जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडून परभणीच्या व्यापारी पेठेची पाहणी, मास्क न वापरणाऱ्यांना खडसावलं

कोरोना प्रतिबंधक लस प्रमाणपत्र न बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनाने आज पासून कारवाईला सुरुवात केलीय.जिल्हाधिकारी आंचल गोयल दुपारी तीन वाजता या कारवाई करीता स्वतः बाजार पेठेत दाखल झाल्या

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडून  परभणीच्या व्यापारी पेठेची पाहणी, मास्क न वापरणाऱ्यांना खडसावलं
आंचल गोयल
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 7:04 PM

प्रशांत चलिंद्रवार, टीव्ही 9 मराठी, परभणी: कोरोना प्रतिबंधक लस प्रमाणपत्र न बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनाने आज पासून कारवाईला सुरुवात केलीय.जिल्हाधिकारी आंचल गोयल दुपारी तीन वाजता या कारवाई करीता स्वतः बाजार पेठेत दाखल झाल्या. जनता मार्केटपासून कच्ची बाजार, कापडबाजार, शिवाजी चौक त्या स्वतः पाहणी केली. गोयल यांनी मास्क न घेणाऱ्या नागरिकांना खडसावलं. त्यांच्या सोबत महापालिका आयुक्त देविदास पवार तसेच अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, अन्य अधिकारी कर्मचारी या कारवाईत सहभागी होते.

मास्क न घालणाऱ्यांना खडसावलं

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा धोका कायम आहे. सणांच्या निमित्तानं बाजारपेठेतील गर्दी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बाजारपेठेत कोरोना नियमांची अंमंलबजावणी होतेय का हे पाहण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी आँचल गोयल दुपारी बाजारपेठेत दाखल झाल्या. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेय का याची विचारणा केली. मास्क न लावता बाजारपेठेतून फिरणाऱ्या नागरिकांनी गोयलं यांनी चांगलंय खडसावलं आणि कारवाई करण्याचा दम देखील दिला.

लसीकरण केलंय का विचारणा

जिल्हाधिकारी गोयल यांनी स्वतः काही व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. व्यापाऱ्यांना त्यांनी लस घेतली आहे का ?अशी विचारणा केली. लसचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवा तरच व्यापार करण्यास परवानगी मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. काही व्यापाऱ्यांनी दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले ,परंतु काही व्यापाऱ्यांनी लस घेतलीच नाही हे निदर्शनास आले.

दुकानं सील करण्याची कारवाई, व्यापारी पेठेत खळबळ

जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी पेठेत पाहणी केल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी लस घेतली नसल्याचं समोर आलं. यामुळे महापालिकेच्या पथकाने त्या दुकानदाराने विरोधात कारवाई सुरू केली. काही दुकानांना सील ठोकण्याचे ही आदेश प्रशासनाच्यावतीने बजावण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या पथकाने सुरू केलेल्या या कारवाईने व्यापारी पेठेत मोठी खळबळ उडाली.

लसीकरणाशिवाय पालिका प्रमाणपत्र देणार नाही

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण केल्‍याशिवाय यापुढे परभणी महानगरपालिकेमार्फत कोणत्‍याही प्रकारचे प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र, हस्‍तांतरण प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र परवाना इत्यादी निर्गमित करण्‍यात येणार नाही.करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा भाग म्‍हणून महापालिकेने हा निर्णय घेतलाय.तसेच शहरातील सर्व नागरीक आणि व्‍यावसायिकांनी कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण करून घ्यावे, तसेच ताप, सर्दी, खोकला झाल्‍यास त्‍वरीत RTPCR तपासणी करून घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी मास्‍‍कचा वापर, सॅ‍निटायझरचा वापर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 इतर बातम्या:

आम्हाला डॅशिंग अधिकारी आंचल गोयल याच जिल्हाधिकारी हव्यात, परभणीकरांचं आंदोलन, सरकार दखल घेणार?

डॅशिंग अधिकारी आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी, नवाब मलिक यांचं स्पष्टीकरण

पदभार स्वीकारण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच परभणीत, डॅशिंग अधिकारी आंचल गोयल यांची ऐनवेळी बदली रद्द

Parbhani Collector Aanchal Goyal visit Market of Parbhani city warning people to follow corona rules

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.