VIDEO: कुठलं सरकार? आता कुठं डिस्चार्ज झालाय घरातून, फिरताहेत; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज तळीये दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली. (narayan rane)

VIDEO: कुठलं सरकार? आता कुठं डिस्चार्ज झालाय घरातून, फिरताहेत; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
narayan rane
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 12:56 PM

महाड: केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज तळीये दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली. आता कुठे त्यांना घरातून डिस्चार्ज मिळाला आहे. आता फिरत आहेत, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर नाव न घेता केली. (narayan rane slams cm uddhav thackeray over landslide and flood situation in maharashtra)

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारशी तुमचं काही बोलणं झालं का? असा सवाल राणेंना यावेळी करण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांचं नाव न घेता टीका केली. कुठलं सरकार? महाराष्ट्र सरकारचे लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे डिस्चार्ज झालाय घरातून आता फिरत आहेत, अशी टीका राणे यांनी केली.

आरोप करणं योग्य नाही

कोकणात वारंवार पूरस्थिती होती. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी एनडीआरएफची तुकडी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ते म्हणाले. या घटनेची कुणालाही कल्पना नव्हती. असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. डोंगराची माती खाली येईल किंवा डोंगराचा कडा कोसळेल असं कुणाला वाटलं नव्हतं. त्यामुळे या घटनेवरून कुणावर आरोप करणं योग्य नाही. आज या दुर्घटनाग्रस्तांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे, असंही ते म्हणाले.

पक्की घरं देणार

तळीये दुर्घटनेत 87 लोक गेल्याचं कळतं. 44 मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. अधिकारी-कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याने मदत दिली आहे. या मदतीच्या पलिकडे मदत होणार नाही असं नाही. या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार आहे. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल, असं राणे म्हणाले.

गावकऱ्यांच्या इच्छेनुसार पुनर्वसन

या गावातच आपलं पुनर्वसन व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्पुरती वसाहत तयार करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक लोक सांगतील तिथे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्राकडूनही स्थानिकांना मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सर्व घटनेची माहिती दिली जाईल. नुकसानीचं स्वरुप सांगितलं जाईल. त्यांनीही मला या भागाची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितलं आहे, असं त्यांनी सांगितलं. (narayan rane slams cm uddhav thackeray over landslide and flood situation in maharashtra)

संबंधित बातम्या:

तळीयेतील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं बांधून देणार; नारायण राणे यांची घोषणा

मृतदेह बाहेर काढणं महत्त्वाचं, राजकारण वा टीका करण्याची वेळ नाही: देवेंद्र फडणवीस

सांगलीतील पूरग्रस्तांपेक्षा लवकरच मदत देण्यात आलीय; संजय राऊतांचा विरोधकांना टोला

(narayan rane slams cm uddhav thackeray over landslide and flood situation in maharashtra)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.