BSF Jawan Died : कर्तव्य बजावत असताना साप चावला, पालघरमधील जवानाला पठाणकोटमध्ये वीरमरण!
बीएसएफ जवान महेश रामा फडवले जी' कोय 58 बीएन हे बीएसएफच्या बीएन मुख्यालय 58 माधोपूर येथे कर्तव्यावर होते.
पालघर : मूळच्या पालघरमधील (Palghar News) असलेल्या जवानाचा पठाणकोटमध्ये दुर्दैवी मृत्यू (BSF Jawan Death) झाला. सर्पदंशानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र तिथं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलाय. महेश रामा फडवले (Mahesh Rama Fadvale) असं मृत जवानाचं नाव आहे. कर्तव्य बजावर असताना झालेल्या या जवानाच्या मृत्यूमुळे संपूर्ण बटालियनमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे. त्यांच्या मृत्यूने फडवले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आणला जाईल. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फडवळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि आई वडील असा परिवार आहे.
डाव्या हाताला संर्पदंश
बीएसएफ जवान महेश रामा फडवले जी’ कोय 58 बीएन हे बीएसएफच्या बीएन मुख्यालय 58 माधोपूर येथे कर्तव्यावर होते. कर्तव्य बजावत असताना पोर्टआउट मध्ये महेश हे विश्रांती करत होते. त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताला साप चावला. साप चावल्याचं लक्षात येताच, याबाबत यंत्रणांना कळवण्यात आलं.
उपचारादरम्यान मृत्यू
दरम्यान, माहिती मिळल्यानंतर एक रुग्णवाहिका आणि नर्सिंग असिस्टंटला त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पाठवण्यात आलं. तिथून महेश फडवले यांना त्यांच्या पत्नीसह पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण ज्याची भीती होती, हे झालं. पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर उपचार सुरु केले. पण उपाचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अखेर डॉक्टरांनी महेश यांना मृत घोषित केलं. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील करे तलावली येथे त्यांचं मूळ कुटुंब राहतं.
मंगळवारी अंत्यसंस्कार
महेश यांच्या मृत्यूचं वृत्त कळल्यानंतर संपूर्ण फडवले कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. महेश यांचा मृतदेह मंगळवारी पालघरमधील त्यांच्या राहत्या घरी आणला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.