AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावच्या जामनेर पंचायत समितीत कोट्यवधींचा घोटाळा, राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप, उपोषण सुरु

जामनेर येथील पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध शासकीय योजनांमध्ये अफरातफर करून कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे (NCP allegation of corruption on jalgaon jamner panchayat samiti officers).

जळगावच्या जामनेर पंचायत समितीत कोट्यवधींचा घोटाळा, राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप, उपोषण सुरु
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 9:01 PM

जळगाव : जामनेर येथील पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध शासकीय योजनांमध्ये अफरातफर करून कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार केला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. संबंधित गैरव्यवहाराची चौकशी झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु आहे (NCP allegation of corruption on jalgaon jamner panchayat samiti officers).

राष्ट्रवादी काँग्रेसकडून गंभीर आरोप

जामनेर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपची सत्ता आहे. त्याठिकाणी सिंचन विहिरींची निवड बेकायदेशीरपणे करून शासनाचा निधी लाटण्यात आला आहे. याशिवाय जामनेर पंचायत समितीत काही अधिकारी हे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. त्यांना भाजपचे आमदार गिरीश महाजन यांचे पाठबळ असल्याने ते त्यांच्या इशाऱ्यावर कामे करतात, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे (NCP allegation of corruption on jalgaon jamner panchayat samiti officers).

अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक पालवे यांनी प्रशासकपदी असताना फत्तेपूर, ग्रुप ग्रामपंचायत गोद्री आणि जळांद्री येथे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार केला आहे. या साऱ्या प्रकारची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संजय गरुड यांनी केली.

भाजपची नेमकी भूमिका काय?

याप्रकरणी भाजपची भूमिका जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. भाजपाच्या माजी सभापती निता पाटील यांनी उपोषण हे नौटंकी आहे, असा आरोप केला आहे. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यांनी चौकशी करावी. आम्ही त्यास समोरं जाण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा : राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण टिकलं नाही, गोलमेज परिषदेत प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.