मोठी बातमी ! पंढरपुरात अखेर 300 वारकऱ्यांना परवानगी, विसाव्यापासून मठापर्यंत मानाच्या पालख्या पायी जाणार

आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. पण गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांसाठी थोडी मुभा दिली आहे.

मोठी बातमी ! पंढरपुरात अखेर 300 वारकऱ्यांना परवानगी, विसाव्यापासून मठापर्यंत मानाच्या पालख्या पायी जाणार
आषाढी वारी पालखी सोहळा (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 10:21 PM

पंढरपूर : आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. पण गेल्यावर्षा पेक्षा यावर्षी पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांसाठी थोडी मुभा दिली आहे. पंढरपुरात मानाच्या दहा पालख्या लवकरच दाखल होतील. दरवर्षीसारखा जरी जल्लोष होणार नसला तरी प्रत्येक पालखीसोबत यावर्षी 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने विसाव्यापासून मठापर्यंत पालख्यांना पायी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर प्रत्येक पालखीसोबत 30 वारकऱ्यांना सहभागी होण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दहा मानाच्या पालख्यांसोबत प्रत्येकी 30 असे एकूण 300 वारकऱ्यांना आता वारीत सहभागी होता येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

पालख्या विसाव्यापासून मठापर्यंत चालत जाणार

मानाच्या दहा पालख्यांचे प्रमुख आणि पोलीस यांच्यात आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक मानाच्या पालखीसाठी 30 असे एकूण 300 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली. या बैठकीत आळंदी पालखीचे प्रमुख विकास ढगे यांच्यासह इतर पालखी प्रमुखांनी प्रत्येक पालखीसोबत 40 वारकऱ्यांना परवानगी देण्याची विनंती केली. पण कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रत्येकी 30 वारकऱ्यांसाठी परवानगी दिली. या निर्णयामुळे आता पालख्या विसाव्यापासून मठापर्यंत चालत जातील.

वारकऱ्यांची प्रतिक्रिया काय?

या बैठकीनंतर आळंदी पालखीचे प्रमुख विकास ढगे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं. “वाखरी पासून पंढरपूर पर्यंत प्रत्येक मानाच्या पालखीसोबत 40 वारकऱ्यांना परवानगी मिळावी, अशी आमची मागणी होती. ती मागणी कदाचित मान्यही झाली असती. पण आता एकंदरीतच उशिर झाला आहे. त्याचबरोबर वारकऱ्यांचा विचार करता लवकर निर्णय होणं गरजेचं होतं”, अशी प्रतिक्रिया विकास ढगे यांनी दिली.

“आम्ही पायी वारी झाली असती तरच समाधानी झालो असतो. पण यावर्षाची एकंदरीत परिस्थिती विचारत घेऊन आम्ही सर्वांनी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे दुधाची तहान ताकाने भागावे अशाप्रकारची स्थिती आहे. पण तरीदेखील शासनाने सकारात्मक पाऊल उचलून 40 पैकी 30 वारकऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे याबाबत समाधान व्यक्त करण्यात हरकत नाही”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

पोलिसांची भूमिका

या बैठकीनंतर पोलीस प्रशानाकडून प्रतिक्रिया देण्यात आली. “अतिशय चांगल्याप्रकारे चर्चा झाली आहे. वारकर संप्रदायानेसुद्धा सहकार्याचील भूमिका घेतली आहे. वारकरी संप्रदायाकडून एक प्रस्ताव आला होता. विसाव्यापर्यंत बसने नंतर पायी पालखी नेण्याची परवानगी मागितली होती. त्यांचा हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक पालखीसाठी 30 असे दहा मानाच्या पालख्यांसाठी एकूण 300 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे”, असं पोलिसांनी सांगितलं.

या आहेत मानाच्या 10 पालख्या

1) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )

2) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )

3) संत सोपान काका महाराज ( सासवड )

4) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )

5) संत तुकाराम महाराज ( देहू )

6) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )

7) संत एकनाथ महाराज ( पैठण )

8) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )

9) संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)

10) संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड) (Maharashtra State Road Transport Corporation will provide buses for ashadhi wari, says anil parab)

संबंधित बातमी : मातोश्री ते पंढरपूर, उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग, बाजूला रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.