MLC Election: तीन वेळा आमदारकी, पण यावेळेस भाजपनं करेक्ट कार्यक्रम केला? अकोल्यात शिवसेनेचं नेमकं कुठं चुकलं?

अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला आहे.

MLC Election: तीन वेळा आमदारकी, पण यावेळेस भाजपनं करेक्ट कार्यक्रम केला? अकोल्यात शिवसेनेचं नेमकं कुठं चुकलं?
gopikishan bajoria
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 12:58 PM

अकोला: अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला आहे. खंडेलवाल यांनी तीन वेळा आमदार असलेल्या गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभवा केला आहे. खंडेलवाल यांनी अचूक रणनीती आखत बाजोरिया यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. राज्यात सत्ता असूनही हातची सीट राखता न आल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. यामध्ये गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला होता. मात्र, त्यात खंडेलवाल यांनी बाजी मारली आहे.

दणदणीत विजय

या निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल यांना 443, शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांना 334 मते पडली. तर 31 मते बाद झाली. तब्बल 109 मतांनी खांडेलवाल यांचा दणदणीत विजय झाला.

चुरस होती, पण…

अकोला महापालिका भाजपकडे आहे. अनेक नगरपरिषदाही भाजपच्या ताब्यात आहेत. तर हा मतदारसंघ चार टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात होता. चारही वेळा शिवसेनेने बहुमत नसतानाही या मतदारसंघात विजय मिळवला होता. एकटे बाजोरियाच या मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाले होते. त्यामुळे यावेळीही या मतदारसंघात बाजोरिया पॅटर्न चालेल असं बोललं जात होतं. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ असल्याने शिवसेनेला हा विजय सोपा जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, शिवसेनेचा गेम करत खंडेलवाल जायंट किलर ठरले आहेत.

जनसंपर्क कमी पडला?

दरम्यान, या निवडणुकीत शिवसेनेचा जनसंपर्क कमी पडल्याचं सांगितलं जातं. शिवसेनेपेक्षा भाजपने अचूक रणनीती आखली होती. राज्यात तीन पक्षाचं सरकार असूनही जनाधार आपल्याच पाठी आहे हे ठसवण्यासाठी भाजपने योग्य रणनीती आखली होती. त्यात भाजप यशस्वी झाला आहे. अकोल्यात विरोधकांची मते फोडण्यात भाजप यशस्वी झाल्यानेच भाजपने शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं दिसून आलं आहे.

अकोला विधान परिषद

वसंत खंडेलवाल-भाजपा- 443 गोपीकिशन बाजोरिया-शिवसेना-334 बाद मते-31

विधानपरिषद निकाल

भाजपा : 4 विजयी शिवसेना : 1 विजयी काँग्रेस : 1 विजयी

संबंधित बातम्या:

MLC Election: विजयाचा हर्षानंद! देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताच बावनकुळेंना अश्रू अनावर; फडणवीसही गहिवरले

Maharashtra MLC Election Result 2021 Live : हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक, भविष्यातील विजयाच्या मालिकेची सुरुवात: देवेंद्र फडणवीस

MLC Election: छोटू भोयर यांना फक्त एकच मत, एकेकाळच्या भाजप नेत्यांवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.