शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का, धुळ्यातील बड्या नेत्याची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी?; आज घोषणा करणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच कार्यालय कोणाच्या ताब्यात राहणार? यावरून गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहे. अनिल गोटे यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयातील त्यांचे साहित्य काढून नेले.

शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का, धुळ्यातील बड्या नेत्याची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी?; आज घोषणा करणार
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 8:39 AM

धुळे | 9 ऑगस्ट 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 40 आमदारांनी सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. आमदारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसलेला आहे. पक्ष सावरण्यासाठी आणि पक्षाचा ताबा आपल्याकडेच राहावा म्हणून शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतलेली आहे. एकीकडे शरद पवार गटाचा पक्ष सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या धुळ्यातील एका बड्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती आहे. हा नेता आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा करणार आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि धुळ्यातील बडे प्रस्थ असलेले अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अनिल गोटे यांनी गेल्या गुरुवारीच राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून अनिल गोटे यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. अनिल गोटे आज पत्रकार परिषद घेऊन या राजीनाम्याची अधिकृत माहिती देणार आहेत. तसेच राजनीमा का दिला याची माहितीही देणार असून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. याशिवाय कोणत्या पक्षात जाणार याची माहितीही गोटे आज देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

कार्यालयासाठी दोन गट आमनेसामने

दरम्यान, अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच शरद पवार आणि अजितदादा गट राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दावा सांगण्यासाठी आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत या कार्यालयावर आपला दावा ठोकला. शेवटी पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या कार्यालयाला दोन्ही गटातल्या लोकांनी कार्यालयाला आपापले कुलूप लावले आणि पक्ष श्रेष्ठ सांगतील तो निर्णय मान्य करण्याचे ठरवण्यात आले. मात्र रात्री उशिरा दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आपल्या ताब्यात असल्याचा दावा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.

कार्यालयाचे कुलूप तोडले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच कार्यालय कोणाच्या ताब्यात राहणार? यावरून गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहे. अनिल गोटे यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयातील त्यांचे साहित्य काढून नेले. त्यानंतर शरद पवार समर्थकांनी पक्ष कार्यालयाला भेट दिली. ते भेट देऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी अजित पवार समर्थक आले. त्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडत ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस शरद पवार समर्थक त्या ठिकाणी धडकले आणि दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली. बराच वेळ हा वाद सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना आपापली कुलूप कार्यालयाला लावत वादावर परडा पडला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची कुलूप तोडत अजित पवार गटाने ताबा घेतल्यानंतर या ठिकाणी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष रणजीत राजे हे आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले. त्यांनी देखील या कार्यालयावर आमचा दावा असल्याचं सांगत सारंग भावसार हे साधे राष्ट्रवादीचे सदस्य देखील नाहीत. आपण ताबा कसा घेतला? असा प्रश्न केला.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात शाब्दिक वाद झाले. सुमारे दोन तासाच्या वादा नंतर सामंजस्याने हा वाद वरिष्ठ स्तरावरून मिटवण्यात येईल असे चर्चेत ठरले. या ठिकाणी बेकायदेशीर रित्या दुसऱ्या गटाने प्रवेश केल्याचा निषेध केला आणि वरिष्ठ स्तरावर निर्णय झाल्यानंतर कुलूप करण्यात येईल असे स्पष्ट केलं. तर सारांश भावसार यांनी या ठिकाणी आम्ही ताबा घेतला होता मात्र आता वरिष्ठ स्तरावर निर्णय झाल्यानंतर निर्णय घेऊ असं सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.