रायगडावर पर्यटकांना 7 डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी, राष्ट्रपतींच्या भेटीनिमित्त प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर (Raigad) 7 तारखेला येत आहेत.
रायगड: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर (Raigad) 7 तारखेला येत आहेत. या भेटीची पूर्वतयारी गडावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खासदार संभाजी छत्रपती ( Sambhaji Chhatrapati) यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं. रायगडावर राष्ट्रपती येणार असल्यानं सुरक्षेच्या कारणामुळे 3 ते 7 डिसेंबरपर्यंत पर्यटकांना किल्ल्यावर येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. खासदार संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी रायगडावरील तयारीचा आढावा देखील घेतला आहे.
माणगाव ते पाचाड रस्ता पर्यटकांना बंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडला भेट देण्यासाठी येणार असल्यानं पोलीस दलानं सुरक्षेसाठी कंबर कसलीय. पोलीस दलाकडून सुरुक्षेच्या दृष्टीनं पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. पर्यटकांना रायगडावर येण्यास 3 ते 7 डिसेंबर या काळात प्रवेश बंदी करण्यात आलीय. तर, रायगड पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे. माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेत नातेगाव ते पाचड मार्ग देखील सुरक्षेसाठी पर्यटकांना बंद करण्यात आला आहे.
संयोगीताराजे छत्रपती तयारीमध्ये सहभागी
राष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर रायगड विकास प्राधिकरण, रायगड जिल्हा प्रशासन, भारतीय पुरातत्व खाते ,अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती अहोरात्र झटत आहेत. या सर्वांच्या सोबत खासदार संभाजी छत्रपती यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती याही सहभागी झाल्या आहेत. किल्ले रायगडावर चालू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी त्या स्वतः गडावर पोहोचल्या. सूक्ष्म आणि उत्कृष्ट नियोजनाद्वारे हा सोहळा अधिकच सुंदर कसा होईल यासाठी त्या प्रयत्न करताहेत.
राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.@rashtrapatibhvn
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 25, 2021
राष्ट्रपतींची भेट गौरवास्पद
खासदार संभाजी छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे. राष्ट्रपती 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणं ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले आहेत.
इतर बातम्या:
राज्यात ‘या’ व्हिडीओची चर्चा, रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधी परिसराचा Video व्हायरल