Nanded | इंग्रजी शाळेतून विद्यार्थ्यांची गच्छंती, नांदेड जिल्ह्यात 4,111 विद्यार्थी जि.प. शाळेत दाखल, काय आहेत कारणं?

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक गुणवत्तापूर्ण होतील यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणसंस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या बैठका घेऊन अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग सुरू केले आहेत.

Nanded | इंग्रजी शाळेतून विद्यार्थ्यांची गच्छंती, नांदेड जिल्ह्यात 4,111 विद्यार्थी जि.प. शाळेत दाखल, काय आहेत कारणं?
नांदेडमध्ये जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 11:00 AM

नांदेड : आपलं पाल्य इंग्रजी शाळेतच (English Schools) शिकलं पाहिजे असा अनेक पालकांचा अट्टहास असतो. मात्र नांदेडमध्ये काहीशी उलट स्थिती समोर आली आहे. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा दाखला (Students Admissions) इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून टाकण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत (ZP Schools) प्रवेश देण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अशी स्थिती दिसून येत आहे. कोरोना काळात इंग्रजी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळांनीही ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबवले. त्याचाच हा परिणाम असावा, असे म्हटले जात आहे. जिल्ह्यात 4,111 विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांमधून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिली.

नव-नवीन प्रयोगांनी शिक्षणातून आनंद

कोरोना काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांना वाईट दिवस आलेयत. अनेक नागरिकांचे उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने पालकांनी आपल्याला मुलांना इंग्रजी शाळेतून काढून सरकारी शाळेत प्रवेश दिलाय. त्यातच नांदेडमध्ये कोविड काळात विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग राबवून जिल्हा परिषदेने इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये वळविले आहेत. जिल्ह्यात 4,111 विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांमधून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक गुणवत्तापूर्ण होतील यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणसंस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या बैठका घेऊन अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग सुरू केले आहेत. अलीकडे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याने इंग्रजी माध्यमातून शिकलं पाहिजे असे वाटू लागल्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली होती. परंतु पुरेशा शिक्षित मनुष्यबळाचा अभाव आणि इतर शैक्षणिक साधन सुविधांचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थी रमेनासे झाले होते.

लोह्यात सर्वाधिक विद्यार्थी प्रवेश

कोविडच्या काळात अनेक इंग्रजी शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या तंत्रस्नेही शिक्षकांनी गृहभेटी, ग्रह अभ्यास ,व्हर्च्युअल पद्धतीने शिक्षण, नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्यामुळे इंग्रजी शाळांमधून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आले आहेत. हदगाव ,मुखेड आणि लोहा तालुक्यामध्ये जास्त प्रमाणावर विद्यार्थी मराठी शाळेत प्रवेशित झाले आहेत.

कोणत्या तालुक्यात किती विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला?

हदगाव 1041, मुखेड 525, लोहा 464,कंधार 341, मुदखेड 111, नायगाव 354 ,उमरी 288 ,भोकर 177, धर्माबाद 116 ,बिलोली 61, देगलूर 60,अर्धापूर 98, नांदेड 43, हिमायतनगर 325, किनवट 246, माहूर 299 असा मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे. यात भविष्यात आणखीन वाढ होईल असा अंदाज शिक्षण तज्ञ व्यक्त करतायत.

इतर बातम्या-

Marathwada Weather: मराठवाड्यात हवामानाचा चकव्याचा खेळ, 8 दिवसात पारा 40 वरून 30 पर्यंत, काय आहे अंदाज?

Mumbai Water : यंदा मुंबईकरांना पाणी कपातीचे टेन्शन नाही, पुढच्या 5 महिन्यांचा पाणीसाठा शिल्लक!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.