शिराळा पोलीस ठाण्याच्या कामगिरीतून इतरांनी प्रेरणा घ्यावी; राज्यातील पोलीस उत्तम काम करत आहेत – जयंत पाटील

कोणावरही अन्याय होणार नाही, हीच आमच्या सरकारची जबाबदारी आहे. सध्या राज्यातील पोलीस उत्कृष्ट काम करत आहेत. पोलिसांनी अधिकाधिक चांगले काम करावे त्यासाठी पोलीस दलात चांगल्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. पोलीस चोवीस तास जनतेसाठीच काम करत असतात, असे प्रतिपादन मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

शिराळा पोलीस ठाण्याच्या कामगिरीतून इतरांनी प्रेरणा घ्यावी; राज्यातील पोलीस उत्तम काम करत आहेत - जयंत पाटील
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 6:21 AM

सांगली : कोणावरही अन्याय होणार नाही, हीच आमच्या सरकारची जबाबदारी आहे. सध्या राज्यातील पोलीस उत्कृष्ट काम करत आहेत. पोलिसांनी अधिकाधिक चांगले काम करावे त्यासाठी पोलीस दलात चांगल्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. पोलीस चोवीस तास जनतेसाठीच काम करत असतात, असे प्रतिपादन मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. सांगलीच्या शिराळा पोलीस ठाण्याचा देशातील सर्वोत्तम पोलीस ठाण्याच्या यादीत सातवा क्रमांक आला आहे. याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते.

चांगल्या दर्जासाठी सर्वांनी प्रयत्न करावे

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, शिराळा पोलीस ठाण्याचे हे यश राज्यातील इतर पोलीस ठाण्यांना प्रेरणा देणारे आहे. आयएसओ मानांकनामुळे पोलीस ठाण्याचा चेहरा -मोहरा बदलू लागला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात स्वच्छता व नीटनेटकेपणा आला आहे. बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पोलीस प्रशासनाने आमूलाग्र बदल घडवले आहेत. शिराळा पोलीस ठाण्याला मिळालेला दर्जा कायम ठेवण्याची जबाबदारी ही आता सर्वांची आहे.

पाणी प्रश्नावरून फडणवीसांना प्रत्युत्तर 

दरम्यान त्यापूर्वी त्यांनी फडणवीस यांनी पुण्याच्या पाणी प्रश्नावरून सरकारवर केलेल्या टिकेला देखील प्रत्युत्तर दिले. पुण्याच्या पाणी कपातीबाबत महाराष्ट्र सरकारचा किंवा जलसंपदा विभागाचा कोणताही प्रस्ताव नाही. कोणताही विचार झालेला नाही. जे पत्र पालिकेला देण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशी 11 पत्र देण्यात आली होती. त्यांनी 180 एमएलडी पाणी बंद केलं होतं. असं आमचं धोरण नाही. त्यांनी काल येऊन सांगितलं मात्र पाणी कपातही त्यांनीच केली होती. त्यांनाच पुणेकर धडा शिकवतील. 180 एमएलडी पाणी कपात पुणेकरांना सहन करावी लागली, अशा शब्दात जयंत पाटील यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.

संबंधित बातम्या 

Omicron : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित

Omicron cases: धोका वाढला! पिंपरी-चिंचवडमध्ये दोन लहान मुलींना ओमिक्रॉनची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

Omicron : ओमिक्रॉनचे 8 रुग्ण आढळल्याने राज्याचे धाबे दणाणले, दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांशी बैठक

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.