VIDEO: बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थकांचे राजीनामे, तर दुसरीकडे राणे समर्थकांचा जल्लोष

बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थक राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे राणे समर्थक नारायण राणे यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदानिमित्त जल्लोष करताना दिसत आहेत.

VIDEO: बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थकांचे राजीनामे, तर दुसरीकडे राणे समर्थकांचा जल्लोष
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 12:15 AM

बीड : खासदार प्रीतम मुंडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न दिल्यानं मुंडे समर्थकांमध्ये चांगलीच नाराजी निर्माण झालीय. त्यामुळेच बीडसह राज्यातील अनेक ठिकाणी मुंडे समर्थक भाजप पदाधिकारी आपल्या पक्षीय पदांचा राजीनामा देत आहेत. बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थक राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे राणे समर्थक नारायण राणे यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदानिमित्त जल्लोष करताना दिसत आहेत. त्यामुळे हा जल्लोष मुंडे समर्थकांच्या जखमेवरील खपली काढण्याचा तर प्रकार नाही ना अशी चर्चा होतेय. त्यामुळे बीडमधील राजकीय पारा चांगलाच चढलाय (Munde supporter angry but Narayan Rane supporter celebrate in Beed).

राणे समर्थकांकडून बीडमध्ये गुलाल उधळून फटाके फोडत घोषणाबाजी

बीडमध्ये नारायण राणे यांच्या काही समर्थकांनी रस्त्यावर गाडी उभी करत जोरदार घोषणाबाजी केली. यात ‘राणे साहेबांचा विजय असो’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राणे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘निलेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच गुलाल उधळत, एकमेकांना गुलाल लावण्यात आला. इतकंच नाही, तर फटाक्यांची लडही फोडण्यात आली.

प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात डावलले असताना राणे समर्थकांनी केलेल्या या जल्लोषानंतर मुंडे समर्थकांमधील नाराजी आणखीच वाढलीय. त्यामुळे बीडमधील राजकीय वातारवण तणावपूर्ण झालंय.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

मोठी बातमी ! पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी, बीडमध्ये भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांचे राजीनामे

मुंडे भगिनी समर्थकांमधील नाराजीचे लोण आता अहमदनगरपर्यंत, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापतींचा राजीनामा

मी आणि कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवलं, पंकजा यांनी मांडलेली भूमिका हीच भाजपची भूमिका: फडणवीस

Munde supporter angry but Narayan Rane supporter celebrate in Beed

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.