Parbhani St Bus Accident: चालकाला भोवळ आल्यानं एसटीचा अपघात! एसटी थेट पार्क केलेल्या वाहनांमध्ये घुसली

एसटी बसचा हा अपघात परभणीच्या जिंतूर शहारात घडला. या शहरातील मुख्य चौकातच एसटी बसनं दुचाकी आणि कारला धडक दिली.

Parbhani St Bus Accident: चालकाला भोवळ आल्यानं एसटीचा अपघात! एसटी थेट पार्क केलेल्या वाहनांमध्ये घुसली
एसटी बसचा अपघात, थोडक्यात अनर्थ टळलाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 4:07 PM

परभणी : परभणीत एसटी बसचा (Parbhani St bus Accident) अपघात झाला. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली आहे. एसटी बस चालकाला (Bus Driver) भोवळ आल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातानं अनेक दुचाकींचं प्रचंड नुकसान झालं आहे. तसंच एसटी बसच्या दर्शनी भागालाही मार बसलाय. बस चालकाला भोवळ आल्यानं त्याचं गाडीवरुन नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला. या अपघातात रस्त्याशेजारी पार्क केलेल्या गाड्यांनाही (Park Vehicles) जोरदार धडक बसली. यात अनेक दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातावेळी पार्क केलेल्या दुचाकींवर कुणीही बसलेलं नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान, दुचाक्यांना धडक दिल्यानं बस थेट झाडाला जाऊन भिडली आणि थांबली.

या अपघातात बस चालकाच्या डोक्याला मार लागलाय. तसंच काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. अपघातानंतर तातडीनं जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

10 दुचाकी आणि 2 कारचं नुकसान

एसटी बसचा हा अपघात परभणीच्या जिंतूर शहारात घडला. या शहरातील मुख्य चौकातच एसटी दुचाकी आणि कारला धडक दिली. या अपघातात दोन कार आणि तब्बल दहा दुचाक्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. यापैकी एक दुचाकी तर एसटी बसच्या जवळपास टायरखालीच आली होती.

थोडक्यात अनर्थ टळला!

या भीषण अपघातात थोडक्यात अनर्थ टळलाय. ही एसटी बस कळमनुरी येथून जिंतूरला येत होती. त्यावेळी हा अपघात घडला. एमएच 13 सीयू 7543 असं अपघात झालेल्या एसटी बसचा नंबर आहे. ही बस कळमनुरी एसटी आगारतीलच आहेत.

चालकानं काय सांगितलं?

दरम्यान, अपघात झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चालकाचीही काहींनी विचारपूस गेली. त्यावेळी चालकानं चक्कर आली नव्हती असं म्हटलंय. मात्र गरगरल्यासारखं वाटल्यानंतर काहीच कळलं नाही आणि अपघात झाला, असंही एसटी बसच्या चालकानं म्हटलंय. एसटी बस चालक्याच्या डोक्याला या अपघातात मार लागलाय. दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्यांनी नेमकं काय झालं एकच गर्दी केली होती.

संबंधित बातम्या :

Video: पेट्रोल भरुन मुख्य रस्त्यावर येताना जोरदार धडक! नवरा-बायको दुचाकीवरुन थेट रस्त्यावर आदळले

जालना-नांदेड रोडवर विचित्र अपघात, ट्रकच्या मागच्या बाजूवर कार धडकली, एअरबॅग उघडली अन् जीव वाचले!

भरधाव BMW डिव्हायडर पार करत विरुद्ध दिशेला! डिव्हायडरवर उभ्या असलेल्या महिलेचं काय झालं? पाहा थरारक Video

पाहा राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी : 4 मिनिटांत 24 हेडलाईन्स

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.