कॉलेजच्या आवारात फिरणाऱ्या रोडरोमियोंना महिला पोलिसांकडून ‘प्रसाद’, तरुणाच्या थेट श्रीमुखात लगावली

कोल्हापुरात निर्भया पथकाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण कॉलेजच्या आवारात घुटमळणाऱ्या तरुणाला महिला पोलीस अधिकाऱ्याने श्रीमुखात लगावली. तसेच इतर तरुणांना देखील लाठीचा प्रसाद दिला. संबंधित कारवाई कॅमेऱ्यात कैद झालीय.

कॉलेजच्या आवारात फिरणाऱ्या रोडरोमियोंना महिला पोलिसांकडून 'प्रसाद', तरुणाच्या थेट श्रीमुखात लगावली
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 8:29 PM

कोल्हापूर | 22 ऑगस्ट 2023 : राज्यात आणि देशात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यातील महिला आणि मुली संरक्षित आहेत का? असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. त्यामागील कारणंही अगदी तसंच आहे. राज्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण प्रचंड वाढत आहे. दर महिन्याला हजारो मुली प्रत्येक जिल्ह्यातून बेपत्ता होत आहेत. असं असताना देखील मुलींवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहेत. कल्याणमध्ये नुकतंच एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता पोलीसही सतर्क झाले आहेत.

महिला अत्याचाराच्या घटना टाळायच्या असतील तर पोलिसांनी आणि न्यायपालिकेने आरोपींवर अतिशय कठोरपणे कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली जातेय. कारण समजामध्ये घटनादेखील तशा घडत आहेत. काही दिवसांपूर्वी जळगावच्या भडगाव तालुक्यातील एका चिमुकलीवर अमानुष अत्याचार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर लगेच पाच दिवसांनी पाचोरा तालुक्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली. या घटनांमुळे आता पोलीसही महिला आणि मुलीच्या सुरक्षेसाठी आक्रमक झाले आहेत.

कोल्हापुरात निर्भया पथकाची कडक कारवाई

पोलिसांचं निर्भया पथक आता कामाला लागलं आहे. कोल्हापुरात याचा प्रत्यय बघायला मिळालाय. कोल्हापुरातील महाविद्यालयांच्या परिसरात निर्भया पथकाने धडक कारवाई केली आहे. कॉलेजच्या आवारात फिरणाऱ्या रोडरोमियोंना निर्भया पथकाकडून चांगलाच लाठ्यांचा प्रसाद देण्यात आलाय.

विनाकारण कॉलेजच्या आवारात घुटमळणाऱ्या तरुणाला महिला पोलीस अधिकाऱ्याने श्रीमुखात लगावली. तर इतर तरुणांनाजदेखील काठीचा प्रसाद मिळालाय. यावेळी अचानक झालेल्या कारवाईमुळे तरुणांची चांगलीच धावपळ उडाली. कोल्हापूर शहरातील शाळा महाविद्यालयांच्या आवारात वाढलेल्या अवैध कृत्याच्या पार्श्वभूमीवर निर्भया पथकाकडून ही धडक कारवाई करण्यात आली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.