Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगळसूत्र आमचं आणि घरोबा दुसऱ्याशी, संजय राऊत यांच्यावर या नेत्याने केली सडकून टीका

महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय.

मंगळसूत्र आमचं आणि घरोबा दुसऱ्याशी, संजय राऊत यांच्यावर या नेत्याने केली सडकून टीका
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 3:27 PM

अहमदनगर : आता महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) तुमची काय परिस्थिती आहे. तुम्हाला ते नांदवायला तयार नाही. तुमच्या वज्रमुठेला आत्ताच तडे गेले आहेत. उद्या तुम्हाला ते सोडणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी संजय राऊत यांना दिला. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं. संजय राऊत यांनी विखे पाटलांच्या वक्तव्यावर टीका केली होती.

तुम्हाला त्याचा विसर पडलाय

महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. तुम्हीच भाजपाचे मंगळसूत्र घातले होते. तुम्हाला त्याचा विसर पडलाय. लग्न करून मंगळसूत्र आमचं घालायचं आणि घरोबा दुसऱ्याबरोबर करायचा हे तुम्ही केलं, असा घणाघात विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केला.

हे सुद्धा वाचा

या सरकारची चिंता सोडून द्या

संजय राऊत यांच्या भंपक विधानाला उत्तर द्यायची गरज नाही. एकनाथ शिंदे यांच्या रुपाने कार्यक्षम मुख्यमंत्री लाभले आहेत. आत्ता आणि २०२४ लाही सरकार आमचंच असेल. या सरकारला पंतप्रधान मोदी यांचे पाठबळ आहे. या सरकारची चिंता सोडून द्या.

संजय राऊत यांनी अन्य व्यवसाय शोधावा. त्यांचे दिवस आता भरत चाललेत, असा टोला विखे पाटील यांनी लगावला. राऊत यांच्या सरकारचं डेथ वॉरंट वक्तव्यावरून विखे पाटील यांनी चांगलाच पलटवार केलाय.

संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय

देवेंद्र फडणवीस हे आमच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं गेलं. त्यावर संजय राऊत म्हणाले, तुमच्या मनातले मुख्यमंत्री असतील तर बसवा. तुम्हाला कुणी अडवलं, असंही संजय राऊत यांनी म्हंटल होतं. त्यावर बोलतना विखे पाटील म्हणाले, सगळे लोकं म्हणतात की, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्याचं हे उत्तम उदाहरण असल्याचा टोला विखे पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.

'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.