AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीला कृष्णा आणि वारणा नदीच्या महापुराचा फटका, तब्बल 40 हजार हेक्टर शेती बाधित, ऊस, सोयाबीनचं मोठं नुकसान

2019 मध्ये आलेल्या महापुरापेक्षाही यंदा शेतीचे क्षेत्र अधिक बाधित झाले आहे. सुमारे 40 हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्र बाधित झाल्याचं अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सांगलीला कृष्णा आणि वारणा नदीच्या महापुराचा फटका, तब्बल 40 हजार हेक्टर शेती बाधित, ऊस, सोयाबीनचं मोठं नुकसान
सांगलीला पुराचा फटका
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 10:01 PM

सांगली: कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुराने यंदा सांगली जिल्ह्यात थैमान घातलं.कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतीला याचा जबर फटका बसला आहे. 2019 मध्ये आलेल्या महापुरापेक्षाही यंदा शेतीचे क्षेत्र अधिक बाधित झाले आहे. सुमारे 40 हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्र बाधित झाल्याचं अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाकडून यंत्रणेकडून अद्याप पंचनामे सुरूच असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही सांगली कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

सांगलीतील शेतीला मोठा फटका

सांगली जिल्ह्यासह सातारा,कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी परिणामी सांगली जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नद्यांना महापूर आला.या महापुराने सर्व पातळ्यांवर नुकसान झाले.जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.पूर बाधित शेतीच्या नुकसानाची प्रशासनाकडून पंचनामे आता युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.कृषी विभागाच्या माध्यमातून हे पंचनामे सुरू आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार 40 हजार हेक्टर शेती बाधित

27 जुलै रोजी अखेर प्राथमिक नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा काठी असणारया शिराळा, वाळवा ,पलूस आणि मिरज तालुक्यातील सुमारे 247 गावातील 97 हजार 485 शेतकरयांची 40 हजार हेक्टरहुन अधिक शेती बाधित झाली आहे. यामध्ये मुख्यतः ऊस, सोयाबीन,भुईमूग या पिकांच्या बरोबर भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

50 कोटींच्या आसपास नुकसान

जवळपास पन्नास कोटी इतका नुकसानीची आकडा असल्याचे कृषी विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. तर, अद्याप अनेक गावात पुराचे पाणी आहे. अनेक गावात पंचनामे सुरूच आहेत.पूर ओसरल्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून 2019 मधील महापुराच्या पेक्षा यावेळी शेतीचे क्षेत्र अधिक बाधित झाल्याचे कृषी अधीक्षक बस्वराज मास्तोळी यांनी सांगितले आहे.

मिरज तालुक्यातील मौजे डिग्रजला ही पुराच्या पाण्याने पूर्ण वेढा घातला होता. त्यामुळे गावात घराच्या वर पाणी गेले होते. तर त्यामुळे येथील शेती पूर्णतः हा पाण्याखाली गेली होती.तर काही ठिकाणी ऊस शेती अक्षरश: जमीनदोस्त झाली आहे.

इतर बातम्या:

Maharashtra Cabinet : पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना मदत; मंत्रिमंडळ बैठकीतील 5 महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

Cabinet Meeting : पंचनाम्याअभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तूर्तास पूरग्रस्तांना तात्काळ 10 हजारांची मदत

Maharashtra Rain Update Sangli flood impacted near about forty thousand hector farm on the bank of Krishna and Warana River

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.