चौथ्या दिवशीही तळीयेत 42 लोक गायब; मृतांचा आकडा 43 वर; रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याच्या घटनेला आज चार दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही या दुर्घटनेतील 42 जण गायब आहेत. ( Mahad landslinde)
महाड: महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याच्या घटनेला आज चार दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही या दुर्घटनेतील 42 जण गायब आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज एसडीआरएफची टीमही तळीयेमध्ये दाखल झाली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 43वर पोहोचल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Maharashtra Rains: Death toll in flood-hit Taliye reaches 43)
तळीये येथे एनडीआरएफने सलग चौथ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. आज एसडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. या परिसरात जेसीबीच्या सहाय्याने मातीचे ढिगारे काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. तळीयेमध्ये आतापर्यंत 42 जणांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. तर अजूनही 42 जण बेपत्ता आहेत.
नेमकं काय घडलं?
गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.
राज्यात 99 लोक बेपत्ता
राज्यात पूरग्रस्त भागातून सुमारे हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. एकूण 112 मृत्यू झाले असून 3221 जनावरांचे मृत्यू आहेत. एकंदर 53 लोक जखमी असून 99 लोक बेपत्ता आहेत. 1,35,313 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. (Maharashtra Rains: Death toll in flood-hit Taliye reaches 43)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 25 July 2021 https://t.co/86BidTxNg0 #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 25, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra Rain Landslides LIVE | सांगलीकरांनो आणखी पाणी पातळी वाढणार, 10 हजार लोक स्थलांतर
(Maharashtra Rains: Death toll in flood-hit Taliye reaches 43)