AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात नवीन विशेष पाहुणा दाखल! समस्याग्रस्त वन्यजीवाला जवळून करता येणार बेशुद्ध

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला उपयोगी वाहन मिळाले. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षात हे वाहन उपयोगी ठरणार आहे. या खास रचना केलेल्या चारचाकी वाहनात बचाव दलाच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात नवीन विशेष पाहुणा दाखल! समस्याग्रस्त वन्यजीवाला जवळून करता येणार बेशुद्ध
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दाखल झालेले हेच ते नवीन वाहन.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 3:14 PM

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला (Tadoba-Dark Tiger Project) एक उपयोगी वाहन भेट स्वरूपात मिळाले. या वाहनाचा उपयोग करून जंगलाच्या दुर्गम भागात जाता येणार आहे. समस्याग्रस्त वन्यजीवाला जवळून बेशुद्ध करता येण्याची सोय झाली आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षात (Human-Wildlife Conflict) हे वाहन विशेष सहाय्यभूत ठरणार आहे. या खास रचना केलेल्या चारचाकी वाहनात बचाव दलाच्या सुरक्षेची (Rescue Security) खास काळजी घेण्यात आली आहे. असे पहिले वाहन ताडोबाच्या सेवेत दाखल दाखल झाले आहे. या वाहनांची उपयोगिता पाहून अन्य व्याघ्र प्रकल्पात अशी वाहने समाविष्ट केली जाणार आहेत. मानव-वन्यजीव संघर्षामुळे अनेक वेळा वाघांना जेरबंद करणे आवश्यक असते. मात्र वाघ पकडण्याची ही मोहीम अनेक वेळा दीर्घकाळ चालते. यामुळे श्रम-पैसा आणि वेळ यांचा खूप अपव्यय होतो. सोबतच वाघ पकडायला वेळ लागल्यास ती वाघ किंवा माणसांच्या जीवावर बेतू शकते.

डार्ट मारून बेशुद्ध करण्याची प्रचलित पद्धत

वाघ पकडण्यासाठी सध्याची प्रचलित पद्धत म्हणजे वाघाला डार्ट मारून बेशुद्ध करणे. यासाठी पाळीव प्राणी एखाद्या ठिकाणी बांधून वाघ त्या पाळीव प्राण्याची शिकार करेल याची वाट पहावी लागते. मग वाघ ती शिकार खाण्यात गुंग असला की त्याला डार्ट मारला जातो. मात्र वाघ जर आक्रमक झाला किंवा तो जर अडचणींच्या जागेवर असेल तर त्याला डार्ट मारता येत नाही.

विशेष वाहन डिझाईन

मात्र आता या समस्येवर उपाय म्हणून हे विशेष वाहन डिझाईन करण्यात आले आहे. या वाहनांच्या सहाय्याने थेट वाघ जिथे आहे तिथे जाऊन त्याला बेशुद्ध करता येणार आहे. हे वाहन जंगलातल्या कुठल्याही दुर्गम भागात, कुठल्याही ऋतूत काम करू शकणार आहे, प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव) सुनील लिमये यांनी सांगितलं. जंगलाच्या दुर्गम भागात जाऊन समस्याग्रस्त वन्यजीवाला जवळून बेशुद्ध करता येण्याची सोय राहणार आहे. पहिले वाहन ताडोबाच्या सेवेत दाखल झाले आहे. या वाहनांची उपयोगिता पाहून अन्य व्याघ्र प्रकल्पात वाहने समाविष्ट करण्यात येणार आहेत.

ओबीसी आरक्षणावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक! अध्यक्ष तायवाडे यांनी सांगितलं पुढील पाऊल काय असणार

ओबीसी संदर्भातील कायद्यावर सोमवारी चर्चेची शक्यता, विजय वडेट्टीवारांनी आणखी काय सांगितलं?

Video – खासदार रामदास तडस कुस्तीच्या आखाड्यात उतरतात तेव्हा… देवळीत खेळाडूंचा घेतला सराव!

गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.