मैत्रिणीच्या आत्महत्येमुळे डॉक्टर पत्नीनेही जीवन संपवलं? ग्रुपमधल्या इतरांनाही धक्का, नांदेडच्या आत्महत्यांचं गूढ उकलेना!

लोक आत्महत्या का करतात, आयुष्य एकदाच मिळतं, असं सकारात्मक वक्तव्य अनुपा मापारे यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांनी असं एकाएकी टोकाचं पाऊल उचलल्याने मैत्रिणींनाही जबरदस्त धक्का बसला आहे.

मैत्रिणीच्या आत्महत्येमुळे डॉक्टर पत्नीनेही जीवन संपवलं? ग्रुपमधल्या इतरांनाही धक्का, नांदेडच्या आत्महत्यांचं गूढ उकलेना!
नांदेडमध्ये दोन महिलांच्या आत्महत्येने खळबळ
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 3:36 PM

नांदेड: शहरातील दोन उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील महिलांनी एकाएकी (Nanded Suicide) आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे. या दोन्ही महिलांनी आत्महत्या का केली असावी, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यापैकी एका महिलेने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी (Suicide note) लिहून ठेवली असून त्यातील मजकूर जाहीर करण्यास पोलीसांनी नकार दिला आहे. सदर महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पतीला ताब्यात घेतले असून दुसऱ्या एका घटनेत डॉक्टरच्या पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. या घटनेतदेखील मैत्रिणीच्या आत्महत्येमुळे नैराश्यात गेल्याने महिलेने जीवन संपवले, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी (Nanded police) वर्तवला आहे. तरीही याकरिता कोणतेही सबळ पुरावे समोर आलेले नाहीत.

गळफासाच्या दोन घटनांनी नांदेड हादरलं

1- नांदेडमधील आत्महत्येची पहिली घटना विवेकनगर भागात घडली. शिल्पा जीरोनकर या महिलेचे पती गजानन जीरोनकर हे व्यवसायाने वकील आहेत. शुक्रवारी पत्नी शिल्पा जीरोनकर यांचा मृतदेह बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे या दिवशी शिल्पा यांच्या मुलाचा वाढदिवस होता. त्याची पूर्ण तयारीही करण्यात आळी होती. मात्र याच दिवशी शिल्पाने बाथरुममधल्या शॉवरला गळफास घेत आत्महत्या केली. शिल्पाने आत्महत्येपूर्वी जे पत्र लिहिलं, त्यातील मजकूर उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. मात्र मयत शिल्पाच्या भावाने पैशांसाठी तिचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात असल्याची तक्रार दिली. त्यामुळे पुोलिसांनी शिल्पाच्या पतीला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे. 2- आत्महत्येची दुसरी घटना उच्चभ्रू वस्तीतील शिवाजीनगरची आहे. शहरातील प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ असलेल्या अर्जुन मापारे यांच्या यांच्या सुनेने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. सागर मापारे हे दंतरोग तज्ज्ञ असून पत्नी अनुपा यांनी आत्महत्या केली. दुपारी अनुपा यानी मुलांना खायला घालून त्या आपल्या रुममध्ये गेल्या. आई बराच वेळ झाला तरी बहारे आली नसल्याने मुलांनी दरवाजा ठोठवला तेव्हा अनुपा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. अनुपा यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी अनुपा यांच्या मैत्रिणीने आत्महत्या केली होती. त्यानंतर अनुपा यांनी नैराश्यातून जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे.

अनुपा यांच्या आत्महत्येनं मैत्रिणींनाही धक्का

अनुपा मापारे यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी घेतली, परंतु अनुपा या असं काही करू शकतात, यावर मैत्रिणींचा विश्वास बसलेला नाही. काही दिवसांपूर्वी अनुपा मापारे यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने आत्महत्या केली होती. त्यावेळी गप्पा मारताना, लोक आत्महत्या का करतात, आयुष्य एकदाच मिळतं, असं सकारात्मक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांनी असं एकाएकी टोकाचं पाऊल उचलल्याने मैत्रिणींनाही जबरदस्त धक्का बसला आहे.

इतर बातम्या-

ओवेसींवर गोळ्या झाडणारे हल्लेखोर कोण? किती जण घेतले ताब्यात? अमित शाह यांनी दिलं उत्तर

Untimely Rain : अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, तरीही उत्पादन वाढीसाठी कृषितज्ञांचा काय आहे सल्ला ?

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.