Video : आमदार राजू कारेमोरे यांच्याकडून PWD कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, अश्लील भाषा असणारा व्हिडीओ व्हायरल
पोलीस ठाण्यात जाऊन धिंगाणा घालून पोलिसांना अश्लील शिवीगाळ करणारे भंडाऱ्याचे (Bhandara) तुमसरचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : पोलीस ठाण्यात जाऊन धिंगाणा घालून पोलिसांना अश्लील शिवीगाळ करणारे भंडाऱ्याचे (Bhandara) तुमसरचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आमदार कारेमोरे यांच्याकडून पुन्हा शासकीय कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. कारेमोरे यांचा आणखी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भंडारा जिल्ह्यात ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. भंडारा जिल्हाच्या तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रावादी चे आमदार राजू कारेमोरे यांच्या पुन्हा अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत शिविगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मोहाड़ी तालुक्यातील (Mohadi) धोप गावातील खराब रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी व कंत्राटदाराला जाब विचारतांना पुन्हा आमदार कारेमोरे जीभ घसरली आहे. आता या प्रकरणी राजू कारेमोरे यांच्याविरोधात प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.
नेमकं प्रकरण
राजू कारेमोरे यांनी यापूर्वी नववर्षाच्या सुरुवातीला पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली होती. कारेमोरे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता बांधकाम विभागातील कर्मचारी कंत्राटदाराला अश्लील भाषेत शिविगाळ करतांना त्यांच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मोहाड़ी तालुक्यातील धोप गावातील खराब रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी व कंत्राटदाराला जाब विचारतांना पुन्हा आमदार कारेमोरे यांची जीभ घसरली आहे. राजू कारमोरे यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं जिल्ह्यात चर्चेचं वादळ उठलं आहे.
पाहा व्हिडीओ:
31 डिसेंबरच्या रात्री पोलिसांना शिवीगाळ
राजू कारेमोरे यांनी 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलीस ठाण्यात पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत धिंगाणा घातला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर कारेमोरे यांनी माफीही मागितली होती. मात्र सरकारी अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी कारेमोरे यांना अटक केली होती. पोलीस शिवागाळ प्रकरणी 12 तासाची तुरुंगाची हवा खाऊन अंतरिम जामिनावर सुटलेल्या आमदारांच्या अजुन सुद्धा कायद्याचा धाक नसल्याचे समोर आले आहे.
लग्नात ठेका धरतानाचा व्हिडीओ व्हायरल
आमदार राजू कारेमोरे यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ते एका लग्नात गाण्यावर ठेका धरतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
इतर बातम्या:
नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग कोर्ट निर्णय देणार?