Chandrapur Tiger | चंद्रपुरातील वाघाच्या आक्रमकतेने दहशत; चिकमाऱ्यात घरात घुसून महिलेवर हल्ला
या घटनेनंतर पोलीस आले. वनविभागाचे कर्चचारी आले. वाघाचा शोध सुरू झाला. कोणत्या वाघाने हल्ला केला असेल, यावर आता चर्चा होईल. पण, यातून काही साध्य होईल, असं नाही. गेलेला जीव काही परत येणार नाही.
चंद्रपूर : जिल्ह्यात घरात घुसून वाघाने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा (Chikmara in Sindevahi taluka) गावात ही घटना घडली. तुळसाबाई परसराम पेंदाम (Tulsabai Pendam) (वय 89) असं मृतक महिलेचं नाव आहे. मृतक महिला काल रात्री घरात झोपली असताना वाघाने घरात शिरून हल्ला केला. घटनास्थळी पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी (Forest Department staff) दाखल झाले आहेत. घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. आता या वाघाचा बंदोबस्त करावी, अशी मागणी गावरी करताहेत.
अशी घडली घटना
ज्येष्ठ महिला रात्री घरी झोपली होती. अचानक रात्री वाघ आला. त्यानं महिलेला उचललं. तिच्यावर हल्ला करून तिला ठार केलं. यामुळं परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हल्ला केलेली महिला ज्येष्ठ
चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा. या जिल्ह्यात वाघांची संख्या इतकी वाढली, की ते सहज गावात शिरतात. जंगलाशेजारील लोकांचे रोज बळी जातात. ताडोबा परिसरात तर वाघांची दहशत जास्तच आहे. पर्यटक येतात ते वाघ पाहण्यासाठी. पण, इथली परिस्थिती वेगळीच आहे. वाघ गावात शिकारीसाठी येतात. सिंदेवाहीतील घटनाशी अशीच. रात्री महिला घरी झोपली होती. महिला ज्येष्ठ असल्यानं जास्त हिंडू फिरू शकत नव्हती. वाघानं याचाच फायदा घेतला. तो सरळ घरात शिरला. ज्येष्ठ महिलेला उचललं. यात ती ठार झाली.
आता वाघाचा शोध सुरू
या घटनेनंतर पोलीस आले. वनविभागाचे कर्मचारी आले. वाघाचा शोध सुरू झाला. कोणत्या वाघाने हल्ला केला असेल, यावर आता चर्चा होईल. पण, यातून काही साध्य होईल, असं नाही. गेलेला जीव काही परत येणार नाही. वाघ केव्हा येईल. काही नेम नाही. त्यामुळं जंगलाशेजारील लोकांना नेहमीच अलर्ट राहावं लागते. जंगलाचे फायदे होतात. तसे काही नुकसानही आहेत.