आधी म्हणाले, संभाजीराजे पुढाकार घ्या, आता स्वत: प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात, मराठा मोर्चात सहभाग

छत्रपती संभाजीराजेंच्या आवाहनाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिसाद दिला आहे. उद्याच्या कोल्हापुरातील मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत.

आधी म्हणाले, संभाजीराजे पुढाकार घ्या, आता स्वत: प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात, मराठा मोर्चात सहभाग
खासदार संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 3:47 PM

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नेतृ्त्वात उद्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी मराठा मूक मोर्चा  (Maratha Muk Morcha Kolhapur) आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील हा पहिला मराठा मोर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीराजेंच्या आवाहनाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिसाद दिला आहे. उद्याच्या कोल्हापुरातील मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने ट्विट करुन, ही माहिती दिली आहे. (Prakash Ambedkar to attend Kolhapur Maratha Morcha with Sambhajiraje Chhatrapati first Maratha reservation agitation in Maharashtra tomorrow)

काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर उद्या आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.

वंचित आघाडीचं ट्विट 

संभाजीराजे-प्रकाश आंबेडकर यांची भेट 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याचाच भाग म्हणून संभाजीराजे यांनी 29 मे रोजी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यावेळी बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं.

प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा 

आताच्या परिस्थितीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्यामध्ये दोन मार्ग आहे. एक म्हणजे रिव्हूय पिटीशन आणि ती फेटाळल्यावर क्युरेटिव्ह हे दोन मार्ग आहेत. तेव्हा राज्य सत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. तो ताजेपणा आणायचा असेल, तर संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर तो येऊ शकतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

मराठा मूक मोर्चा 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात 16 जूनपासून कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी पहिलं आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर असल्याने कोल्हापुरात याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शाहू समाधी स्थळाचा परिसर भगवामय झाला आहे.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा, संभाजीराजे पुढाकार घ्या, प्रकाश आंबेडकरांनी पाठ थोपटली; मराठा आरक्षणाचा मार्ग सांगितला!

शाहू महाराज-बाबासाहेब एकत्र येऊ शकतात, मग प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे का नाही? : छत्रपती संभाजीराजे

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.