Chandrapur Tiger : शेतात जाणारा महेश वाघाच्या हल्ल्यात जखमी; असा वाचवला जीव
वाघाच्या तावडीतून सुटून तो झाडावर चढला. त्यानंतर काही वेळाने वाघ तिथून निघून गेला. त्यानंतर महेश झाडावरून खाली उतरला.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात जंगलालगत वाघाचे हल्ले हा काही नवीन विषय नाही. त्यामुळे शेतालगत शेती असलेले शेतकरी विचार करूनच शेतात जातात. शेतात जात असताना काळजी ही त्यांना घ्यावीच लागते. कारण कुठून वन्यप्राणी हल्ले करतील काही सांगता येत नाही. अशीच ही घटना मूल तालुक्यातील चितेगाव येथे घडली. वाघाने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला (Tiger Attack) केला. यात तो जखमी झाला. त्याच्या दोन्ही हातांना दुखापत (injured in a tiger attack) झाली. शिवाय पाठीवरही मार लागला. त्यानंतर शेतकऱ्याने कशीतरी वाघाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. लगेच शेजारी असेल्या झाडावर चढला. त्यामुळे या शेतकऱ्याचे प्राण वाचले.
अशी केली वाघाच्या तावडीतून सुटका
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चितेगाव येथील युवा शेतकरी गावाजवळच्याच आपल्या शेतात लाखोळी खोदायला जात होता. अचानक वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. महेश नामदेव तोडासे असे जखमी झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. तो आपल्या शेतात जात असताना अचानक वाघाने हल्ला केला. वाघाच्या तावडीतून आपला जीव वाचवत महेश शेजारी असलेल्या झाडावर चढला. त्यानंतर वाघ काही वेळ तिथेच थांबला. मात्र काही कालावधीने वाघ निघून गेल्याने महेशचा जीव वाचला.
नेमकं काय घडलं?
महेश तोडासे हा शेतकरी शेतावर जात होता. त्याच्या शेतात लाखोळी आहे. लाखोळी खोदायला आली आहे. ती काढण्यासाठी तो आपल्या शेतावर जात होता. शेतात जात असताना अचानक वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या. वाघाच्या तावडीतून सुटून तो झाडावर चढला. त्यानंतर काही वेळाने वाघ तिथून निघून गेला. त्यानंतर महेश झाडावरून खाली उतरला. मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात महेशला दाखल करण्यात आले.
कालच बिबट्या सापडला मृतावस्थेत
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळला. 4 वर्षे वयाचा नर बिबट मृतावस्थेत आढळल्यावर वनपथकाने बिबट मृत्यूची माहिती वरिष्ठांना दिली. वनाधिकारी व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पशुचिकित्सा अधिकाऱ्यांनी पाहणी करून सर्व अवयव शाबूत असल्याची ग्वाही दिली आहे. दुसऱ्या एखाद्या वन्यजीवाशी झुंजीत हा बिबट ठार झाला असल्याची शक्यता वर्तविली गेली आहे. पंचनामा आणि शव विच्छेदनानंतर मृत बिबट्याचे दहन करण्यात आले.