Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर आग प्रकरणात मोठी कारवाई, चार जणांना अटक

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात आणखी एक मोठी करण्यात आलीय. आग प्रकरणी संशय असलेल्या चार जणांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात चार जणांना अटक करण्यात आले आहे. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका यांचा समावेश आहे.

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर आग प्रकरणात मोठी कारवाई, चार जणांना अटक
ahmednagar hospital fire
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 8:21 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात आणखी एक मोठी करण्यात आलीय. आग प्रकरणी संशय असलेल्या चार जणांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका यांचा समावेश आहे. पोलीस उपअधीक्षक संदपी मिटके यांनी ही कारवाई केलीय. याआधी राज्य सरकारने तीन अधिकारी आणि एका स्टाफ नर्सला निलंबित केले होते. तर दोन स्टाफ नर्सच्या सेवा समाप्तीचा निर्णय घेण्यात आला होता.

एकूण चार जणांना अटक

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात 7 नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या भीषण आगीत एकून अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. तसेच या प्रकरणाची पोलिसांकडून स्वतंत्ररित्या चौकशी करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले होते. आता पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार जणांना अटक केली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी विशाखा शिंदे, सपना पठारे यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलंय. तर आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आलीय.

नेमकं काय घडलं होतं ?

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना 7 नोव्हेंबर रोजी घडली होती. ही आग एवढी भीषण होती की यामध्ये एकूण 11 जणांचा होरपूळून मृत्यू झाला होता. तर काही रुग्ण जखमी झाले होते. आग लागल्यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर वायुवेगाने आग विझविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. याच वेळेत बाकीच्या 20 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र 11 रुग्णांचा गुदमरून तसेच होरपळून मृत्यू झाला होता.

दरम्यान, यापूर्वी याच आग प्रकरणात राज्य सरकारने एकूण सहा जणांवर कारवाई केली होती. तशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

कोणकोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई ?

1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित 2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित 3. डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी- निलंबित 4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित 5. आस्मा शेख -स्टाफ नर्स – सेवा समाप्त 6. चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त

इतर बातम्या :

Professors Recruitment | मोठा निर्णय ! राज्यात प्राध्यापक भरतीला मान्यता, पहिल्या टप्प्यात 2088 प्राध्यापकांची भरती

Rafale Scam: फ्रेंच मॅगझिनच्या दाव्यानंतर राफेल विमान भ्रष्टाचार प्रकरणात भाजप आणि काँग्रेसमध्ये परत जुंपली

ST Workers Strike | एकीकडे संपाची तीव्रता वाढली, दुसरीकडे कारवाईचा बडगा, तब्बल 376 एसटी कर्मचाऱ्यांचे निलबंन

(police arrested four accused in ahmednagar district hospital fire case)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.