मुंबई : प्रसिद्ध अभिनेते सतिश कौशिक यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये रात्रीपासून लागलेली आग अजूनही नियंत्रणात आलेली नाही. आगीवर नियंत्रण आणण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरूच. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेचा वर्धापन दिन यंदा पहिल्यांदाच ठाण्यात साजरा होणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि आभार. शुभेच्छा या असणारच आहेत. पण आभार या गोष्टीचं की, कोणतीही सत्ता नसताना तुमची ही ऊर्जा पक्ष पुढे घेऊन जात असते. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. आत्मचरित्राची चार पाने वाढली. त्यादिवशी मी काही बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं? कोणी केलं असेल? एक निश्चित सांगतो, ज्याने केलंय त्याला पहिलं समजेल की हे त्याने केलंय. नंतर सगळ्यांना समजेल की हे त्याने केलंय. माझ्या मुलांचं असं रक्त मी वाया घालू देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत. या फडतूस लोकांसाठी नाहीत.
बाकी अनेक गोष्टी आणि विषय आहेत जे मला आज नाही तर 22 तारखेला बोलायचे आहेत.
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :
मी काल महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिकडेही अशाच घोषणा झाल्या. घोषणा चालू असताना मला एक गोष्ट आठवली, विरोध होता तो, एकेदिवशी शिवचरित्रकार दत्तू मामा पोतदार रायगडावर गेले, जाता-जाता त्यांनी आकाशात पाहिलं, समोर शेतकऱ्याला विचारलं पाऊस पडेल का? त्याने बघितलं आणि म्हणाला वाटत नाही. थोड्या वेळाने ढग आले, जोरात पाऊस पडला. काय करायचं? यांनी टकटक केली. आतून आवाज आला. कोण आहे? यांनी सांगितलं शिवचरित्रकार दत्तू पोतदार. आतून आवाज आला इथल्या लोकांना जागा नाही. तसं माझ्या बाबतीत समजा झालं, मी झोपडीवर टकटक झाली आणि घोषणा देणाऱ्यांपैकी घरात घेतील का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा!
आतापर्यंत विरोधात घेतला आलाप
जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी गठित केली समिती
राजस्थानसह इतर राज्यांमध्ये करणार समिती अभ्यास
सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न
निवडणुका तोंडावर असताना मतदार हिरावू नयेत यासाठी प्रयत्न, बातमी एका क्लिकवर
बीएसईवर आणले तुफान, या शेअरमध्ये 10 टक्के उसळी
या शेअरमध्ये आली 8.7 टक्क्यांची तेजी
पेन्नी शेअरमध्ये मोठी उसळी, गुंतवणूकदार मालामाल, वाचा बातमी
आठवडाभरात आनंदवार्ता, पण चिंतेचेही ढग गडद
दोन समूहातील शेअर्स ठेवावे लागले तारण
अनेक शेअर्स एसबीआयकडे उधार
एनएसईची तीन स्टॉकवर करडी नजर, वाचा बातमी
सायंकाळी 5 वाजता रोड शो
भांडूपमधून रोड शो करत ठाण्यात पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थिती लावणार
रोड शोला हल्ल्याची पार्श्वभूमी
हल्ल्याचे धागेदोरे भांडूपमध्ये, अटक केलेले आरोपी भांडूपमधील
स्थानिक मनसे कार्यकर्त्यानी संदीप देशपांडे यांना भांडूप येथील शाखेला भेटीसाठी बोलावले
जिल्हा बँकेची जप्ती नोटीस पंचवटीतील रामकुंड येथे बुडवून केला जिल्हा बँकेचा निषेध
शेतकरी वारकरी समन्वय समितीच्या वतीने निषेध आंदोलन
ज्या प्रकारे संत तुकाराम महाराज यांनी कर्जाच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवल्या होत्या, त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी रामकुंडात बुडवल्या जप्ती नोटीसा
सरकारने जिल्हा बँकेला अनुदान देण्याची केली मागणी
नाशिक जिल्हा बँकेच्या मालमत्ता वसुली नोटीस विरोधात शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन
जिल्हा बँकेची जप्ती नोटीस पंचवटीतील रामकुंड येथे बुडवून केला जिल्हा बँकेचा निषेध
शेतकरी वारकरी समन्वय समितीच्या वतीने निषेध आंदोलन
ज्या प्रकारे संत तुकाराम महाराज यांनी कर्जाच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवल्या होत्या, त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी रामकुंडात बुडवल्या जप्ती नोटीसा
सरकारने जिल्हा बँकेला अनुदान देण्याची केली मागणी
नाशिक : कांदा उत्पादक शेतकरी आणि संघटनांची बैठक
केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात
कांद्याच्या तसेच इतर पिकांच्या नुकसनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
नाशिक : केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात,
कांद्याच्या तसेच इतर पिकांच्या नुकसनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिके कडे लक्ष.
– सकाळच्या सत्रात 600 वाहनातून 12 हजार 500 क्विंटल कांद्याची आवक
– जास्तीजास्त 1052 रुपये, कमीतकमी 400 रुपये तर सरासरी 725 रुपये प्रतिक्विंटल ला मिळाला बाजार भाव…
नाफेडच्या प्रोडूसर कंपनी मार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीला 942 रुपयांचा दर…
मनसेचा आज 17 वा वर्धापन दिन
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम
राज ठाकरे कुणाचे वाभाडे काढणार? राज्याचं लक्ष लागलं
आपचे नेते मनीष सिसोदिया यांची आज पुन्हा चौकशी होणार
तिहार जेलमध्ये ईडी अधिकारी आज चौकशी करणार
सलग दुसऱ्यांदा होणार सिसोदिया यांची चौकशी
कथित दारू घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी
खरेदीदारांना आज खरेदीची सुवर्णसंधी
चांदीच्या भावात किलोमागे 100 रुपयांची होणार बचत
22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमती घसरल्या, वाचा बातमी
अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं वयाच्या 66 व्या वर्षी निधन
दिल्ली एनसीआरमध्ये असताना आला हृदयविकाराचा झटका, वाचा सविस्तर..
टॉप-10 पासून आता केवळ इतके दूर
यादीत घसरले होते 35 व्या स्थानावर
हिंडनबर्ग अहवालानंतर आला होता समूहात भूकंप
आठवडाभरात शेअर्समध्ये करेक्शन
गुंतवणूकदारांचा भरवसा पुन्हा वाढला, वाचा बातमी
नागपूर : उमरेड तालुक्यात एमआयडीसी भागात आग
जुने टायर जाळून तेल काढणाऱ्या कंपनीमध्ये लागली आग
आगीत कंपनीत असलेले सर्व टायर जळाले
आगीमुळे परिसरात धुराचे लोट
औरंगाबादकरांच्या खिशाला मोठी झळ
पेट्रोल इतक्या रुपयांनी महागले, डिझेलच्या किंमतीत ही वाढ
रशियाकडून कच्चा तेलाच्या आयातीत 2 डॉलर प्रति बॅरलचा तेल कंपन्यांना फायदा
देशातील वाहनधारकांना कधी होईल स्वस्त इंधनाचा पुरवठा
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले इंधनावरील कर कपातीचे संकेत
आजचा तुमच्या शहरातील इंधनाचा भाव जाणून घ्या एका एसएमएसवर, बातमी एका क्लिकवर
– पुण्यात रोज तब्बल 10 कोटी, तर महिन्याला 300 कोटी सिगारेट ओढल्या जातात,
– त्यातून 600 कोटींची उलाढाल होते.
– सिगारेट ओढण्याचे प्रमाण तरुणांमध्ये सर्वाधिक आहे.
– केवळ तलफ म्हणून सिगारेट ओढण्यापेक्षा फॅशन म्हणून सिगारेट ओढल्या जात असल्याचं पाहणीत समोर
नाशिक : जिल्हाधिकारी गंगाथरन.डी यांची माहिती
सोमवार आणि मंगळवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान
कांदा, द्राक्ष, कोबी, कोथिंबीर सह पिकांचे मोठे नुकसान
पंचनामे करून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहीचवण्याच्या मागणीनंतर पंचनामे
पंचनामे करून मदत करण्यासाठी तात्काळ कारवाई करणार
जिल्हाधिकारी गंगाथरन.डी यांची माहिती
औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचा छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात कँडल मार्च..
जिल्हाधिकारी कार्यालयापासून भडकल गेट पर्यंत काढला जाणार कँडल मार्च
आज सायंकाळी सहा वाजता काढला जाणार कँडल मार्च
खासदार इम्तियाज जलील स्वतः सहभागी होणार कँडल मार्च मध्ये
कँडल मार्चला अद्याप पोलिसांनी परवानगी दिली नसल्याची माहिती
परवानगी नसतानाही कँडल मार्च काढण्याची एमआयएमची भूमिका
आज काढला जाणार छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात कॅण्डल मार्च..
जुनी पेन्शन योजना याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतन व त्रुटीचे प्रश्न लवकरात लवकर सोडवा
लिपीक कर्मचारी संघटनेची राज्य सरकारकडे मागणी
राज्य सरकारने दखल घेतली नाही तर 14 मार्चपासून संपावर जाणार
44 हेक्टरवर पिकांच झालं नुकसान
कृषी आणि महसूल विभागाकडून माहिती गोळा करायला सुरुवात
आंबेगाव तालुक्यात द्राक्ष, कांदा आणि गहू पिकांच तर खेड तालुक्यात 20 गावांत शेतीचं नुकसान झालंय
आंबेगाव तालुक्यात 18 मी लीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे
पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय
आठवड्यातील दर बुधवारी 12 ते 2 दरम्यान सुरु असणार क्लिनिक
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी केलं उद्घाटन
राज्य सरकारच्यावतीनं स्तन कर्करोग जनजागृती अभियान हाती घेण्यात आलंय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संलग्न संशोधन केंद्रांना आदेश
प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे
संथ गतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत
त्यासाठी विद्यापीठाकडून या सूचना करण्यात आल्यात
मुलाखती झाल्यानंतर प्रवेशाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार
मध्यरात्रीच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसीमधील दोन कंपन्याना भीषण आग
सुदैवाने जीवितहानी नाही, मोठ्या प्रमाणात वित्तहानी