Ramnath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर येणार, यापूर्वी ‘या’ राष्ट्रपती, पतंप्रधानांनी दिलेली भेट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर (Raigad) आज येत आहेत.

Ramnath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर येणार, यापूर्वी 'या' राष्ट्रपती, पतंप्रधानांनी दिलेली भेट
रायगडला राष्ट्रपतींची भेट
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 7:50 AM

रायगड: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर (Raigad) आज येत आहेत. या भेटीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद शिवप्रेमींच्या भावनेचा सन्मान करत रोप वेनं रायगडावर पोहोचणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापूर्वी ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती असताना रायगडावर आले होते. तर, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील स्वराज्याच्या राजधानीला भेट दिली होती. यावेळी खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं आहे.

राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी भेट दिलेला एकमेव किल्ला

स्वतंत्र भारताच्या इतिहासात राष्ट्रपती व पंतप्रधान अशा दोन्ही पदांवरील व्यक्तींनी भेट दिलेला रायगड हा एकमेव असा किल्ला आहे. या आधी 1980 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300 व्या पुण्यतिथी दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी दुर्गराज रायगडवर आल्या होत्या. 1985 साली राजसदरेवर उभारण्यात आलेल्या मेघडंबरीचे अनावरण करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर आले होते.

3 एप्रिल 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले 2 रुपये किंमतीचे नाणे भारत सरकारच्यावतीने जारी करण्यात आले होते.

35 वर्षानंतर राष्ट्रपतींची रायगड भेट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला येत आहेत. यापूर्वी भारताचे राष्ट्रपती 1985 मध्ये रायगडावर आलेले होते. 1985 साली राजसदरेवर उभारण्यात आलेल्या मेघडंबरीचे अनावरण करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग आले होते.

राष्ट्रपती रोप-वेनं रायगडावर येणार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यावेळी हेलिपॅड होळीच्या माळावर तयार करण्याचं निश्चित झाल्यानंतर शिवप्रेमींनी विरोध केला होता. शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करत राष्ट्रपतींनी रोप-वेनं रायगडावर येण्याचा निर्णय घेतला.

माणगाव ते पाचाड रस्ता पर्यटकांना बंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडला भेट देण्यासाठी येणार असल्यानं पोलीस दलानं सुरक्षेसाठी कंबर कसलीय. पोलीस दलाकडून सुरुक्षेच्या दृष्टीनं पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. पर्यटकांना रायगडावर येण्यास 3 ते 7 डिसेंबर या काळात प्रवेश बंदी करण्यात आलीय. तर, रायगड पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे. माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेत नातेगाव ते पाचड मार्ग देखील सुरक्षेसाठी पर्यटकांना बंद करण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड येथील समाधी स्थळाजवळील काही अतंरावरील हेलिपॅडवर राष्ट्रपतींचं आगमन होईल. तिथून ते मोटारीनं हिरकणीवाडीत पोहोचतील. तिथून ते रोपवे 12.15 वाजता रायगडावर पोहोचतील. गडावर ते सुरुवातीला जगदीश्वारचं दर्शनं घेतील. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करतील.

नातेखिंडीपासून नाकाबंदी, आधाराकार्डशिवाय नो एन्ट्री

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. रायगडाच्या 20 किमी अंतरावर असलेल्या नातेखिंडीपासून नाकाबंदी करण्यात आली आहे. तर, रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये गावकऱ्यांना आधार कार्डशिवाय प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून नातेवाईकांना बोलवू नये, अशा सूचना देण्यात आल्यात. तर, एसआयटीसह पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात.

इतर बातम्या:

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा, वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींची भूमिका काय?

रायगडावर पर्यटकांना 7 डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी, राष्ट्रपतींच्या भेटीनिमित्त प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु

President Ramnath Kovind visit Raigad Fort today Police and District administration complete all security measures know President and Prim Minister visit in past

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.