Osmanabad Crime : सासऱ्याकडून सुनेवर लैंगिक अत्याचार, आरोपीला वाशी पोलिसांकडून अटक
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पार्डी येथील ही घटना असून नवरा भोळसर असल्याचा फायदा घेत सासऱ्याने सुनेवर लैंगिक अत्याचार केले. गेल्या 6 महिन्यांपासून सासरा अत्याचार करीत होता. अत्याचाराला कंटाळून तिने भेटायला आलेल्या बहिणीला ही घटना सांगितल्याने याला वाचा फुटली. पोलिसांनी गुन्हा नोंद करीत अवघ्या एक तासात आरोपी सासऱ्याला अटक केली.
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात नात्याला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. सासऱ्याने सुनेवर बलात्कार (Rape) करत, कुठे याची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची आणि दोन्ही मुलांपासून वेगळे करण्याची धमकी (Threat) दिली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. याबाबत पीडित महिला वारंवार आपल्या पतीला सांगत होती. मात्र तो वडिलांची बाजू घ्यायचा. तसेच पती आणि सासू मिळून तिला धमकावत असत. पोलिसांनी पती, सासू आणि आजे सासूलाही ताब्यात घेतले आहे.
सहा महिन्यांपासून सासरा करत होता अत्याचार
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पार्डी येथील ही घटना असून नवरा भोळसर असल्याचा फायदा घेत सासऱ्याने सुनेवर लैंगिक अत्याचार केले. गेल्या 6 महिन्यांपासून सासरा अत्याचार करीत होता. अत्याचाराला कंटाळून तिने भेटायला आलेल्या बहिणीला ही घटना सांगितल्याने याला वाचा फुटली. पोलिसांनी गुन्हा नोंद करीत अवघ्या एक तासात आरोपी सासऱ्याला अटक केली. वाशी येथील पोलीस निरीक्षक सुरेश दळवी यांनी ही कारवाई केली असून कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांबाबत महिलांनी व मुलींनी तक्रार द्यावी असे आवाहन केले आहे.
पीडितेने बहिणीला सांगितल्यानंतर घटना उघड
पीडित महिला तिच्या घरी नेहमीप्रमाणे झोपली असता सासरा तिच्याजवळ गेला व त्या महिलेचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची तसेच दोन्ही मुलांपासून तिला वेगळे करण्याची धमकी दिली. गेली अनेक महिने हा अत्याचार सुरूच असल्याने अखेर तिने हिंमत दाखवत या प्रकाराला वाचा फोडली. या अत्याचाराबाबत तिने अनेक वेळा पतीला सांगितले. मात्र तो भोळसर असल्याने वडिलांची बाजू घेत होता असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भूमचे उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करीत सासऱ्याला तात्काळ अटक केली. (Police arrest father in law for assaulting daughter in law in Osmanabad)