थार गाडीसाठी बैलगाडी शर्यतींचा थरार, या बैलजोडीने पटकावली थार

देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये थार गाडी कोण जिंकणार, याकडे लाखो बैलगाडी शौकिनांच्या नजर लागून राहिल्या होत्या.

थार गाडीसाठी बैलगाडी शर्यतींचा थरार, या बैलजोडीने पटकावली थार
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 7:37 AM

सांगली : डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या वतीने सांगलीच्या विटा नजीकच्या भाळवणी येथे रुस्तूम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. सुमारे 10 एकर परिसरातील माळारानावर ऐतिहासिक बैलगाडी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, मुंबई आणि कर्नाटक राज्यातून सुमारे 200 बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले होते. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडी शौकिनांनी हजेरी लावली. कोणती बैलजोडी थार गाडी जिंकते याची उत्सुकता लागली होती. ती आता पूर्ण झाली.

या मान्यवरांची उपस्थिती

या बैलगाडी शर्यत मैदानासाठी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार निलेश लंके, माजी आमदार पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी मान्यवरांनीही उपस्थितीत लावली होती.

या जोडीने जिंकली थार

देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये थार गाडी कोण जिंकणार, याकडे लाखो बैलगाडी शौकिनांच्या नजर लागून राहिल्या होत्या. वेगवेगळ्या गटातून पार पडलेले शर्यतीनंतर चुरशीच्या अंतीम सामन्यात पुण्याच्या मुळीशी येथील मोहिल शेठ धुमाळ यांच्या बकासुर आणि कराड रेठरेच्या सदाशिव कदम यांच्या महिब्या बैलजोडीने मैदान मारत थार गाडी पटकावली आहे.

इतर महत्त्वाची बक्षिसे

या विजयानंतर बैलागाडी शौकिनांनी मैदानात एकच जल्लोष केला. थरारक अशा पार पडलेल्या शर्यतींमध्ये पुण्याच्या वाघोलो येथील सुमित भाडळे, अमित भाडळे आणि आदिक घाडगे यांच्या शंभू आणि नांदेड सिटी पुण्याच्या जीवन देडगे यांच्या रोमन बैलजोडीने द्वितीय क्रमांक पटकावला. तर डोंबिवली येथील गुडीरतन म्हात्रे यांच्या बैल जोडीने तिसरा क्रमांक मिळवत ट्रॅक्टर मिळवला.

SANGLI 1 N

बैलजोडी मालकांनी व्यक्त केला आनंद

इतर सात विजेत्यांना दुचाकी बक्षिसे पटकावली आहेत. या विजेत्यांना खासदार श्रीनिवास पाटील, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हस्ते थार गाडी आणि दुचाकी देऊन गौरवण्यात आले. थार विजेते पुणे येथील बकासूर बैलाचे मालक मोहिलशेठ धुमाळ आणि कराड येथील महिब्या बैल मालक महिब्या सदाशिव कदम यांनी आनंद व्यक्त केला.

लाखो बैलगाडी शौकिनांच्या उपस्थितीत सांगलीच्या भाळवणी येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये पुण्याच्या बकासुर व कराड रेठरेच्या महीब्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली आहे. अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अशा या बैलगाडी शर्यती पार पडल्या.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.