Maharashtra Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाने फुटपाथवर फेरीवाल्यांच्या प्रश्नावर सुनावले महापालिकेला खडेबोल
Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार असून ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर तुर्कीत भूकंपामुळे दगावलेल्यांची संख्या 7 हजारावर पोहोचली आहे. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
मुंबई उच्च न्यायालयाने फुटपाथवर फेरीवाल्यांच्या प्रश्नावर सुनावले महापालिकेला खडेबोल
मुंबई :
मुंबई उच्च न्यायालयाने फुटपाथवर फेरीवाल्यांच्या प्रश्नावर सुनावले महापालिकेला खडेबोल
फुटपाथवर फेरीवाल्यांना दुकानं थाटण्याची परवानगी देत पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालू नका
वरळीतील टिळक रुग्णालयाबाहेर फुटपाथवर 11 दुकानांना परवानगी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा
मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिका प्रशासनाला निर्देश, रूग्णालय चालवणा-या संस्थेची उच्च न्यायालयात याचिका
फुटपाथवर पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षित मार्ग देऊन वाहतूक सुरळीत पार पाडणं हा उद्देश असतो
मात्र महानगरपालिकांकडून पदपथांवर दुकाने थाटण्यास परवानगी दिली जात असेल तर हे फुटपाथचा मूळ उद्देशच नष्ट करण्यासारखं आहे
अशी खंत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या परवानगीचा फेरविचार करण्याचा दिला महापालिकेला निर्देश
फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालणाऱ्यांसाठी असतात व्यवसाय करणाऱ्यांसाठी नाही, असं खडेबोल हायकोर्टानं पालिकेला सुनावलेत.
न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती एम. डब्ल्यू. चंदवानी यांच्या खंडपीठाचा मुंबई महापालिकेला निर्देश
‘द बॉम्बे मदर्स अँड चिल्ड्रन वेलफेअर सोसायटी’नं हायकोर्टात केली आहे याचिका
-
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचं पदकांचं शतक
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रकडून पदकांची लयलूट
110 पदके जिंकून महाराष्ट्र स्पर्धेत अव्वलस्थानी
मध्यप्रदेशमधील 5व्या सत्रातील खेलो इंडिया स्पर्धेत पदकांचे शतक पूर्ण
39 सुवर्ण, 38 रौप्य आणि 33 कांस्य पदके अशी एकूण 110 पदकं
-
-
सुकेश चंद्रशेखर प्रकरणी ईडीकडून दिल्ली तुरुंगातील तीन अधिकाऱ्यांना अटक
डीएस मीना, महेंद्र सुंदरिया आणि सुंदर बोहरा यांना अटक
तिघांना 6 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आलं
-
केरळमधील कोझिकोडे इथल्या ट्रान्सजेंडर कपलच्या आयुष्यात बाळाचं आगमन
ट्रान्स मॅन जहादने मुलाला दिला जन्म
जहादची पार्टनर झियाने व्यक्त केला आनंद
Kozhikode, Kerala | Transgender couple Ziya & Zahad blessed with a baby today; Zahad, a trans man was carrying the child & gave birth
Zahad’s partner, Ziya says, “Happiest day of my life. I got several messages that pained me,it’s a reply to them.I thank all those who supported” pic.twitter.com/OTtEEGSgXp
— ANI (@ANI) February 8, 2023
-
भूकंपग्रस्त तुर्कीच्या दुर्गम भागात 1 भारतीय बेपत्ता, 10 जण अडकले
अडकलेले 10 भारतीय सुरक्षित
कामानिमित्त तुर्कीला गेलेला एक भारतीय बेपत्ता
गेल्या दोन दिवसांपासून त्या भारतीयाचा लागला नाही शोध
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती
-
-
एटीएममधून नोटाच नाही तर येणार चिल्लर
पथदर्शी प्रकल्पाला लवकरच मुहूर्त
वेंडिंग मशीनवर युपीआय द्वारे निघणार चिल्लर
देशातील इतक्या शहरांत सुरु होणार सेवा, वाचा बातमी
-
मी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर काही वक्तव्य केलं का? अजित पवार यांचा सवाल
अजित पवार यांच्या मुलाखतीतील मुद्दे :
मी सत्यजीत तांबे सारखाच तरुण असताना राजकारणात आलो. मी वयाच्या तिसाव्या वर्षी आमदार झालो. त्यामुळे तरुण राजकारणात पुढे आले पाहिजेत. मग ते कोणत्याही पक्षाचे असूद्या. मी वडिलकीच्या नात्याने सल्ला दिला की, विचार करुन निर्णय घे. यात चुकलं काय?
मी राजकारण, समाजकारणात काम करतो. कोणत्याही तरुणाने सल्ला विचारला तर त्याला सल्ला देणार. सत्यजीतला काय वाईट सांगितलं? सत्यजीत तुला संधी मिळाली आहे. ती संधी पाहता पुढची पाऊलं विचारपूर्वक टाक. तुझं भविष्य उज्ज्वल आहे, असं मी म्हणालो.
मी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर काही वक्तव्य केलं का? आम्ही महाविकास आघाडीत आहोत. मविआतील प्रमुख आमच्यापैकी काही बोललं तर मी सांगतो, आम्ही सर्व एकत्र असल्यावर उत्तर देतो. त्यांनी काहीतरी बोलायतं आणि मी त्यावर काही बोलायचं. मला काही एवढाच धंदा नाहीय.
कुणी माझ्याबद्दल बोललं आणि ते आमच्या महाविकास आघाडीतलं असेल तर मी त्या संदर्भात आधी आमच्या प्रमुखांच्या बैठकीत काय झालं, नेमकं कशामुळ झालं, याविषयी चर्चा करतो. शेवटी आघाडी टिकली पाहिजे. या आघाडीत समस्या निर्माण करायची नाही.
-
‘बाळासाहेब थोरातांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला तेव्हा त्यांनी राजीनाम्याचं सांगितलं’
अजित पवार यांच्या मुलाखतीमधील मुद्दे, पवार काय-काय म्हणाले?
आता तो चॅप्टर जवळपास संपलेला आहे. त्यावर खूप काही चर्चा झालेली आहे. सुदैवाने ते निवडून आलेले आहेत. त्यांना यश मिळालं आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडली आहे.
मी आज एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे ज्या गोष्टी झाल्या आहेत त्यावर पुन्हा चर्चा करण्यात, कारण माझ्याकडून काही स्टेटमेंट केलं गेलं आणि त्याला आरेला कारे होणार. त्यामुळे आता त्यावर फार काही बोलायची गरज नाही.
बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याशी माझा काय संबंध? तो त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. ते आम्हाला सिनीयर आहेत. बाळासाहेब 1985 ला आमदार झाले. ते अनेक वर्ष पक्षासाठी काम करत आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या काँग्रेसमध्ये काम करत आल्या आहेत. मी त्यांना कालही शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्यांचे पक्षातील वरिष्ठ येतील आणि चर्चा करतील.
बाळासाहेबांचा वाढदिवस होता. मी वाढदिवसाला सर्वपक्षीय नेत्यांना फोन करुन शुभेच्छा देतो. मी माणुसकी आणि महाराष्ट्राची परंपरा म्हणून वाढदिवसाचा फोन केला होता. फोन करण्याआधी मी सकाळच्या वृत्तपत्रातील बातम्या वाचल्या होत्या. त्यावेळी मी वाढदिवसाच्या निमित्ताने बोललो की मला तुम्हाला जास्त विचारायचं नाही. पण ते म्हणाले मी राजीनामा दिला. एवढेच ते बोलले. त्यानंतर मी दुपारी फॉर्म भरायला गेलो. त्यांनी शुभेच्छा देताना राजीनाम्याचं सांगितलं. मी ते सांगणारच ना!
-
तुम्ही दुसऱ्यांच्या घरातली भांडं चव्हाट्यावर आणतात? अजित पवार म्हणतात…
अजित पवार यांची टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत, सत्यजीत तांबे प्रकरणावर मांडली भूमिका
दुसऱ्यांच्या घरातली भांडं चव्हाट्यावर आणतात?
दुसऱ्यांच्या घरातील भांडणं? म्हणजे आता जे घडलं त्याच्यामुळे? मी जे वस्तुस्थिती ते सांगत असतो. वस्तुस्थिती सांगितल्यावर कुणाची भांडणं चव्हाट्यावर आणणं, असा अर्थ कसा काढला जातो? मला कुणी प्रश्न विचारला आणि मला त्याबद्दल माहिती असेल तर मी माहिती सांगतो. त्यामध्ये कुणाची भांडणं चव्हाट्यावर आणण्यासाठी आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत नाही. आमचे विरोधक त्या अँगलने बघत असतील तर मला काही म्हणायचं नाही.
-
‘वंदे भारत एक्सप्रेसचे 10 फेब्रुवारीला उद्घाटन होणार’, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांची प्रतिक्रिया
सोलापूर :
– वंदे भारत एक्सप्रेसचे 10 फेब्रुवारीला उद्घाटन होणार
– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याला हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे सुरु होणार आहे
– ‘वंदे भारत एक्सप्रेससाठी मी 2020 पासून पाठपुरावा केला’, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांची प्रतिक्रिया
– ‘वंदे भारत एक्सप्रेस सोलापुरातून दररोज सकाळी 6 : 05 वाजता मुंबईकडे निघेल’
– ‘मुंबईतून सोलापूरसाठी सायंकाळी रोज 4 वाजता ती सुटणार आहे’
– ‘मात्र आम्ही ही ट्रेन 4 ऐवजी आणखी उशिरा सुटावी अशी मागणी करत आहोत’
– ‘वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर कमी करावेत अशी मागणी आम्ही रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे’
– ‘त्याचबरोबर वंदे भारत एक्सप्रेस सुरळीत सुरू झाल्यानंतर त्याचे थांबे कमी करावी अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे’
-
रेपो दर वाढीचा असा होऊ शकतो फायदा
रेपो रेट वाढल्याने ईएमआयचा भार पडणार
बँका लवकरच व्याज दरात वृद्धी करण्याची शक्यता
मुदत ठेव योजनेवर होऊ शकतो फायदा, वाचा सविस्तर
-
आयसीसी टी 20 रँकिगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा वरचष्मा
आयसीसीकडून टी 20 रँकिंग जाहीर
टी 20 रँकिंगमध्ये टीम इंडियाचे 3 खेळाडूंचा बोलबाला
बॅट्समन शुबमन गिल, बॉलर मोहम्मद सिराज आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्याचा धमाका
हार्दिक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर
शुबमन गिल याची 168 स्थानांची मोठी झेप
तर अर्शदीप सिंह गोलंदाजांच्या यादीत 13 व्या स्थानी
बातमीची लिंक : ICC T20 Rankings | टीम इंडियाच्या त्रिमुर्तींचा धमाका, एका झटक्यातच ‘या’ स्टार खेळाडूची गरुडझेप
-
IND vs AUS : पहिल्या टेस्टआधी राहुल द्रविड यांनी मुंबईकडून खेळलेल्या एका स्पेशल बॉलरला नागपूरला बोलावलं
IND vs AUS : राहुल द्रविड यांना मुंबईच्या त्या बॉलरची गरज का लागली? वाचा सविस्तर….
-
खिल्ली, शेरोशायरी आणि टोमणे, पंतप्रधान मोदी यांचं लोकसभेत खतरनाक भाषण
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे :
“इथे सर्व सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. प्रत्येकाने आपापले आकडे आणि तर्क दिले.आणि आपल्यातील वृत्ती, प्रवृत्तीनुसार आपलं म्हणणं मांडलं”, असं मोदी म्हणाले.
“आता या गोष्टींना समजण्याचा आम्ही प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की, कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आहे, तसेच कुणाची किती समज आहे आणि कुणाचा काय इरादा आहे. हे सगळं आता सपष्ट होतंच आहे”, असा टोला त्यांनी लगावला.
“मी चर्चेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करतो. पण मी पाहत होतो काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इको सिस्टीम, समर्थक उड्या मारत होते”, असा चिमटा मोदींनी काढला.
“काही लोक खूष होऊन बोलू लागले की, ये होईना बात! त्यांना झोपही चांगली लागली होती. कदाचित आज ते झोपेतून उठलेही नसतील. आणि अशा लोकांना खूप चांगल्याप्रकारे बोलण्यात आलं आहे की, ये कह कहकर हम, दिल को बहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है”, अशा शेरो शायरीत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
“राष्ट्रपतीचं भाषण सुरु होतं तेव्हा एका बडा नेत्याने महामहीम राष्ट्रपतींचा अपमान केला. आमच्या समाजाप्रती त्यांचे विचार काय होते, त्यांच्या मनात द्वेषाची जी भावना होती ते समोर आली”, असा दावा मोदींनी केला.
ठिक आहे नंतर चिठ्ठी लिहून वाचण्याचा प्रयत्न केला गेला, असंही ते यावेळी म्हणाले.
“राष्ट्रपतींच्या भाषणावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली. मी सगळ्यांचं बोलणं ऐकलं. राष्ट्रपतींच्या भाषणावर कुणालाही आक्षेप नाही. त्यांना राष्ट्रपतींचे सर्व मुद्दे पटले आहेत”, असं मोदी म्हणाले.
“राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणातून आम्हाला सगळ्यांना आणि कोट्यवधी नागरिकांना मार्गदर्शन केलं आहे. त्यांची उपस्थिती ऐतिहासिक आहे. राष्ट्रपतींनी आदिवासी समाजाचा गौरव वाढवला आहे”, असं मोदी म्हणाले.
“देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले तरी आदिवासी समाजाचा जो गौरव झालाय, त्यांचा जो आत्मविश्वास वाढला आहे, त्यासाठी हे सभागृह आणि देश आभारी आहे. राष्ट्रपतींच्या भाषणात संकल्पापासून ते सिद्धीपर्यंतच्या यात्रेचा प्रवास खूप चांगल्या प्रकारे मांडण्यात आला आहे. त्यातून देशाला प्रोत्साहन मिळालं आहे”, असंदेखील मोदी म्हणाले.
-
आजच्या सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण
विक्रम केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत लवचिकता
चांदीच्या किंमतींत आज थोडीशी घट
वायदे बाजारात, सराफा बाजारात किंमती घसरल्या, वाचा बातमी
-
Mumbai News Live | राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला न्यायालयीन कोठडी
अंधेरी कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी
ओशिवरा पोलिसांनी मंगळवारी आदिलला केली होती अटक
राखीनेच आदिलविरोधात दाखल केली होती तक्रार
राखीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दाखल केली FIR
-
कसब्यात संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवणारचं
पुणे : संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते कसब्याच्या रिंगणात,
ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडची युती असूनही निवडणूकीच्या रिंगणात,
उद्या प्रचाराचा फुटणार नारळ,
लाल महालात जिजाऊंच दर्शन घेऊन प्रचाराला करणार सुरुवात.
-
कसब्यात संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवणारचं
संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते कसब्याच्या रिंगणात
ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडची युती असूनही निवडणूकीच्या रिंगणात
उद्या प्रचाराचा फुटणार नारळ
लाल महालात जिजाऊंच दर्शन घेऊन प्रचाराला करणार सुरुवात
-
‘ऑपरेशन दोस्त’अंतर्गत भारताकडून तुर्की आणि सीरियाला मोठी मदत
भूकंपग्रस्त तुर्की आणि सीरियामध्ये पाठवली शोध आणि बचाव पथकं, एक फिल्ड हॉस्पिटल, साहित्य, औषधं आणि उपकरणं
-
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र भूषण निवड समितीच्या शिफारशीवरून पुरस्कार
रोख आणि प्रशस्तीपत्र असं पुरस्काराचं स्वरूप
-
Bayern Mharashtra football cup : बहुचर्चित एफसी बार्यन महाराष्ट्र फुटबॉल कप टुर्नामेंटला सुरुवात
टॉप 20 मुलांना जर्मनीच्या जगप्रसिद्ध एफसी बार्यन म्युनिच टुर्नामेंटमध्ये ट्रेनिंगची संधी. वाचा सविस्तर…
-
IND vs AUS : ‘मी त्याच्या कानाखाली मारणार’, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूवर भडकले कपिल देव
IND vs AUS : कपिल देव यांच्या विधानाने एकच खळबळ. वाचा सविस्तर….
-
IND vs AUS Test : Rahul dravid नाराज असल्याची माहिती, पहिल्या टेस्ट मॅचआधी मोठी अपडेट
IND vs AUS Test : राहुल द्रविड का नाराज आहेत? काय आहे कारण? वाचा सविस्तर….
-
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपडेट
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक अर्ज छाननी
-भाजपच्या शंकर जगतापांचा डमी अर्ज अवैध ठरविण्यात आलाय
-भाजपच्या अश्विनी जगताप यांचा अर्ज वैध ठरला
-
WTC FINAL 2023 | आयसीसीकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची सुपारी फुटली
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनलची तारीख ठरली
आयसीसीकडून ट्विट करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची तारीख आणि ठिकाण जाहीर
लंडनमधील ओव्हलमध्ये 7-11 जून दरम्यान सामन्याचं आयोजन
तर 12 जून राखीव दिवस
सविस्तर बातमी | Wtc Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची तारीख जाहीर, आयसीसीकडून घोषणा
-
औरंगजेबाच्या जुन्या महालाचे संवर्धन करण्याची मागणी
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद शहरातील पदाधिकाऱ्यांनी केली मागणी,
जी 20च्या पार्श्वभूमीवर संवर्धन करण्याची मागणी,
प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरवानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी,
औरंगजेबाच्या महालाच्या संवर्धनाची मागणी केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता.
-
Entertainment News Live | हिंदी KGF 2 चा विक्रम मोडण्यास ‘पठाण’ सज्ज
शाहरुख खानच्या ‘पठाण’ची आतापर्यंत 430.25 कोटींची कमाई
हिंदी केजीएफ 2 च्या कमाईचा विक्रम मोडण्यास सज्ज
येत्या काळात बाहुबली 2 च्या (हिंदी) कमाईलाही मागे टाकण्याची शक्यता
-
औरंगाबाद: औरंगजेबाच्या जुन्या महालाचे संवर्धन करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद शहरातील पदाधिकाऱ्यांनी केली मागणी
जी 20च्या पार्श्वभूमीवर संवर्धन करण्याची मागणी
प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरवानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी
औरंगजेबाच्या महालाच्या संवर्धनाची मागणी केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता
-
‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खटला दोन महिन्यांत पूर्ण होईल’
सीबीआयची उच्च न्यायालयाला माहिती
याप्रकरणी सीबीआयने पाच जणांवर आरोपपत्र दाखल केले असून ऑक्टोबर २०२१ मध्ये खटल्याला सुरुवात
दाभोलकर यांची पुणे येथे २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या करण्यात आली होती
२१ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात पुढील सुनावणी
-
बाळासाहेब दाभेकर निवडणूक लढवण्यावर ठाम
बाळासाहेब दाभेकर निवडणूक लढवण्यावर ठाम
काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांच माझ्याशी बोलणं झालं नाही
नाना पटोले यांचा फोन आला होता पण मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे
मी कसबा पोटनिवडणूक लढवणारचं, मी माघार घेणार नाही
-
Live- औरंगाबाद आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेकीचा आरोप
– आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली नव्हती असा खुलासा औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी केला आहे.
– औरंगाबाद ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी हा खुलासा केला आहे.
-
नालासोपारा पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत 9 आरोपींना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली आहे.
विषबाधा झालेल्या सर्व आरोपीना वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
सर्व आरोपीना सरकारी जेवण देण्यात आले होते.
काल मंगळवारी दुपारच्या जेवणा नंतर अचानक, पोटात मलमल आणि उलटी होवू लागली.
नालासोपारा पोलिसांनी लगेच त्यांना जवळच्या पालिकेच्या रुग्णालयाय दाखल करून उपचार सुरू केले आहेत.
-
बेळगाव सीमाप्रश्नी आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाहीच
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न यांनी सुनावणी करण्यापासून माघार घेतली
सीमा प्रश्नाबाबतची सुनावणी करण्यास न्यायमूर्तींचा नकार
पुढील सुनावणीची तारीख अनिश्चित
-
Live- बेळगाव सीमाप्रश्नी आजही सुनावणी नाहीच
न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न यांनी सुनावणी करण्यापासून माघार घेतली
सीमा प्रश्नाबाबतची सुनावणी करण्यास न्यायमूर्तींचा नकार
पुढील सुनावणीची तारीख अनिश्चित
-
आमदार हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांची अटकपूर्व जामीन यासाठी उच्च न्यायालयात धाव
नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी पी एम एल ए न्यायालयात दाखल केला अर्ज
राजकीय हेतून अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा अर्जात उल्लेख
मुश्रीफांच्या त्यांनी मुलांनी दाखल केलेल्या अर्जावर 16 फेब्रुवारीला होणार सुनावणी
-
अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती हिलरी क्लिंटन यांनी दिली वेरूळ लेणीस भेट
अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती हिलरी क्लिंटन यांनी आज सकाळी ऐतिहासिक वेरूळ लेणीला भेट दिली
यावेळी हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्या गाईड कडून वेरूळ लेणीची माहिती घेतली.
क्लिंटन यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या दूतावासातील सुरक्षारक्षकांसह औरंगाबादमधील पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-
पुण्यात बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाच्या प्रचारात सहभागी होणार
बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाच्या प्रचारात सहभागी होणार
बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणं झालं आहे
ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रचारात सहभागी होतील
काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांची माहिती
-
बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत विजय शिवतारे यांची विशेष मागणी
बारामती लोकसभा मतदारसंघाचे नाव बदलून पुणे दक्षिण मतदारसंघ करा
शिंदेगटाचे नेते विजय शिवतारे यांची मागणी
बारामतीमधून निवडणूक लढवण्याची विजय शिवतारेंनी व्यक्त केली इच्छा
मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार
असंही शिवतारे म्हणालेत
-
Live- पुण्यातून मनसेची मोठी बातमी
राज ठाकरेंचा आदेश येईपर्यंत कसबा पोटनिवडणुकीतील प्रचारात कोणीही सहभागी होऊ नका
पदाधिकारी प्रचारात आढळून आल्यास मनसेकडून कारवाई केली जाणार
मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षांतर्गत सूचना
राज ठाकरे कसबा पोटनिवडणुकीत तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता
-
पुणे पोटनिवडणुकीतील उमेदवारांकडे किती कोटींची संपत्ती, किती आहे दागिने?
पुणे येथील गर्भश्रीमंत उमेदवारांची माहिती समोर आली आहे. काही उमेदवारांकडे लाखांचा मोबाईल आहे. कोणाकडे कोट्यवधी रुपयांचे सोन्यांचे दागिने आहेत. शेती व्यापारातून त्यांचे हे उत्पन्न त्यांनी दाखवले आहे…वाचा सविस्तर
-
Live- महाराष्ट्रातील काँग्रेस वादावर नो कमेंट्स
काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांच्याकडून नो कमेंट्स सूत्रांची माहिती
काँग्रेस खासदारांनी थोरात यांच्या राजीनाम्याबाबत सोनीयांना माहिती दिली
सोनिया यांच्याकडून कोणतीही रिएक्शन नाही
पक्षातील नेत्यांची मात्र बैठक
राज्याचे प्रभारी एच के पाटील यांनी बैठक घेतली
-
आरबीआयने रेपो दरात केली पुन्हा वाढ
रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची केली वृद्धी
अपेक्षेप्रमाणे रेपो दरात झाली वाढ
सर्वसामान्यांच्या ईएमआयमध्ये होणार वाढ
रेपो दर आता 6.50 टक्क्यांवर
9 महिन्यांत केली 6 व्या वेळी वाढ
-
आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
वकिलांसह उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार
निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत उद्धव ठाकरे बोलणार, सूत्रांची माहिती
निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वी उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमधून मत मांडणार
-
अभय योजनेतून मालमत्ता करधारकांना वसई विरार महापालिकेचा दिलासा
अभय योजनेतून मालमत्ता करधारकांना वसई विरार महापालिकेचा दिलासा
6 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत ही योजना असणार लागू
या कालावधीत करभरणा करणाऱ्या अधिकृत आणि अनधिकृत मालमत्ताधारकांना ५० टक्के शास्तीमध्ये सूट देण्यात येणार
वसई विरार शहर महानगरपालिकेने मालमत्ता कर संकलनासाठी मागील वर्षभरात विविध योजना राबवुन 275 कोटींची विक्रमी वसुली केली आहे. 500 कोटी महापालिकेचे उद्दिष्ट आहे
जानेवारी महिन्यापासून सरसकट सर्वच थकीत मालमत्ताधारकांना दोन टक्के शास्ती लागू झाली आहे.
-
आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
मुंबई : वकिलांसह उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार,
निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत उद्धव ठाकरे बोलणार, सूत्रांची माहिती
निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वी उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमधून मत मांडणार.
-
तलवारीने केक कापत रस्त्यावर वाढदिवस
तलवारीने केक कापत रस्त्यावर वाढदिवस
सात जणांवर लातूर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पाच जणांना लातूर पोलिसांनी धारदार शस्त्रांसह अटक केली
दोन फरार जणांचा शोध सुरु
-
कोल्हापूर बाजार समितीमधील गुळ सौदे पूर्ववत
कोल्हापूर बाजार समितीमधील गुळ सौदे पूर्ववत
सौदे झालेले गूळ उतरण्यासाठी आणले पर्यायी हमाल
गुळ हमालांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवेश बंदी केल्याने बाजार समितीने आणले पर्यायी हमाल
हमाली वाढीच्या वादामुळे गेल्या दोन दिवसापासून गुळ सौदे होते बंद
आडमुठ्या भूमिकेमुळे अखेर आम्हालांसाठी गुळ मार्केटमध्ये कलम 144 लागू
-
स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीबाबत अनिश्चितता
कालची सुनावणी लांबणीवर गेल्याने निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटनुसार पुढील सुनावणी 21 मार्चला
मात्र त्वरित सुनावणी घेण्यासाठी वकील प्रयत्न करणार
आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणीबाबत विनंती केली जाणार
वकिलांमार्फत लेखी विनंती न्यायालयाला केली जाणार
-
सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा बसणार झळ?
आज आरबीआय करणार रेपो दराची घोषणा
महागाईचा दर घसरल्याने काय घेणार भूमिका?
महागाई आणि ईएमआय वाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, वाचा बातमी
-
भारतात कधी मिळणार स्वस्त पेट्रोल-डिझेल?
आतंरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण
कच्चा तेलाच्या घसणीने कंपन्यांचा मोठा फायदा
केंद्र सरकारकडून तोटा भरुन काढण्यासाठी 30 हजार कोटींचे अनुदान
मग देशातंर्गत इंधनाचे दर कधी होणार कमी, वाचा सविस्तर
-
कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक
पुणे : बंडखोर उमेदवारांमुळे भाजपचा मार्ग सोपा?
१० तारखेपर्यंत बंडखोरांना शांत करण्याचे मविआसमोर आव्हान,
चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत दाखल केलाय अर्ज,
तर कसब्यात बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत दाखल केलाय अर्ज,
बंडखोरी शांत करण्यात मविआला यश येणार?
-
भाजपच्या गडात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा दोन दिवस दौरा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 12 फेब्रुवारीपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर
रविवारी सेवाग्राममधील ग्रामसभेस पवार उपस्थित राहणार
दौऱ्यात नागपुरात बुद्धिजीवी आणि व्यावसायिकांशी पवार साधणार संवाद
-
कोल्हापूर मार्केट यार्डातील हमालांना बाजार समितीत प्रवेश बंदी
कोल्हापूर मार्केट यार्डातील हमालांना बाजार समितीत प्रवेश बंदी
गुळ हमालांसाठी लावलं 144 कलम
जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
नवीन हमालांची नेमणूक होणार
हमाली वाढीसाठी वारंवार गुळ सौदे बंद पाडले जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
प्रवेश बंदीमुळे हमाल आणि प्रशासनामध्ये संघर्षाचे चिन्ह
-
भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन अमित शाह यांच्याशिवाय होणार?
नाशिकमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी अमित शाह यांची अद्याप वेळच मिळाली नाही
10 आणि 11 तारखेला नाशिकमध्ये होणार भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन
राज्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री आणि पदाधिकारी राहणार अधिवेशनाला उपस्थित
मात्र अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत अद्याप संभ्रम कायम
-
विद्याविहार येथे काल रात्री लोको पायलट रामेश्वर मीना यांचा रूळ ओलांडताना मृत्यू
– काल रात्री ९.०० वा. मोटरमन रामेश्वर मीना ( वय ५३ ) विद्याविहार हून क्रॉस करत असताना लोकलच्या धडकेने जखमी झाले होते
– त्यांना जखमी अवस्थेत राजावाडी हॉस्पिटल मध्ये नेले परंतु त्यांना मृत घोषित केले
– रेल कामगार सेनेने याबद्दल दु: ख व्यक्त केले आहे, मोटरमन समस्यांसाठी त्यांनी आंदोलन केले होते.
– रामेश्वर मीना लोकल सेवेचे मोटरमन होते, त्यांना नुकतेच लोकोवर इंजिन पायलट म्हणून नेमले होते.
– काल रात्री लोको शेडकडे जाताना घटना लोकलने त्यांना उडवले, त्यात ते जखमी झाले आणि राजावाडीत त्यांना मृत घोषीत करण्यात आले
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पुलाचं काम 2024 पर्यंत पुर्ण करण्यात येणार
पुणे : मेट्रोच्या कामामुळे चौकातील पुल पाडण्यात आला होता,
त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीला पुणेकरांना सामोरं जावं लागतंय,
हिंजवडी ते शिवाजीनगर न्यायालय असं मेट्रोचं काम सुरू आहे,
त्यासाठी विद्यापीठ चौकातील पुल पाडण्यात आला होता,
मात्र आता दुमजली पिलर इथं उभारले जाणार आहेत.
-
कसब्यात 29 उमेदवारानी 39 अर्ज भरले तर चिंचवड पोटनिडणुकीसाठी 40 जणांनी 53 उमेदवारी अर्ज भरले
काल होता अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
कसबा आणि चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार
दोन्ही पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी
10 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
यावेळी दोन्ही पोटनिडणुकीत किती उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहणे महत्त्वाचे
-
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी
निवडणूक प्रभारी म्हणून मोहोळ काम पाहणार
तर आमदार माधुरी मिसाळ निवडणूक प्रमुख आणि धीरज घाटे निवडणूकसह प्रमुख असणार
घाटेही उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र भाजपनं त्यांना निवडणूक कार्यक्रमाची दिली जबाबदारी
चिंचवडमध्ये शंकर जगताप यांच्यावर जबाबदारी
चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं जबाबदारीचं वाटप
-
पुण्यातील भिडे वाड्यातील घरमालकांना, गाळेधारकांना पर्यायी जागा देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आश्वासन
काल मुंबईत घरमालकांची घेतली बैठक
16 तारखेला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि ओबीसी मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत बैठक
भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचं लवकरच काम सुरू होण्याची शक्यता
बैठकीत अंतिम निर्णयावर होणार शिक्कामोर्तब
-
अंधेरीत पश्चिम द्रुतगती मार्गावरील ब्रीजवर मध्यरात्री भीषण अपघात
या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत
जखमींना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
किया कंपनीच्या कारचा आणि एका बाईकचा हा भयानक अपघात झाला
प्रचंड वेगात असलेल्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ब्रीजवर धडक दिली
-
तुर्कीतील शक्तीशाली भूकंपात आतापर्यंत 7 हजार नागरिक दगावले
भूकंपात 15 हजार नागरिक जखमी
भूकंपामुळे तुर्की 10 फूट सरकला
तुर्कीत तीन महिन्यांसाठी आणीबाणी लागू
Published On - Feb 08,2023 6:05 AM