Bhandara Fighting : जास्त भाजी न दिल्याच्या कारणातून कैद्यांमध्ये हाणामारी, भंडारा जिल्हा कारागृहातील प्रकार
कैदी देवेंद्र राउत सकाळचे आहार वाटप करत असताना बंदी क्र. 4 शेख रफीक शेख रहमानने देवेंद्र यांच्याकडे जास्त भाजी मागितली. मात्र देवेंद्र यांनी नकार दिल्याने आरोपीचे त्यांच्यासोबत भांडण झाले. यावेळी आरोपीच्या मदतीला इतर 3 कैदी आले आणि चौघांनी मिळून राऊत यांना मारहाण केली. यात राऊत हे जखमी झाले.
भंडारा : जेवण करताना जास्त भाजी मागूनही न दिल्याने संतापलेल्या कैद्यां (Prisoners)मध्ये आपापसात हाणामारी (Fighting) झाल्याच्या प्रकार भंडारा जिल्हा कारागृहात घडला आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी 4 कैद्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. शेख रफीक शेख रहमान (बंदी क्र. 4), महेश आगासे (बंदी क्र. 3), मोहम्मद अफरोज उर्फ सोहेल यूसुफ शेख (बंदी क्. 45) आणि राहुल पडोळे (बंदी क्र. 44) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. भंडारा पोलिसांनी हाणामारी प्रकरणात कलम 324 व 34 भादवीनुसार गुन्हा नोंद केला आहे. (Prisoners clash over vegetables at Bhandara District Jail, one injured)
जास्त भाजी दिली नाही म्हणून मारहाण
देवेंद्र राउत हे स्वतः भंडारा कारागृहतील कैदी असून त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे त्यांना बरेक जबाबदार म्हणून काम दिले आहे. कैदी देवेंद्र राउत सकाळचे आहार वाटप करत असताना बंदी क्र. 4 शेख रफीक शेख रहमानने देवेंद्र यांच्याकडे जास्त भाजी मागितली. मात्र देवेंद्र यांनी नकार दिल्याने आरोपीचे त्यांच्यासोबत भांडण झाले. यावेळी आरोपीच्या मदतीला इतर 3 कैदी आले आणि चौघांनी मिळून राऊत यांना मारहाण केली. यात राऊत हे जखमी झाले. सदर घटनेची माहिती मिळतात कारागृह पोलिसांनी कैदी देवेंद्र राऊत यांची मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून त्यांची सुटका केली. लागलीच याची माहिती भंडारा शहर पोलिसांना देण्यात आली. कारागृह पोलिसांच्या तक्रारीवरुन मारहाण करण्याऱ्या 4 कैद्यांविरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास भंडारा पोलिस करीत आहेत. (Prisoners clash over vegetables at Bhandara District Jail, one injured)