Third Wave : 50 लाख रुग्णांची शक्यता, 6,759 रुग्णालये, 12 हजार व्हेंटिलेटर्स, तिसरी लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेसारखीच किंबहुना त्याहूनही भयानक असू शकते असा अंदाज आहे. या लाटेत तब्बल 50 लाख कोरोना रुग्णसंख्या होऊ शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे.

Third Wave : 50 लाख रुग्णांची शक्यता, 6,759 रुग्णालये, 12 हजार व्हेंटिलेटर्स, तिसरी लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 2:59 PM

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट सरली असली तरी तिसरी लाट उंबरठ्यावर (Corona third wave) असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. हेच पाहता आता राज्य सरकारने यासाठी कंबर कसली आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळालं, हाच अनुभव गाठीशी ठेऊन राज्य सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत. या उपाययोजनांचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर (CM Uddhav Thackeray) सादरीकरण करण्यात आलं. या सादरीकरणात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी काय तयारी करावी लागेल, हे सांगण्यात आलं.  कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी सध्या राज्यातील परिस्थिती काय आहे? त्याचा आढावा (Possibility of 50 lakh corona cases in Maharashtra, Uddhav Thackeray government preparation for prevent the third wave)

राज्यातील रुग्णालयांची सध्याची स्थिती  

कोरोना रुग्णालय – 6,759

विलगीकरण बेड – 4,63,584

संशयित रुग्ण बेड – 1,29,141

कोरोना रुग्ण बेड – 3,34,530

ऑक्सिजन बेड – 1,06,114

व्हेंटीलेटर – 12,883

आयसीयू बेड – 32,855

तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेसारखीच किंबहुना त्याहूनही भयानक असू शकते असा अंदाज आहे. या लाटेत तब्बल 50 लाख कोरोना रुग्णसंख्या होऊ शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे. शिवाय, तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, तब्बल 5 लाख लहानग्यांना कोरोना होण्याचा धोका तज्ज्ञांच्या समितीने वर्तवला आहे. हेच पाहता राज्य सरकारला कोरोनावर शेकडो कोटी खर्च करावे लागणार आहे. सध्याच्या अंदाजानुसार राज्य सरकारने यासाठी 893 कोटींची तरतूद केली आहे.

 रेमेडिसीवरसह इतर औषधांचा पुरवठा वाढवण्याची गरज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिवीरची मोठी वाणवा पाहायला मिळाली. कुठेच ही इंजेक्शन मिळत नव्हती, या इंजेक्शनचा काळाबाजारही झाला आणि ती लाख रुपयांपर्यंत विकलीही गेली. हेच पाहता आता राज्य सरकार सतर्क झालंय. दुसऱ्या लाटेत तब्बल 6 लाख 90 हजार रेमडेसिवीर वापरले गेले. तिसऱ्या लाटेत तब्बल 8 लाख रेमडेसिवीरची गरज असणार आहे. ही उपलब्ध करुन ठेवण्याची तयारी राज्य सरकार करतं आहे. याशिवाय, दुसऱ्या लाटेत टोसिलीझुअॅप हे इंजेक्शनही मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं. दुसऱ्या लाटेत ही 4000 इंजेक्शन लागली होती. तिसऱ्या लाटेत 10,000 इंजेक्शन मागवण्याची तयारी राज्य सरकारने केलीय.

याशिवाय दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांवर हेपॅरिन हे इंजेक्शनचे तब्बल 7 लाख 20 हजार डोस वापरले गेले. तर तिसऱ्या लाटेत तब्बल 10 लाख इंजेक्शनची गरज लागणार आहे. हेच नाही तर मागील लाटेत 1 कोटी 50 लाख पॅरासिटॅमॉलच्या गोळ्या लागल्या होत्या, तिसऱ्या लाटेतही तेवढ्याच गोळ्यांची व्यवस्था करावी लागणार आहे.

ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन मिळेनासा झाला. राज्यातील सगळा औद्योगिक ऑक्सिजन रुग्णालयांना दिला गेला, तरीही ऑक्सिजनची कमतरता भरुन निघत नव्हती. अनेकांनी ऑक्सिजन न मिळाल्याने प्राण सोडले. अगदी ट्रेन आणि विमानानेही महाराष्ट्रात ऑक्सिजन आणावा लागला. ऑक्सिजनची इतकी गरज लागेल असं कुणालाही वाटलं नव्हतं, दुसऱ्या लाटेत तब्बल 60 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला गेला. तिसऱ्या लाटेआधी आता तब्बल 90 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. त्यासाठी राज्य सरकारनेही तयारी केली आहे, आणि राज्यात अनेक ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लान्ट सुरु करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या आवारातच हे ऑक्सिजन प्लान्ट असणार आहेत.

कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी लागणार!

तिसऱ्या लाटेत कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. चाचण्या वाढवून, संक्रमित रुग्णांना विलगीकरण कक्षात वा रुग्णालयात भरती करावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुसऱ्या लाटेत 1 कोटी आरटीपीसीआर तर 70 लाख अँटिजेन टेस्ट करण्यात आला. आता तिसऱ्या लाटेत 1 कोटी 25 लाख आरटीपीसीआर तर 88 लाख अँटिजेन टेस्ट कीट खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरुन, लक्षणं असणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करणं शक्य होऊ शकतं.

तिसऱ्या लाटेबाबत राज्य सरकारची तयारी

तिसऱ्या टप्प्यात 50 लाख रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता

यात पाच लाख मुलांना कोरोना होण्याची भीती

औषध खरेदीसाठी ८९३ कोटी खर्च येणार

रेमेडिसीवर

आत्तापर्यंत वापरले-सहा लाख 90 हजार

तिसऱ्या लाटेत गरज- आठ लाख

टॉसिलोझुलाब

आतापर्यंत‌ वापरले -४०००

तिसऱ्या लाटेत गरज – १० हजार

हेपँरिन इंजेक्शन

आतापर्यंत‌ वापरले – ७ लाख २० हजार

गरज लागणार – १० लाख

ऑक्सिजन

आतापर्यंत‌ वापरला – ६० हजार मेट्रीक टन

तिसऱ्या लाटेत गरज – ९० हजार मेट्रीक टन

पँरासेटोमल

आतापर्यंत‌ वापरले – दीड कोटी गोळ्या

गरज लागणार – दीड कोटी गोळ्या

आरटीपीसीआर टेस्ट‌ कीट

आतापर्यंत‌ वापरले- १ कोटी

गरज‌ लागणार – सव्वा कोटी कीट

अँटीजेन टेस्ट‌ कीट

आतापर्यंत‌ वापरले – ७० लाख

गरज लागणार – ८८ लाख

मास्क

आतापर्यंत‌ वापरले- १ कोटी ६ लाख

गरज लागणार – १ कोटी ३२ लाख

सध्याची राज्यातली स्थिती

रुग्णालय – ६७४९ विलगीकरण बेड – ४६३५८४ संशयित रुग्ण बेड – १२९१४१ कोरोना रुग्ण बेड – ३३४५३० ऑक्सिजन बेड – १०६११४ वेन्टिलेटर – १२८७३ आयसीयू बेड – ३२८५५

संबंधित बातम्या  

Delta Plus variant : महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू, आरोग्य मंत्री टोपेंची माहिती

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.