Video – Akola | प्रकाश आंबेडकरांनी घेतला देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार, सामान्य माणसाच्या भाषेत आक्षेपार्ह विधान

राजकारण जर करायचे असेल तर त्यांनी ती टीप लोकांसमोर जाहीर केली पाहिजे. फडणवीस यांनी ती टेप लोकांसमोर दिली असती तर पोलिसांनी नोटीस दिली नसती. पोलिसांनी प्रकरण दाबण्यासाठी नोटीस दिल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Video - Akola | प्रकाश आंबेडकरांनी घेतला देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार, सामान्य माणसाच्या भाषेत आक्षेपार्ह विधान
अकोला येथे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 2:43 PM

अकोला : पोलिसांच्या बदल्यांच्या अहवाल लीक प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदविला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे राजकारण म्हणजे गांडूचे राजकारण असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलीय. ते अकोल्यात बोलत होते. आंबेडकर म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांना मैदानी दिलेर समजत होतो. परंतु त्यांचा दिलेरपणा दिसला नाही आणि मैदानीपणाही दिसला नाही. त्यांनी जी टेप स्पीकरला दिली, सभागृहात दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेत म्हणायचे असेल तर गांडूचे राजकरण केले अशी टीका आंबेडकर यांनी केलीय. दिलेरपणाचे राजकारण जर करायचे असेल तर त्यांनी ती टीप लोकांसमोर जाहीर केली पाहिजे. फडणवीस यांनी ती टेप लोकांसमोर दिली असती तर पोलिसांनी नोटीस दिली नसती. पोलिसांनी प्रकरण दाबण्यासाठी नोटीस दिल्याचेही आंबेडकर म्हणाले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे (Deprived Bahujan Front) नेते आंबेडकर यांनी कॉंग्रेसच्या आत्मचिंतन बैठकीवर बोलणे टाळले आहे.

पाहा व्हिडीओ

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

मी असं समजत होतो की, देवेंद्र फडणवीस हे मैदानी खिलाडी आहेत. परंतु, त्यांचा दिलेरपणा दिसला नाही. त्यांचा मैदानीपणाही दिसला नाही. त्यांनी जी टेप सभापतींना दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेमध्ये म्हणायचं असेल, तर गांडूचं राजकारण केलं. दिलेरपणाचं राजकारण करायचं असेल तर ती टेप त्यांना लोकांसमोर जाहीर केली पाहिजे. त्यांनी लोकांसमोर जाहीर केली असती तर पोलिसांनी ही नोटीस दिली नसती. सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांनी नोटीस दिली आहे. जबाब कुठेही होओ. पण, मी आपल्यासमोर सामान्य माणसाची प्रतिक्रिया मांडलेली आहे, असा खरपूस समाचार प्रकाश आंबेडकर यांनी घेतला.

आंदोलन करून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न, माणिकराव ठाकरे यांची भाजपवर टीका

मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण केव्हापर्यंत, सुनील केदारांनी सांगितली तारीख

Photo – अकोल्यात ती आली, तिने जिंकले…, पण वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाले कसे ते पाहा

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....