Bhandara | घनदाट जंगलात बिबट्याचा हल्ला, पण पोलिसांना आढळला नग्न मृतदेह; भंडारा जिल्ह्यात नेमकं काय घडलं ?

. जाळण्यासाठी लाकडे गोळ्या करण्याकरिता तिघांपैकी एका 50 वर्षीय व्यक्तीला बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. लाखांदूर तालुक्यातील दहेगाव जंगलात घडली असून मृतकाचे नाव प्रमोद नत्थुजी चौधरी असे आहे.

Bhandara |  घनदाट जंगलात बिबट्याचा हल्ला, पण पोलिसांना आढळला नग्न मृतदेह; भंडारा जिल्ह्यात नेमकं काय घडलं ?
प्रतिनिधीक फोटोImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 11:10 AM

भंडारा : बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेकजण जखमी तर काही लोकांचा मृत्यू झाल्याचे यापूर्वी तुम्ही ऐकले असेल. मात्र सध्या बिबट्याच्या (Leopard Attack) हल्ल्यात एका माणसाचा अतिशय विचित्र पद्धतीने मृत्यू झाला आहे. जाळण्यासाठी लाकडे गोळ्या करण्याकरिता तिघे जंगलात गेले होते. मात्र यातील एका 50 वर्षीय व्यक्तीला बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना लाखांदूर तालुक्यातील दहेगाव जंगलात घडली असून मृतकाचे नाव प्रमोद नत्थुजी चौधरी असे आहे. बिबट्याच्या या हल्ल्यात प्रमोद चौधरी यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे मात्र त्यांचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला आहे. बिबट्याने मृतदेह (Dead Body) ओढत नेला असावा, यामध्ये प्रमोद यांच्या अंगावरील कपडे फाटले असावेत असा अंदाज बांधला जात असून पोलीस (Police) पुढील तपास करत आहेत.

भंडाऱ्यामध्ये नेमकं काय घडलं ?

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे तीन सहकारी दहेगाव येथील जंगलात लाकूडफाटा गोळा करण्याकरिता गेले होते. मृतक प्रमोद चौधरी थोड्या अंतरावर दूर निघून आले होते. अशातच, दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने प्रमोद एकटे असल्याची संधी साधून त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यात प्रमोद यांचा मृत्यू झाला. थोड्या वेळाने प्रमोद यांच्या मित्रांनी त्यांना आवाज दिला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सोबत असलेल्या दोन सहकाऱ्यांनी प्रमोद यांच्या जवळ जावून त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मृतावस्थेत दिसले.

अडीच किमीपर्यंत फरफटत नेलं, मृतदेह नग्नावस्थेत आढळला 

या घटनेनंतर प्रमोद यांचे दोन्ही मित्र खूप घाबरले. त्यांनी तत्काळ लाखांदूर वण विभाग गाठले आणि वनपरिक्षेत्राधिकरी यांना संपूर्ण घटना सांगितली. ही घटना वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली असता घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वनविभागाचा चमु तत्काळ घटनास्थळी रवाना झाला. घटनास्थळी पोहोचले असता प्रत्यक्षदर्शींनी दाखविलेल्या जागी प्रमोद यांचा मृतदे नव्हता. त्यामुळे वन विभागाने मृतदेह शोधण्याची शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर प्रमोद यांच्यावर बिबट्याने हल्ला केला त्याच्या सुमारे 2.50 किमीच्या अंतरावर प्रमोद यांचे शव नग्न अवस्थेत मिळाले. यावरून, हल्ला चढवून सहकाऱ्यांच्या आवाजाने बिबट्या पळाला असावा. त्यानंतर सहकाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर बिबट्याने परत येऊन प्रमोद यांचा मृतदेह 2.50 किमी पर्यंत ओढत नेला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. पोलिस विभाग आणि वन विभागाने घटनेचा पंचनामा करून प्रमोद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात पाठविला आहे.

इतर बातम्या :

Aurangabad 30-30 Scam: आरोपी म्हणतो, आता मी ब्लॉक झालोय, डायरीत 300 कोटींच्या नोंदी, महाराष्ट्राबाहेरही एजंट!

अनैतिक संबंध ठेवलेल्या आईचं रुप मुलानं बिघतलं, प्रियकराकडून आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं!

जमावबंदी आदेश झुगारल्याचा फटका, गिरीश महाजनांसह 11 जणांवर गुन्हा, काय कारवाई होणार?

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.