तर भाजपसोबतही युती करायला तयार आहोत, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान; कुणाला इशारा?

भाजपला कमी लेखू नका. भाजप भांडणं लावण्यात आणि भांडणं लावण्यात कोणत्याही थराला जाईल. त्यांचा हा फंडा आहे. आपण सरळसरळ जिंकत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांची एक पॉलिसी आहे.

तर भाजपसोबतही युती करायला तयार आहोत, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान; कुणाला इशारा?
prakash ambedkar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 1:08 PM

लातूर : प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. मात्र असं असलं तरी त्यांनी आपले राजकीय दरवाजे सर्वांसाठी मोकळे ठेवले आहेत. भाजप जर मनुस्मृतीचा त्याग करत असेल तर आम्ही भाजपशीही युती करायला तयार आहोत. भारतात कोणीही कुणाचा शत्रू नाही. सर्वच भारतीय आहेत. फार फार तर टोकाचे मतभेद असू शकतात. पण भाजपने आमची अट मान्य केली तर त्यांच्याशीही घरोबा होऊ शकतो, असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजप यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आजही सांगतो. कोणताही राजकीय पक्ष एकमेकांचा दुश्मन नाही. जे जे कार्यकर्ते, नेते, मतदार हे भारतीय आहेत. भारतीयांमध्ये दुश्मनी असू शकत नाही. टोकाचे मतभेद असू शकतात. आरएसएस आणि भाजपाशी आमचे टोकाचे मतभेद आहेत. आम्ही अनेकवेळा ते मांडलेही आहेत. भाजप आजही मनुस्मृती मानते. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. ते मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत काम करायला तयार असतील तर आम्ही त्यांच्या सोबत बसू शकतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे सुद्धा वाचा

प्रकाश आंबेडकर यांनी हे मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहेत. यामागे प्रकाश आंबेडकर यांचा कुणाला इशारा आहे? असा सवाल केला जात आहे.

मनुस्मृती सोडा

मनृस्मृती सोडायची म्हणजे काय करायचं? तर महाडला बाबासाहेबांनी जे केलं होतं, तेच मोहन भागवत यांनी नागपूरला करावं. मनुस्मृती हा धर्मग्रंथ नाही. ती हिंदू धर्मातील सामाजिक, राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा ग्रंथ आहे. त्यात भाजप, संघ बदल करणार असेल. तर त्याचं स्वागत करू, असं आंबेडकर म्हणाले.

त्यांनी बदलावं

तो बदल सरदार पटेलांनी जबरदस्तीने करून घेतला होता, तो संघ आणि भाजपने मनाने स्वीकारावा. ते बदलत असतील तर आमचा त्यांच्याशी कधीही राजकीय समझौता होऊ शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

इतिहास रिपीट केला

शरद पवार हे भाजपचे आहेत, असं विधान आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मी इतिहास रिपीट केला होता. आता बद्दल बोलत नाही. माझं विधान आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट कोणी घेत असेल तर मी काय करणार?, असा सवाल त्यांनी केला.

भाजपची एकच पॉलिसी भांडणं लावा

भाजपला कमी लेखू नका. भाजप भांडणं लावण्यात आणि भांडणं लावण्यात कोणत्याही थराला जाईल. त्यांचा हा फंडा आहे. आपण सरळसरळ जिंकत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांची एक पॉलिसी आहे. ती म्हणजे भांडणं लावा, असं सांगतानाच लोकशाही वाचवायची असेल, हुकूमशाही येण्यापासून थांबवायची असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.