Vinod Tawade : उद्धव ठाकरे विनोद तावडे यांच्यावर कडाडले, पैसे वाटप केल्याप्रकरणात म्हणाले या खोकासुरांना…
Uddhav Thackery attack on Vinod Tawade : विरारमध्ये हा आज संपूर्ण देशाने हाय होल्टेज ड्रामा पाहीला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत त्यांना जवळपास चार तास हॉटेल विवांतामध्ये घेराव टाकण्यात आला. त्याचा आता उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
विरारमध्ये झालेल्या ड्राम्याने लोकशाहीची लक्तरं वेशीवर टांगल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे. विरार पूर्वेतील मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांना तावडे यांना जवळपास चार तास घेराव घातला. या हायहोल्टेज ड्राम्यामळे सर्वच जण आवाक झाले आहेत. प्रत्येक पक्षातून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया येत आहे. तर तुळजापूर येथे आले असताना उद्धव ठाकरे यांनी त्याच खरपूस समाचार घेतला. ते विनोद तावडे यांच्यावर कडाडले.
भ्रष्टासुराची राजवट संपू दे
“तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना माझी बॅग तपासण्यात आली. बॅगेमध्ये तर काही सापडलं नाही. विनोद तावडे यांच्या बँगेत पैसे सापडले. तर काल अनिल देशमुख यांच्यावरती जो हल्ला झाला, ते तपासण्याचे काम कुणाचं होतं? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळेच मी आई तुळजाभवानला साकडं घातलं आहे की, ही सगळी भ्रष्ट आणि दहशतीची राजवट लवकर हटव, असे ते म्हणाले.
राज्यातील खोकासुरांची आणि भ्रष्टासुराची राजवट संपून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी अशी राजवट येऊ दे, असं आपण आई तुळजाभवानीला साकडं घातलं आहे. आई आमच्या पाठीशी आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विरारमध्ये हायहोल्टेज ड्रामा
निवडणुकाच्या प्रचाराचा धुराळा संपतो न संपतोच तोच आज राज्यात पैसे वाटप कांडाने एकच गजहब माजला. त्याचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत उमटले. राष्ट्रीय पक्ष भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राजन नाईक हे हॉटेल विवांतामध्ये असल्याचे आणि ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. त्यांनी तावडे यांना घेराव घातला. त्यांच्यासह महिला कार्यकर्त्या आणि इतर कार्यकर्ते यांना हितेंद्र ठाकुर, क्षितिज ठाकुर यांच्या समर्थकांनी घेराव घातला. या हॉटेलमधील 406 क्रमांकाच्या रुममधून 10 लाख रुपये निवडणूक आयोगाने हस्तगत केले.
मग 4 कोटी 90 लाख गेले कुठे?
आज विरारमधील ड्राम्याने सर्वांचेच लक्ष वेधले. हितेंद्र ठाकुर यांनी भाजपमधीलच एका नेत्याने आपल्याला फोन करून तावडे हे पाच कोटी वाटप करण्यासाठी येत असल्याचा गौप्यस्फोट केला. सुरुवातीला आपल्याला हे खोटं वाटलं, पण तावडे हे हॉटेलमध्ये असल्याचे आणि पाकिटाचे वाटप होत असल्याचे, डायरीत नोंदी ठेवण्यात येत असल्याचे समोर आल्याचे ते म्हणाले. त्यांनी यावेळी माध्यमांना डायरी आणि त्यातील नोंदी सुद्धा दाखवल्या. दरम्यान निवडणूक आयोगाने एका रुममधून 10 लाख रुपये मिळवले. जर पाच कोटी वाटपासाठी आले होते तर मग 4 कोटी 90 लाख गेले कुठे? ते कुठे दडवण्यात आले. ते कुणाला देण्यात आले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. उलट संजय राऊत यांनी तावडे हे 5 कोटी नव्हे तर 15 कोटी घेऊन आल्याचा आकडा सांगितल्याने यंत्रणेसमोर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे.