उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांच्या पोटात गोळा आला; राज ठाकरे यांचं त्याच शब्दात प्रत्युत्तर काय?

मी मध्यंतरी गजानन मेहंदळे यांना भेटलो. त्यांना या सात वीरांच्या नावांविषयी विचारलं. मेहंदळे सर म्हणाले. ते सात होते की आठ होते असं कुठंही लिहिलं नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांच्या पोटात गोळा आला; राज ठाकरे यांचं त्याच शब्दात प्रत्युत्तर काय?
उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांच्या पोटात गोळा आला; राज ठाकरे यांचं त्याच शब्दात प्रत्युत्तर काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 12:42 PM

सिंधुदुर्ग : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून टीका केली होती. तेव्हा आजारी होता. आता बरं बाहेर पडलात, अशा शब्दात राज यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर मी बाहेर फिरत असल्याने काही लोकांच्या पोटात गोळा आल्याचा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या हल्ल्याला राज ठाकरे यांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. पक्षातील मतभेद दूर करून कार्यकर्त्यांना पुन्हा पक्ष बांधणीच्या कामाला उभं करण्यासाठी ते या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. राज यांना उद्धव ठाकरे यांच्या टीकेबद्दलही विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं. नाही. माझ्या पोटात गोळाबिळा काही नाही. हे बाहेर पडल्याने माझ्या पोटात गोळा कशाला येईल? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

यावेळी त्यांनी समान नागरी कायद्यावरही भाष्य केलं. समान नागरी कायदा असा महाराष्ट्रात आणता येत नाही. तो देशात आणता येतो. एका राज्यासाठी कायदा नसतो. हा कायदा देशभरात लागू करण्याचं केंद्र ठरवतं. त्यानंतर संपूर्ण राज्यांना हा कायदा लागू होतो. तो आला पाहिजे. ही आमची पहिल्यापासून मागणी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे आशीर्वाद मिळणं मोठी गोष्ट आहे. त्यांना यापूर्वीही भेटलो होतो. त्यांच्याकडे माझं काही काम नव्हतं. माझ्याकडेही त्यांचं काही काम नव्हतं. त्यांना सहजच भेटलो. यावेळी इतिहासावरच्या चर्चा झाल्या, असं त्यांनी सांगितलं.

जयसिंग पवारांना माझा स्पष्टवक्तेपणा रोखठोक स्वभाव आवडला. या लोकांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. सध्या इतिहास जातीतून पाहण्याचं पेव सुटलं आहे. तेही ठरावीक लोक हे काम करत आहेत. यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ आहे, असं ते म्हणाले.

वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमावेळी मी आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर होतो. या सिनेमाच्या दिग्दर्शकाने या सहा वीरांची नावे फेसबुकवर टाकली. काही लोकांनी वेगळी नाव सूचवली. असं काही इतिहासाबाबत होतं. तेव्हा मला कुतुहूल वाटत असतं. त्यावेळी मी या तज्ज्ञ मंडळींशी बोलून माहिती घेत असतो, असं त्यांनी सांगितलं.

मी मध्यंतरी गजानन मेहंदळे यांना भेटलो. त्यांना या सात वीरांच्या नावांविषयी विचारलं. मेहंदळे सर म्हणाले. ते सात होते की आठ होते असं कुठंही लिहिलं नाही. प्रतापराव गुजरांबरोबर कोण कोण होते. याचा काहीही दाखला नाही. आतापर्यंत जी नावं ऐकली ती काल्पनिक आहे. शिवाजी महाराजांनी गुजरांना पत्र पाठवलं. ते पत्रं अजूनही सापडलेलं नाही.

पत्र पाठवलं असा फक्त उल्लेख आहे. त्या लढाईचाही कुठेही संदर्भ नाही. जयसिंग पवारही यांनीही मेहंदळे सर बरोबर सांगत असल्याचं सांगितलं. त्या वीरांचा, पत्राचा आणि लढाईचा कुठेही संदर्भ नाही, असं त्यांनीही सांगितलं, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.