मोदींच्या पावलावर पंकजांचं पाऊल, मंदिर ते हॉस्पिटल्स स्वच्छ ठेवण्याचा संकल्प जाहीर
मला या धरवतीवरुन संकल्प काय करता असं विचारलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरु केलं. सगळ्या देशात स्वच्छता अभियान राबवलं गेलं. यावेळी एक नवा संकल्प करायचा. आपल्या गावातील प्रार्थनालय स्वच्छ ठेवायची जबाबदारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान म्हणून घ्यायची आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मुंबई : दसरा मेळाव्यानिमित्त भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छाता अभियानाला पाठिंबा दिला. तसेच गावातील मंदिर, शाळा तसेच रुग्णालये स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
मंदिर, शाळा, रुग्णालये स्वच्छ ठेवण्याचा संकल्प
“मला या धरवतीवरुन संकल्प काय करता असं विचारलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरु केलं. सगळ्या देशात स्वच्छता अभियान राबवलं गेलं. यावेळी एक नवा संकल्प करायचा. आपल्या गावातील प्रार्थनालय स्वच्छ ठेवायची जबाबदारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान म्हणून घ्यायची आहे. भगवानबाबा यांचं मंदिर रोज स्वच्छ ठेवायची आहे. गावातील मंदिर, रुग्णालय तसेच शाळा स्वच्छ ठेवायची आहे,” असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता
तसेच पुढे बोलताना आपल्या देशात प्रार्थनालय, विद्यालय आणि रुग्णालय स्वच्छ नाही. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ही सर्व ठिकाणं स्वच्छ ठेवण्याचं मी आवाहन करतो, असंही पकंजा मुंडे म्हणाल्या.
तुम मुझे कब तक रोकोगे
तसेच पुढे बोलताना, मला वाटलं मी इथे येऊ शकणार नाही. माझ्या मनात चारोळ्या आल्या. तुम मुझे कब तर रोकोगे? जानकर साहेब भाषण करताना इंग्रजीत बोलत होते. ओबीसी माणूस पेटला तर इंग्रजीत बोलतो. मध्येच हिंदी बोलतात. कारण त्यांना देशाची लिडरशीप आहे. तुम मुझे कब तक रोकोगे? मुठ्ठी मे सपने लेकर जेबोमे कुछ आशाए, दिल में अरमान यहीं की कुछ करजाएँ, सूरजसा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझे कबतक रोकोगे? अपनी हद रोषण करने से तुम मुझे कैसे रोकोगे, कैसे टोकोगे?, अशा शायराना अंदाजात पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका भगवानबाबांच्या भक्तांसमोर मांडली. पंकजा मुंडे यांनी या माध्यमातून त्यांच्या विरोधकांना उत्तर दिलंय. मात्र, पंकजा मुंडे यांनी कुणाचंही नाव न घेता टीका केल्यानं पक्षांतर्गत की विरोधी पक्षातील नेत्यांना इशारा दिला आहे.
‘कोणत्या नेत्याची चमचेगिरी करायला फुलं टाकत नव्हते’
मी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या ऐकू आले का तुम्हाला? समोर उपस्थित सर्व वडिलधारे मंडळी, युवा बांधव आणि मातांनो, काय सोहळा आहे, इतका देखणा सोहळा, इतका रांगडा सोहळा, मला नाही वाटत देशामध्ये कुठे होत असेल. हेलिकॉप्टरमधून यायचं आणि बैलगाडीत बसायचं. आहे का असं कुठे? आहे का? मी वरुन फुलं टाकत होते, भगवान बाबा आणि तुमच्या चरणी. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करायला फुलं टाकत नव्हते. मी भगवान बाबांवरच्या श्रद्धेपोटी आणि तुम्ही इथे आलात, तुमच्या भावनेला आदरांजली वाहण्यासाठी फुलं वाहत होते, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांचं नाव न घेता टीका केली.
इतर बातम्या :
Photo | धनंजय मुंडे सपत्निक माहूर गडावर, रेणुका मातेचं घेतलं दर्शन
तुम मुझे कब तक रोकोगे, पंकजा मुंडेंचा शायराना अंदाज, कोण रोखतंय ताईंना, पक्षातले की बाहेरचे?
सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिलं होतं का?; धनंजय मुंडेंचा पंकजांवर पलटवार
(Pankaj announces campaign for hospitals temples and school cleanliness)