सोलापुरात पुन्हा म्हशी पळविण्याचा कार्यक्रम, हजारो लोकांची गर्दी, कोरोना नियमांना हरताळ

सोलापूर शहरातील केगाव परिसरात म्हशी पळविण्याच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत केगाव हा परिसर आहे.

सोलापुरात पुन्हा म्हशी पळविण्याचा कार्यक्रम, हजारो लोकांची गर्दी, कोरोना नियमांना हरताळ
सोलापुरात अशा प्रकारे गर्दी करण्यात आली.
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 4:06 PM

सोलापूर : सोलापूर शहरातील केगाव परिसरात म्हशी पळविण्याच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत केगाव हा परिसर आहे. यापूर्वी सोलापुरातील कर्णिक नगरात 1 ऑगस्ट रोजी अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. (people gathered in huge amount violates corona rules in buffalo running program)

केगांव परिसरात म्हशी पळविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन

सोलापुरात दरवर्षी म्हशी पळविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात नागरिक मोठ्या प्रमाणात जमतात. सध्या कोरोना महामारीचे संकट अजूनही सरलेले नाही. सार्वजनिक कार्यक्रमांत गर्दी होण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दी आणि कोरोनाचा प्रसार लक्षात घेता सार्वजिनक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सध्या बंदी आहे. असे असूनदेखील सोलापुरातील केगाव परिसरात म्हशी पळविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली

या कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांना हरताळ फासत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी चेहऱ्याला मास्कदेखील लावले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचादेखील फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करावी

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी होती. असे असूनही चावडी पोलीस ठाण्याने या कार्यक्रमाकडे कानाडोळा केला. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनावर कोणताही आक्षेप घेतला आहे. मात्र, या कार्यक्रमात गर्दी झाल्यामुळे आयोजक तसेच सहभागी झालेल्या नागरिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

महिन्याभरातील दुसरी घटना

दरम्यान म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याची महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी आषाढ महिन्यानिमित्त कर्णिक नगर येथे 1 ऑगस्ट रोजी म्हशी पळवण्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर या कार्यक्रमातील दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते. जेलरोड पोलीस ठाण्यात यासंबंधी एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

बाबासाहेब पुरंदरेंवर इतिहासकारांचा ‘दंतकथे’चा आरोप, राज ठाकरेंचं पहिल्यांदाच थेट उत्तर

Video: गजानन काळेंच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव? चित्रा वाघ म्हणतात, हे काय चाललंय राज्यात?

पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी मोदी म्हणाले, फाळणीचे चटके कधीही विसरु शकत नाही!

(people gathered in huge amount violates corona rules in buffalo running program)

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.