Palghar | एमबीबीएसची विद्यार्थिनी सदिच्छा साने अद्याप बेपत्ताच, 21 उलटले तरी तरुणीचा शोध पोलिसांना अपयश

सदिच्छा नेहमीच कुटुंबाचा आधार होती. मात्र कुटुंबाचा आधारच मागील 21 दिवसांपासून बेपत्ता असल्याने साने कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत. सदिच्छाचं शेवटचं लोकेशन हे बांद्रा बॅंडस्टॅंड येथे दाखवत असून तिचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Palghar | एमबीबीएसची विद्यार्थिनी सदिच्छा साने अद्याप बेपत्ताच, 21 उलटले तरी तरुणीचा शोध पोलिसांना अपयश
एमबीबीएसची विद्यार्थिनी सदिच्छा साने 21 दिवसापासून बेपत्ता
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 7:26 PM

पालघर/ मोहम्मद हुसेन : एमबीबीएसचे शिक्षण घेणारी सदिच्छा साने मागील 21 दिवसांपासून बेपत्ता असून तिचा शोध घेण्यात अजूनही पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे सदिच्छाचे कुटुंबीय सध्या खूप चिंतेत आहेत. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवून सदिच्छाचा शोध घ्यावा अशी आर्त हाक सध्या साने कुटुंबीय देत आहेत. बोईसरमध्ये राहणारी सदिच्छा साने ही तरुणी मुंबई येथे एमबीबीएसची प्रीलियम परिक्षा देण्यासाठी गेली होती. मात्र अद्याप घरी परतलीच नाही.

एमबीबीएसची प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईला गेली होती

सदिच्छा मनिष साने ही डॉक्टरकी शिकणारी तरुणी 21 दिवसांपूर्वी प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईत गेली होती. मात्र ती घरी परतलीच नाही. सदिच्छा अशी एकाएकी बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदिच्छा साने ही 22 वर्षीय तरुणी बोईसर मधील गोदाराम बाग येथे राहत असून मुंबईतील जे जे कॉलेजला प्रिलीयमसाठी जाण्यास घरातून सकाळी 10 वाजताच्या सुमारास निघाली. मात्र सदिच्छा घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांकडून तिची शोधाशोध सुरू करण्यात आली. मात्र दुपारी 2 वाजता सुरू होणाऱ्या प्रीलियमच्या पेपरलाही सदिच्छा पोहचली नाही. तिचाही फोनही बंद येत असल्याची माहिती कुटुंबियांना तिच्या मैत्रिणींकडून देण्यात आली. त्यानंतर मात्र साने कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली आणि 29 नोव्हेंबर रोजी बोईसर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली गेली. सध्या हा पूर्ण तपास मुंबई पोलीस करीत आहेत.

सदिच्छाचं अपहरण झाल्याचा कुटुंबीयांना संशय

शालेय शिक्षणापासून सदिच्छा नेहमीच टॉपर राहिली असून तिला मिळणाऱ्या स्कॉलरशिप आणि बक्षीस यांच्यातच तिचा शिक्षणाचा खर्च भागत होता. सदिच्छा नेहमीच कुटुंबाचा आधार होती. मात्र कुटुंबाचा आधारच मागील 21 दिवसांपासून बेपत्ता असल्याने साने कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत. सदिच्छाचं शेवटचं लोकेशन हे बांद्रा बॅंडस्टॅंड येथे दाखवत असून तिचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी योग्य दखल घेऊन सदिच्छाचा शोध घ्यावा, अशी मागणी सदिच्छाच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. (MBBS student Sadichcha Sane has been missing for 21 days)

इतर बातम्या

Pune crime| पुण्यात टेकडीवर फिरायला गेलेल्या प्रेम युगलासोबत घडले असे काही की….

Hariyana Crime: चार वर्षाच्या मुलीसह पित्याची चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या, वाचा नेमके काय घडले ज्याने संपूर्ण हरियाणा हादरले