Taliye Landslide : महाडमध्ये माळीणची पुनरावृत्ती, काल दुपारी दरड कोसळली, आतापर्यंत काय काय घडलं?

गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडमधील तळीये गावात दरड (Raigad Talai Landslide) कोसळून अनेक कुटुंब मलाब्या खाली अडकून मृत्यूमुखी पडल्याची दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

Taliye Landslide : महाडमध्ये माळीणची पुनरावृत्ती, काल दुपारी दरड कोसळली, आतापर्यंत काय काय घडलं?
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 2:56 PM

मुंबई : राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडमधील तळीये गावात दरड (Raigad Taliye Landslide) कोसळून अनेक कुटुंब मलाब्या खाली अडकून मृत्यूमुखी पडल्याची दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

काल अर्थात 22 जुलैच्या दुपारी 4 वाजता ही दुर्घटना घडली आहे. यानंतर गावातील संपर्काची सगळीच साधने खंडित झाल्याने मदतीची मागणी करण्यासाठीही स्थानिकांकडे कोणता पर्याय उपलब्ध नव्हता.

आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. तुफान पावसामुळे काल, गुरुवार (22 जुलै) संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास या गावावर दरड कोसळली आहे. गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली.

दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी आतापर्यंत मातीच्या या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले आहेत. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, या ढिगाऱ्याखाली आणखी 40 ते 45 मृतदेह अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

विरोधी पक्षनेते घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मिळताच महाडच्या दौऱ्यावर असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तातडीने तळीये गावात पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांची माहिती घेतली. काल दुपारी 4 वाजता ही घटना घडली. त्यानंतर स्थानिकांनी मृतदेह काढण्यास सुरुवात केली. या संदर्भात स्वतः प्रवीण दरेकर आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली होती. मात्र या गावात जाणारे रस्ते देखील वाहून गेलेयत किंवा दरड कोसळून दंड असल्याचे साग्न्यात आले. यानंतरही मजल-दरमजल करत प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन या गावात पोहचले आहेत.

नेटवर्क नसल्याने कुणाशीही संपर्क होऊ शकला नाही. पाऊस आणि पूर यामुळे या गावात पोहोचणं शक्य नव्हतं, असं शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं.

मदत कार्याला सुरुवात

दरम्यान, काल दुपारी 4 वाजता ही घटना घडली. त्यानंतर स्थानिकांनी मृतदेह काढण्यास सुरुवात केली. मात्र, एनडीआरएफ किंवा प्रशासनाच्या मदतीशिवाय हे मदत कार्य सुरु ठेवणे कठीण झालेले होते. परंतु, प्रशासनाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. आज (23 जुलै) सकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून, आता त्यांनी मदत कार्य सुरू केलं आहे. त्याच बरोबर स्थानिक अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मदत कार्याला उशीर का झाला?

ही घटना काल संध्याकाळी 4 च्या सुमारासची आहे. मात्र त्यावेळी दमदार पाऊस कोसळत होतो. त्यामुळे मदत कार्यात अडथळा येत होता. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हेलिकॉप्टर ऑपरेशन शक्य नव्हतं. रोडही बंद होते. आता पावसाने उसंत घेतली आहे. आता एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

(Raigad Talai Landslide Maharashtra land slide incident happened yesterday know the updates till now)

हेही वाचा :

Raigad Talai Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, तळई गावात भीषण दुर्घटना

Raigad Talai Landslide: रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती, 19 तासानंतरही मदत नाही, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दरेकर संतापले

 Live Raigad Satara landslide live : रायगड आणि साताऱ्यात भीषण दुर्घटना, दरडी कोसळून 50 पेक्षा अधिक मृत्यू

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.