Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी वकील विद्या राजपूत खून खटल्याची संशोधनासाठी निवड, राष्ट्रीय संंशोधन फौजदारी न्याय विभागाकडून दखल

जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत यांचा खून खटला, सदर गुन्ह्याचा तपास व निकाल यावर राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभाग मुंबई संशोधन करणार आहे. (Public Prosecutor Vidya Rajput murder case Selection for research)

सरकारी वकील विद्या राजपूत खून खटल्याची संशोधनासाठी निवड, राष्ट्रीय संंशोधन फौजदारी न्याय विभागाकडून दखल
डॉ. प्रवीण मुंढे, (पोलीस अधीक्षक जळगाव)
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 8:40 AM

जळगाव :  जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत (वय 35, रा. सुपारीबाग, जामनेर) यांचा खून खटला, सदर गुन्ह्याचा तपास व निकाल यावर राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभाग मुंबई संशोधन करणार आहे. हे संशोधन एलएलएमच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी यावर पीएचडी करणार आहेत. जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (Public Prosecutor Vidya Rajput murder case Selection for research)

रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत काय होता खून खटला…?

सरकारी वकील रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत यांचा १३ जानेवारी रोजी उशीने तोंड व गळा दाबून खून झाला होता. या गुन्ह्याचा खून खटल्याचा निकाल १३ मे २०२१ रोजी जळगाव जिल्हा न्यायालयाने दिला. यात मयत ऍड. रेखा राजपूत यांचे पती डॉ. भरत लालसिंग पाटील याला कलम ३०२ अन्वये जन्मठेप तर व सासरे लालसिंग श्रीपत पाटील (७४, रा. बेलखेडे, ता. भुसावळ) याला कलम २०१ अन्वये न्यायालयाने चार वर्षे कैदेची शिक्षा सुनावली आहे.

ठोस पुरावे नसताना गुन्ह्याचा यशस्वी तपास

कुठलाही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतांना हा गुन्हा पोलिसांसाठी आव्हान होता. तसेच मयत सरकारी वकील असल्याने या गुन्ह्याची राज्यभरात चर्चा झाली होती. यात पोलीस, डॉक्टर व वकील या तीन्ही यंत्रणांनी यात झोकून काम केले.आणि संशयितांना शिक्षा झाली.

विद्यार्थी पीएचडी करणार

जिल्हा न्यायालयाकडून हा निकाल संकेतस्थळावर अपलोड झाल्यानंतर या खटला व निकाल, गुन्हा व त्याचा तपास याची मुंबई येथील राष्ट्रीय फौजदारी येथील न्याय विभागाने संशोधनासाठी निवड केली. त्यावर राष्ट्रीय फौजदारी न्याय विभागाच्या विद्यापीठाअंतर्गत एल.एल.एमच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणारे विद्यार्थी पीएचडी करणार आहेत.

पोलिस अधिक्षक काय म्हणाले?

त्याबाबत मुंबई येथील राष्ट्रीय फौजदारी येथील न्याय विभागाने कळविले आहे. जिल्हा पोलीस दलासह या खटल्या, गुन्ह्याच्या तपासात महत्वपूर्ण कामगिरी करणार्‍यांसाठी ही अभिमानाची बाब आहे, असे यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे बोलताना म्हणाले.

(Public Prosecutor Vidya Rajput murder case Selection for research)

हे ही वाचा :

मुसळधार पावसाने गोदामातील 30 हजार साखरेची पोती भिजली, कोट्यवधी रुपयांचं नुकसान

VIDEO | रॉयल एनफिल्डच्या शोरुमचे शटर वाकवून आत शिरला, बदलापुरात धाडसी चोरी

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.