कोरोनाविरोधाच्या लढाईत महाराष्ट्राची खमकी साथ, पुढच्या चार दिवसात उस्मानाबादच्या साखर कारखान्यात ऑक्सिजन तयार होणार

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार उडाला आहे. मात्र, हा महाराष्ट्र संयमाने या संकटाला तोंड देत आहे (Oxygen to be produced at Dharashiv sugar factory in Osmanabad).

कोरोनाविरोधाच्या लढाईत महाराष्ट्राची खमकी साथ, पुढच्या चार दिवसात उस्मानाबादच्या साखर कारखान्यात ऑक्सिजन तयार होणार
हिमालयाच्या मदतीला सह्याद्री पुन्हा धावणार, साखर कारखान्यात लवकरच ऑक्सिजन निर्मिती
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 9:38 PM

उस्मानाबाद : महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार उडाला आहे. मात्र, हा महाराष्ट्र संयमाने या संकटाला तोंड देत आहे. कोरोना विरोधाच्या लढाईत वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. आता या महाराष्ट्राने आणखी एक अभिमानास्पद कामगिरीचं उदाहारण संपूर्ण जगाला दाखवलं आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये आता ऑक्सिजन निर्माण होणार आहे. पुढच्या चार दिवसात उस्मानाबादेतील एका साखर कारखान्यात ही प्रक्रिया सुरु होणार आहे (Oxygen to be produced at Dharashiv sugar factory in Osmanabad).

धाराशिव साखर कारखान्यात लवकरच ऑक्सिजन निर्मिती

साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्टचे काम अंतिम टप्प्यात आहे. आगामी चार दिवसात ऑक्सिजन गुणवत्ता चाचणी आणि तपासणी झाल्यावर ऑक्सिजन सिलेंडर निर्मितीला सुरुवात होणार असल्याची माहिती धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार आहे (Oxygen to be produced at Dharashiv sugar factory in Osmanabad).

ऑक्सिजन प्रकल्पाची आता फक्त चाचणी बाकी

उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव कारखान्यात या प्रकल्पासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यात आली असून याची चाचणी बाकी आहे. या प्रकल्पात निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना पत्र पाठवले आहे. त्यास प्रमाणित केल्यावर मान्यता मिळताच तात्काळ मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती सुरू करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

अभिजीत पाटील यांनी यंत्रणा कशी उभारली?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार वसंतदादा इन्स्टिट्यूटने 23 एप्रिलला झूम मिटींगद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेण्यात आली. त्यामध्ये धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी झाले होते. या बैठकीत धाराशिव कारखान्यात हा प्रकल्प सुरू करण्याची तयारी पाटील यांनी दाखवीत प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले होते. त्यांनी ते काम युद्धपातळीवर सुरू केले होते. ते काम आता पूर्णत्वास आले आहे. मशिनरींची प्राथमिक तपासणी झाली असून सिलेंडर उच्च दाबाने भरण्याची यंत्रणा बसविणे फक्त बाकी आहे. त्यापूर्वी निर्मिती होणाऱ्या ऑक्सिजनची वैद्यकीय दृष्ट्या गुणवत्ता तपासली जाणार आहे.

उस्मानाबादेतील प्रकल्प कार्यान्वित झाल्यास महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळणार

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यात कोरोनाबाधित रूग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करताना सरकार, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आणि प्रशासकीय अधिकारी यांची मोठी कसरत होत आहे. मात्र उस्मानाबाद येथील साखर कारखानावरील प्रकल्प कार्यान्वित झाल्यास तो राज्यासाठी पथदर्शी आणि दिलासा देणारा ठरणार आहे.

धाराशिव साखर कारखाना प्रतिदिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती करणार

अतिरिक्त सामग्रीत ‘मॉलेक्युलर सिव्ह’ वापरून हावेतील वायुद्वारे ऑक्सिजनची निर्मीती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. धाराशिव साखर कारखाना प्रतिदिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार असल्याने उस्मानाबाद जिल्ह्याला लागेल इतका ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. एक साखर कारखाना प्रति दिन एका जिल्ह्याला लागेल इतका ऑक्सिजन निर्माण करू शकतो.

‘इतर कारखान्यांनी मान्यता दिल्यास 10 ते 15 दिवसात उभारणी’

धाराशिव कारखाना प्रकल्प मान्यता मिळल्यावर इतर कारखान्यांना हा प्रकल्प सुरू करायचा असल्यास त्यांना मदत व मार्गदर्शन करण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला. इतर कारखान्यांनी होकार दिल्यास अवघ्या 10 ते 15 दिवसात प्रकल्प उभारणी करून देणे शक्य आहे, असेही पाटील यांनी सांगितले. राज्यात सध्या ऑक्सिजनची गरज आहे. मोठ्या शहरात तर मागणी मोठी आहे. आगामी काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील इतर साखर कारखाने यांनी असे प्रकल्प सुरू केल्यास उस्मानाबाद हा ऑक्सिजन निर्मितीचा जिल्हा बनून प्राणवायू देणारा जिल्हा बनू शकतो असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : माणुसकी मेली, एकीकडे आपलं माणूस गमावल्याचं दु:ख, दुसरीकडे खासगी रुग्णावाहिका चालकांकडून लुटमार

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.