मालेगावात समाजवादी पक्षाला तर बुलडाण्यात भाजपला धक्का, काँग्रेस राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचे सोहळे!

मालेगाव येथील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शरीफ हुसेन मन्सुरी यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्त आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व मालेगाव शहराध्यक्ष आसिफ शेख यांच्या पुढाकाराने आज प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.

मालेगावात समाजवादी पक्षाला तर बुलडाण्यात भाजपला धक्का, काँग्रेस राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचे सोहळे!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 5:38 PM

मुंबई: मालेगाव येथील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शरीफ हुसेन मन्सुरी यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्त आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व मालेगाव शहराध्यक्ष आसिफ शेख यांच्या पुढाकाराने आज प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.

समाजवादी पक्षाचे मालेगाव येथील पदाधिकारी साजीद मोहम्मद शफी शेख, नफीस अहमद सिराज अहमद, सय्यद जहीर सय्यद सलीम, साहील जैनुद्दीन मन्सुरी, मोहम्मद अनिस मोहम्मद युनुस, अकील शेख रफीक, नवाब हुसैन मन्सुरी, रहीम बेग नसीर बेग, अकील अहमद अब्दुल सलाम, मोहसीन मन्सुरी, शेख आमीन, आदील पठाण यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. या सर्वांचे नवाब मलिक यांनी पक्षाचे मफलर घालून पक्षात स्वागत केले.

मालेगाव येथे पक्षाचा प्रभाव वाढण्याच्या दृष्टीने हा छोटेखानी प्रवेश अधिक फायदेशीर ठरेल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस मुस्ताक अहमद व मालेगाव येथून आलेले अनेक मान्यवर उपस्थित होते.

बुलडाण्यात भाजपला धक्का

बुलडाणा जिल्ह्यातील भाजपला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय. चिखली नगर परिषदेच्या अध्यक्षा प्रिया बोन्द्रे आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोन्द्रे यांनी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज चिखली मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केलाय.

नगराध्यक्ष प्रिया बोन्द्रे सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रवेश केलाय.. तर चिखली नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती आणि भाजपचे गोपाल देव्हढे , भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शाम पठाडे आणि त्यांची पत्नी यांनी सुद्धा काँग्रेस मध्ये प्रवेश केलाय.

मागील वेळी चिखली नगर परिषदेची निवडणूक झाली त्यावेळी भाजपकडून प्रिया बोन्द्रे ह्या जनतेतून निवडून आलेल्या आहेत आणि नगराध्यक्षा झालेल्या होत्या. मात्र शहराचा विकास करत असताना भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने त्रास दिल्याचा आरोप करत आणि विकास कामांना आडकाठी घातल्याने आपण भाजप सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश करत असल्याचे वक्तव्य केलेय.

आधी भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आता पाळीव बैलाचा बापलेकावर हल्ला, आठवड्याभरात दोन आधार हरपले

Maharashtra News LIVE Updates | मोठी बातमी ! आर्यन खानला अखेर जामीन

आधी भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आता पाळीव बैलाचा बापलेकावर हल्ला, आठवड्याभरात दोन आधार हरपले

(malegaon Samajwadi Party Sharif mansuri will join NCP And buldhana priya bondre will join Congress)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.