा- तुमसर रस्ता जात असल्याने त्या रस्त्यावरुन ही बॉटल कुणीतरी फेकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे
तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल
आता भंडारा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत
पर्यटनाबाबत माहिती देणारे आणि दिशा दाखवणारे फलक
वनविभाग आणि गुंजवणे वन कमिटीने लावले फलक
रात्रीअपरात्री गडावर येणाऱ्या पर्यटकांना दिशादर्शक फलकांचा होणार फायदा
चर्चमध्ये येशू जन्माचा देखावा उभारण्यात आलाय
मध्यरात्री या चर्चमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे
मुख्य प्रार्थनेनंतर ख्रिस्ती बांधव एकमेकांना केक आणि मिठाई देऊन शुभेच्छा देणार आहेत
31 डिसेंबरचे वेध लागल्यामुळे पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत
यातच विकेंडमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवरती निसर्गाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत
दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी
मुरुड आणि दापोली तालुक्यातील वातावरण पर्यटकांना भुरळ पाडत असतं यामुळेच पर्यटक या भागात मोठ्या संख्येने असतात
वालीव पोलिसांनी केली शीजान खानला अटक
तुनिषाची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून शीजान खान यांच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात भादंवि 306 अन्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला