Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धवजी, तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग होतंय, तुमच्या लोकप्रतिनिधींची गुप्तपणे माहिती घ्या; राणेंचा स्टेजवरच दावा

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी स्टेजवरच मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंकडे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची तक्रार केली. (Narayan Rane)

उद्धवजी, तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग होतंय, तुमच्या लोकप्रतिनिधींची गुप्तपणे माहिती घ्या; राणेंचा स्टेजवरच दावा
narayan rane
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 2:28 PM

सिंधुदुर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी स्टेजवरच मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंकडे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची तक्रार केली. उद्धवजी, तुम्हाला चुकीची माहिती ब्रीफिंग केली जात आहे. त्यात सत्य नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात याची मााहिती तुम्ही गुप्तपणे घ्या, असं नारायण राणे म्हणाले.

चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी संबोधित करताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे आवाहन केलं. उद्धवजी, तुम्हाला सर्व माहिती मिळते. तुम्हाला ब्रीफ होतं. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात याची माहिती घ्या. तुम्हाला सत्य कळेल, असं सांगतानाच बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू, असं राणे म्हणाले.

कळलंच नाही कार्यक्रम कुणाचा?

स्टेजवर आल्यावर कळलंच नाही कार्यक्रम कुणाचा? मला आजच कळलं विमानतळाचा मालक कोण? वीरेंद्र म्हस्कर गेले आणि दुसरे आले. स्टेजवर आलो आणि विनायक राऊतांनी सांगितल, म्हटलं कार्यक्रम कुणाचा, एमआयडीसीचा आहे, म्हस्कर साहेबांचा आहे, काय चाललंय? काय प्रोटोकॉल आहे की नाही? काय प्रोटोकल काय? मानसन्मान घ्या. पण प्रोटोकॉल जरुर पाळा. जनता तुम्हाला सन्मान देईलच, असं त्यांनी सांगितलं.

पेढ्याचा गुणधर्म घ्या

यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांना टोला लगावला. विनायक राऊत पेढे द्यायला आले. मी अर्धा पेढा घेतला. मी त्यांना म्हणालो पेढ्याचा गुणधर्म गोड आहे. तो गुणधर्म आत्मसात करा. बोलायचं तेव्हा हसत बोला. विचारातून माणसांची मतं जिंकता येतात हे मी सांगायला नको. असो, सर्व मंत्री आलेत. सिंधुदुर्गात वाहतूक-विमान सुरु करायला. त्यांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. विमानतळाच्या आजूबाजूला सौंदर्य मिळावं यासाठी खर्च करा, अशी विनंती अर्थमंत्री अजित पवारांना करतो. इतथल्या लोकांना चांगला रोजगार मिळेल. त्यांना उभं करण्याचं काम आम्ही सगळेच करू, असं त्यांनी सांगितलं.

मी निमित्त मात्र

साहेबांचे आशिर्वाद होते, त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, त्यांना रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी 120 कोटी दिले. त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी 118 कोटी रुपये दिले. जिल्ह्याला 80-90 लाख यायचे मी ते 100 कोटी दिले. सुविधांसाठी कारणीभूत नारायण राणे आहे, दुसरा कोणी जवळ येऊच शकत नाही. इथल्या शाळा वर्ग, इथे मी एकाचवेळी 340 शिक्षक आणले, राज्यात पहिल्या टॉपमध्ये सिंधुदुर्गातील विद्यार्थी होते. त्याला कारणीभूत कोण हे जनतेला माहितीय त्याचे श्रेय़ मी घेत नाही, त्यावेळी शिवसेनेत होतो, साहेबांचं श्रेय होतं मी निमित्त होतो. जसं सचिन बॅटिगं करतो. पण स्वत: श्रेय घेत नाही. स्कोर केला ते बॅटने केला असं तो सांगतो. तसंच मी काही केलं नाही. मला शिवसेनाप्रमुखांनी संधी दिली. मी केवळ निमित्त मात्र ठरलो, असंही त्यांनी सांगितलं.

त्यावेळी आंदोलनं कोणी केली?

उद्ववजी विनंती आहे. याच जागेवर मी भूमिपूजन करायला आलो. त्यावेळी आंदोलन होत होतं. भूमिपसंपादन करून देणार नाही. आम्हाला विमानतळ नको. आपल्या त्यावेळच्या राजवटीत मी मंजूर केलं. किती विरोध किती विरोध… मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आज हायवे. अजित पवारांनी नाव घेतलं. हा हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आमचं काय भागवा आणि रस्ता सुरू करा. कोण अडवत होतं. विचारा जरा. सीवर्डसाठी अजित पवारांनी 100 कोटी दिलं. काय झालं हो. कोणी सीवर्ड कॅन्सल केलं. भांडं काय फोडायचं किती फोडायचं. तुम्ही समजतात तसं नाहीये. म्हणून परिस्थिती बदलतेय, असंही त्यांनी सांगितलं.

आदित्य माझ्यासाठी टॅक्स फ्रि

तुम्ही आलात हे बरं वाटलं. आनंद वाटलं. सन्मानिय आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी अभ्यास करावा. त्यांनी टाटाचा रिपोर्ट वाचावा. आदित्य माझ्यासाठी टॅक्स फ्रि आहे. मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

राणे मुख्यमंत्र्यांच्या समोर पहिल्यांदाच म्हणाले, उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केला

Sindhudurg chipi airport | तब्बल 16 वर्षांनी एकाच मंचावर, शेजारी-शेजारी खुर्ची, तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे व्यासपीठावर एकत्र, रामदास आठवलेंची भन्नाट चारोळी, म्हणाले…

(narayan rane slams cm uddhav thackeray over shiv sena mp-mla)

'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.