Ratnagiri | गणेशोत्सवानिमित्त रोहा ते चिपळूण मेमू ट्रेन धावणार, 90 रूपयांमध्ये होणार प्रवास…

विशेष म्हणजे उद्यापासून मेमू ट्रेनच्या गणेशोत्सवासाठी 32 फेऱ्या सुरू देखील होणार आहेत. रोह्यावरून चिपळूणपर्यत फक्त 90 रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे. मेमू ट्रेन म्हणजे मेनलाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट असणार आहे.

Ratnagiri | गणेशोत्सवानिमित्त रोहा ते चिपळूण मेमू ट्रेन धावणार, 90 रूपयांमध्ये होणार प्रवास...
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 8:59 AM

रत्नागिरी : खास गणेशोत्सवानिमित्त रोहा ते चिपळूण अशी मेमू ट्रेन (MEMU train) धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलीयं. कोकणामध्ये गणेशोत्सवाला एक खास महत्व आहे. इतकेच नाही तर गणेशोत्सवामध्ये कोकणाकडे जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. सहा ते सात महिने अगोदरच कोकणामध्ये गणपतीला जाण्यासाठी रेल्वेचे (Railway) तिकिट काढावे लागते. यंदा मात्र मध्य रेल्वेकडून प्रवाशांना मोठे गिफ्ट देत रोहा ते चिपळूण मेमू ट्रेन गणेशोत्सवानिमित्त सुरू करण्यात आलीयं. यामुळे रोहावरून चिपळूणला जाणाऱ्यांसाठी ही एक अतिशय आनंदाचीच बातमी (News) म्हणावी लागेल.

गणेशोत्सवासाठी रोहा ते चिपळूण मेमू ट्रेन धावणार

गणेशोत्सवासाठी रोहा ते चिपळूण अशी मेमू ट्रेन धावणार म्हटल्यावर या मार्गावरील गर्दी आता कमी होणार आहे. मुंबईवरून खास कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामध्येही काही ठरावीक रेल्वे आहेत, ज्याचे तिकिट गणेशोत्सवात मिळणे शक्य होत नाही. चिपळूणला जाणाऱ्यांसाठी रोहा मेमू ट्रेन असल्याने मोठी मदत होणार आहे.

हे सुद्धा वाचा

मेमू ट्रेनच्या खास गणेशोत्सवासाठी 32 फेऱ्या

विशेष म्हणजे उद्यापासून मेमू ट्रेनच्या गणेशोत्सवासाठी 32 फेऱ्या सुरू देखील होणार आहेत. रोह्यावरून चिपळूणपर्यत फक्त 90 रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे. मेमू ट्रेन म्हणजे मेनलाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट असणार आहे. मध्य रेल्वेनी मेमू ट्रेन सोडण्याचा मोठा निर्णय घेतलायं. या मेमू ट्रेनचे विशेष म्हणजे अवघ्या 90 रूपयांमध्ये प्रवास होणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी

लवकरच आता गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सांस्कृतिक जीवनशैलीचा प्रमुख भाग मानला जातो. कोकणातील प्रत्येक घरात गणपती बसवला जात असल्याने या काळात शहरातील लोक आपापल्या गावी जातात. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांपासून लोकांना गणपतीनिमित्त आपल्या गावी जाणे शक्य झाले नाही. गेल्या वर्षी काही प्रमाणात लोक कोकणामध्ये गणपतीसाठी गेले होते. मात्र, यंदा कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक असणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.