“बंडातात्यांच्या पाठीमागचा बोलावता धनी दुसराच”, मुलाबद्दल वक्तव्यामुळं बाळासाहेब पाटील अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, मिटकरींची ट्विटद्वारे टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय.

बंडातात्यांच्या पाठीमागचा बोलावता धनी दुसराच, मुलाबद्दल वक्तव्यामुळं बाळासाहेब पाटील अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, मिटकरींची ट्विटद्वारे टीका
बाळासाहेब पाटील बंडातात्या कराडकर
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 6:59 AM

सातारा : कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मोठा गदारोळ उडालेला होता. बंडातात्या कराडकर यांनी त्यावेळी बोलताना राजकीय नेत्यांच्या मुलांबद्दल देखील वक्तव्य केलं होतं. दिवंगत नेते पंतगराव कदम यांचा मुलगा अभिजित कदम याच्या अपघाती निधनाबद्दल आणि सहकारमंत्री आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या मुलाबद्दल देखील बंडातात्या कराडकर यांनी वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन कराडकर यांच्यावर निशाणा साधलाय.

बंडातात्या कराडकर यांचा बोलविता धनी वेगळाच

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्री बाबत केलेल्या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बाबत केलेले वक्तव्याचा निषेध होणारच आहे. त्यावेळी स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या मुला बाबतही त्यांनी वक्तव्य केल्यानंतर स्वतः माझ्या मुलाच्या बाबतही दारू पिण्यावर बेताल वक्तव्य केले होते, असं बाळासाहेब पाटील म्हणाले. बंडातात्यांना कल्पना आहे की मागील सात वर्षापासून माझा मुलगा पंढरीची वारी करत आहे, अस असताना चुकीचा आरोप त्यांनी केला याबाबत माझ्या मुलाने बंडातात्या कराडकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. अब्रुनुकसानीच्या दावा दाखल करण्यासंदर्भात त्या पद्धतीने निर्णय सुरू आहे. बंडातात्या कराडकर यांनी जरी दिलगिरी व्यक्त केली असली तरी वकिलांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार आहे. मात्र, महिलांबाबत असले वक्तव्य त्यांनी केलं आहे. हे सुद्धा आक्षेपार्ह आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र या मागचा बोलवता दुसरा कोण तरी आहे, असे मत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी टीव्ही 9 मराठी बोलताना व्यक्त केले आहे.

बाळासाहेब पाटील नेमकं काय म्हणाले?

अमोल मिटकरी यांचं ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यासंदर्भात ट्विट करुन टीका केली आहे.

अनावधानाने बोललो, सर्वांची माफी मागतो; बंडातात्या कराडकरांची जाहीर दिलगीरी

बाळासाहेबांच्या बरोबर मी ज्या लोकांबद्दल नाव घेतली. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस नाही किंवा त्यांचा द्वेष करत नाही. राजकीय हेतूने हे आरोप केले नाहीत. ज्या चार लोकांवर मी आरोप केले त्यांचीच नव्हे तर इतर लोकांचीही माफी मागत आहे. माझं विधान अनावधानाने झालं आहे. त्याबद्दल मी क्षमा मागत आहे, असं बंडातात्या कराडकर यांनी सांगितलं. पोलीस त्यांची ड्युटी करतील. त्यांना आदेश आहेत त्याप्रमाणे ते मला ताब्यात घेतील. आम्ही अटक करून घेऊ, असंही कराडकर यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

बंडातात्या कराडकार यांच्या याच वक्तव्याने मोठा वाद, ऐका नेमकं काय म्हणाले बंडातात्या…

Bandatatya Karadkar: पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे निर्व्यसनी, सदाचारी; बंडातात्या कराडकर यांना उपरती

NCP Leader Balasaheb Patil said he will file defamation case against Bandatatya Karadkar

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.