AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोपे म्हणतात, सुजय विखेंचं एका दृष्टीनं योग्य मग फडणवीस, दरेकरांचं काय चुकलं?

भाजपचे खासदार सुजय विखे यांनी प्रायव्हेट जेट करुन दिल्लीहून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा अहमदनगरमध्ये आणल्याच्या वृत्तानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

टोपे म्हणतात, सुजय विखेंचं एका दृष्टीनं योग्य मग फडणवीस, दरेकरांचं काय चुकलं?
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 8:56 PM

औरंगाबाद : भाजपचे खासदार सुजय विखे यांनी प्रायव्हेट जेट करुन दिल्लीहून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा अहमदनगरमध्ये आणल्याच्या वृत्तानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुजय विखे यांच्याविरोधात याचिकाही दाखल झालीय. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सुजय विखेंनी दिल्लीतून रेमडेसिवीर इंजक्शन आणणं राज्यासाठी एका दृष्टीने योग्य असल्याचं विधान केलंय. त्यानंतर सुजय विखेंचं योग्य असेल तर मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी ब्रुक फार्मा कंपनीकडून रेमडेसिवीर घेणं चुकीचं कसं? असा प्रश्न विचारला जात आहे (Rajesh Tope justify import of Remdesivir injection from Delhi to Ahmednagar).

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “राज्याची रेमडेसिवीरची मागणी 60 हजारांपेक्षा अधिक आहे. केंद्रानं आमची अजून गरज भागवावी. आता रेमडेसिवीरचे 20 ते 25 हजारच डोस मिळत आहेत. सुजय विखे पाटील प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, त्यांनी योग्य रूग्णांना रेमडीसीवीर द्यावेत. राज्याच्या दृष्टीनं सुजय विखेंनी दिल्लीतून रेमडेसिवीर महाराष्ट्रात आणून योग्यच केलं.”

“महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकारने मोफत कोरोना लसीकरणाचा निर्णय घेतलाय. गरिब लोकांना कोरोना लस मोफत मिळायला हवी. श्रीमंत लोकांना लस मोफत देण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोललो आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांनी आम्ही लोकांना लसीकरण देऊ असा प्रस्ताव दिलाय. 4 हजार कोटी रूपये लस खरेदीसाठी लागतील. लसीच्या किमतीबाबत एक देश, एक किंमत असायला हवी. लसीच्या किमती कमी व्हायल हव्यात,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळात एकजूट असते. मनमोकळ्या पद्धतीनं अपेक्षा सांगितल्या जातात. चांगल्या सूचना असल्यास स्वीकारल्या जातात, असंही टोपेंनी नमूद केलं.

सुजय विखे पाटलांची गुपचूप मोहीम, दिल्लीवरुन विशेष विमानाने इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये

दरम्यान, कोरोना संकटात इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना अहमदनगरचे भाजप खासदार डॉ सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी आयडिया लढवली. सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा (Remdesivir injection) मोठा कोटा आणला. सुजय विखे यांनी खासगी विमान करुन 300 रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली.

रेमडेसिवीरचा साठा अहमदनगरमध्ये आणल्यानंतर सुजय विखे काय म्हणाले?

माझ्यापरीने जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहोत, असं सुजय विखे म्हणाले. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही, असं सुजय विखे म्हणाले.

माझ्या मनात पाप नाही

मी गेलो फॅक्टरीत, तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला, मदत घेतली आणि ही औषधं घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. खासगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असं सुजय विखेंनी सांगितलं.

फडणवीस, दरेकर यांच्याकडून एफडीए आयुक्तांच्या परवानगीनं 60 हजार रेमडिसिव्हीरचा साठा

राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 60 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते.

हेही वाचा :

‘आमचे रुग्ण मरु द्यायचे का?’ अहमदनगरमध्ये रेमडेसिवीरची मागणी आणि पुरवठ्यात मोठं अंतर, नातेवाईकांचा संताप

आमदार असावा तर असा! रेमडेसिव्हीरसाठी 20 लाखाचा निधी जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द!

आम्ही ह्या पापी समाजाचे घटक आहोत, रुग्णांसाठी काहीच करु शकत नसल्याची लाज वाटते, खंडपीठाची टिप्पणी

व्हिडीओ पाहा :

Rajesh Tope justify import of Remdesivir injection from Delhi to Ahmednagar

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...