Palghar ZP and Panchayat Samiti Election Results 2021 LIVE: पालघरमध्ये शिवसेना खासदाराची प्रतिष्ठा पणाला, रोहित गावितांच्या लढतीकडं राज्याचं लक्ष, सेनेचा गड भाजप भेदणार?
Palghar Zilla Parishad and Panchayat Samiti Election Results 2021 Counting and LIVE Updates: पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत (Palghar ZP Panchayat Samiti by election result) 29 जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले आहे. जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समिती 14 अशा 29 जागा आहेत.
पालघर: पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत (Palghar ZP Panchayat Samiti by election result) 29 जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले आहे. जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समिती 14 अशा 29 जागांचा निकाला जाहीर होणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र सुरळीत मतदान पार पडले आहे. मात्र, 15 जिल्हा परिषदेच्या जागा पैकी डहाणू ताल्युक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वताचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिगणात उतरविले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली. संख्याबळानुसार पालघर जिल्हापरिषद मध्ये सर्वाधिक महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाचे सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. पोटनिवडणुकीत हे सर्व पक्ष एकमेकांसमोरासमोर स्वतंत्र लढले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत ज्यांना कुणाला किती जागा मिळणार आहेत. त्यावर पालघर जिल्हा परिषद कुणाकडे हे चित्र स्पष्ट होणार आहे.
पालघर जिल्हा परिषद सद्यस्थिती
पोटनिवडणुकीच्या अगोदर पालघर जिल्हा परिषद मध्ये एकूण 57 सदस्य आहेत. सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे शिवसेनेकडे आहे तर उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादी कडे आहे. पालघर जिल्हा परिषद वर सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे.
पोटनिवडणुकी आगोदरच पक्षीय बलाबल
शिवसेने सदस्य 18 राष्ट्रवादी 15 काँग्रेस 1 कम्युनिष्ठ 05 बहुजन विकास आघाडी 04 भाजप 12, अपक्ष 02
एकूण 57
पालघर सदस्यत्व रद्द झालेले पक्ष आणि संख्या
15 सद्यस्यांचे रद्द झालेल्या पालघर जिल्हापरिषद गट मधील पक्ष
राष्ट्रवादी 07 बिजेप 04 शिवसेना 03 सीपीएम 01
पालघर 14 सद्यस्यांचे रद्द झालेले पंचायेत समिती गण मधील पक्ष
राष्ट्रवादी 01 शिवसेना 06
बीजेपी 01
बहुजन विकास आघाडी 03
मनसे 02
अपक्ष 01
एकूण 14
पालघर जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता
संख्याबळानुसार पालघर जिल्हापरिषद मध्ये सर्वाधिक महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाचे सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. पोटनिवडणुकीत हे सर्व पक्ष एकमेका समोरासमोर स्वतंत्र लढले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत ज्यांना कुणाला किती जागा मिळणार आहेत. त्यावर पालघर जिल्हा परिषद कुणाकडे हे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपा विरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, कम्युनिस्ट यांनी जर बाजी मारली तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता पालघर जिल्हा परिषद वर येण्याची शक्यता आहे. अन्यथा जर भाजपाने आपल्या जागा वाढविल्या तर महाविकास आघाडीला खिंडार पाडू शकतो.. पण सध्या राज्याचे मुख्यमंत्री , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात केलेले विकास काम, सध्या शिवसेनेची असलेली सत्ता यामुळे पुन्हा पालघर वर शिवसेनेची सत्ता कायम राहणार, असा विश्वास शिवसेनेचे पालघर खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला आहे.
पालघर ताल्युक्यात निवडणूक लागलेले पंचायत समिती गण आणि जिल्हापरिषद गट
01. डहाणू 04 02. वाडा 05 03. पालघर 02 04. तलासरी 01 05. विक्रमगड 01 06. मोखाडा 02
एकूण 15 जागा
पंचायत समिती गण
01 डहाणू 02 02 वाडा 01 03 पालघर 09, 04 वसई 02
एकूण 14 जागा
इतर बातम्या:
Maharashtra Palghar ZP and Panchayat Samiti Election Results 2021 LIVE Updates Shivsena NCP and BJP who will came in power Rohit Rajendra Gavit seat get attention