… अन् दिलीप गांधींच्या आठवणीने गडकरी भावूक झाले, वाचा नेमकं काय आहे कारण?
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज नगरमध्ये विकास कामांचं भूमिपूजन केलं. तसेच नव्या कामांची घोषणाही केली. या घोषणा करताना दिवंगत भाजप नेते दिलीप गांधी यांच्या आठवणीने गडकरी भावूक झाले. (nitin gadkari remembered dilip gandhi in nagar program)
नगर: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज नगरमध्ये विकास कामांचं भूमिपूजन केलं. तसेच नव्या कामांची घोषणाही केली. या घोषणा करताना दिवंगत भाजप नेते दिलीप गांधी यांच्या आठवणीने गडकरी भावूक झाले. आज मी ज्या कामांच्या घोषणा करत आहे, त्यासाठी दिलीप गांधी सातत्याने पाठपुरावा करत होते, असं नितीन गडकरी म्हणाले. यावेळी गडकरी भावूक झाले होते.
नितीन गडकरी हे नगरमध्ये जाहीरसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी दिलीप गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. मला दिलीप गांधींची आज खूप आठवण येते. अनेक वर्ष आम्ही एकमेकांसोबत काम केलं. त्यांच्या घरीही जाणार आहे. या सर्व कामांचा ते व्यक्तिगत पाठपुरावा करत होते. ते आज आपल्यात नाही, याचा व्यक्तिगत मला दु:ख आहे, असं गडकरी म्हणाले.
निवडणुकीत राजकारण करायचं
महाराष्ट्र सरकार, खासदार आणि आमदारांनी भूसंपादनासाठी मोठं सहकार्य केलं. त्यामुळे विकासाचं काम झालं. विकासाच्या बाबतीत राजकारण करायचं नाही, निवडणुकीत राजकारण करायचं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यानुसार आपण कामे करत आहोत, असं गडकरी म्हणाले.
देशात 70 लाख टन साखर निर्मिती
मी तीन साखर कारखाने चालवतो, कारखाने जिवंत राहिले तर शेतकरी जिवंत राहिला पाहिजे. साखर करखान्यांनी शेतकऱ्यांचं शोषण करू नये. आपल्या देशात 70 लाख टन साखर जास्त निर्माण झाली आहे. हे चक्र उलटं फिरलं तर शेतकरी कारखाने आणि बँका डुबतील. त्यामुळे साखर कारखाने काढण्यास परवानगी देऊ नका. कारण साखर कोणीही घ्यायला तयार नाही, असं सांगतानाच साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये करा. असं केल तर साखरेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या निर्माण होणार नाहीत. 1 लाख 60 हजार कोटी रुपयांचे खाद्य तेल आयात करतो. ऊसात खाद्य तेल बिया लावल्या पाहिजेत. तीन इथेनॉल पंपाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केलं आहे, असं गडकरी म्हणाले.
जिथे जातो तिथे सगळे असंच म्हणतात
आज नगर जिल्ह्यातील अनेक कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. सुजय विखे म्हणाले की, सर्वात जास्त निधी नगर जिल्ह्याला दिला. पण मी ज्या जिल्ह्यात आणि राज्यात जातो तिथे सगळेजण असंच म्हणतात. नगर जिल्हयाला विकासाची परंपरा आहे. पहिला साखर कारखाना या जिल्ह्यात तयार झाला. आता या जिल्ह्यात 23 कारखाने आहेत. या जिल्ह्याचं विकासात फार मोठं योगदान, आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न कोल्हापूरचं आहे. कारण तिथे साखर कारखाने सर्वाधिक आहेत. येणाऱ्या काळात साखर कारखान्याच्या माध्यमातून होणारा विकास किती मोठा आहे हे आपण जाणतो, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
पवारांसमोर गडकरी म्हणाले, साहेब त्याची आम्हाला लाज वाटते, त्यांना वाटते की नाही माहिती नाही!
पुणे विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार, पवार-गडकरींमध्ये चर्चा; गिरीश बापटांचं गडकरींचा पत्र
(nitin gadkari remembered dilip gandhi in nagar program)