पायातलं हाता घ्या, राजू शेट्टींची 23 ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चाची हाक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी हा मोर्चा निघणार आहे. (Raju Shetti calls morcha against maha vikas aghadi)

पायातलं हाता घ्या, राजू शेट्टींची 23 ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चाची हाक
राजू शेट्टी,स्वाभिमानी शेतकरी संघटना
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 10:44 AM

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी हा मोर्चा निघणार आहे. शेतकऱ्यांनी पायातलं हातात घ्यावं आणि मोर्चात सामिल व्हावं, असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Raju Shetti calls morcha against maha vikas aghadi)

राजू शेट्टी यांनी 23 ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चाची हाक दिली होती. त्यावर राजीव गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेट्टींना थोडं थांबण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, शेट्टी हे मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. सरकार वेळकाढूपणाचं धोरण अवलंबत आहे. शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा मोर्चा निघणारच. आता थांबणं शक्य नाही, असं शेट्टी यांनी सांगितलं. आघाडी सरकारकडून फसवणूक होत आहे असं वाटत असेल तर शेतकऱ्यांनो पायातलं हातात घ्या आणि या मोर्चात सामील व्हा, असं आवाहनही शेट्टी यांनी बळीराजाला केलं आहे.

फक्त आश्वासनं देतात

संपूर्ण पीक कर्जमाफीसह पूर पट्ट्यातील घरांचं विना अट संपूर्ण पुनर्वसन करण्याची प्रमुख मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. त्यामुळे 23 ऑगस्टपर्यंत सरकारनं नुकसान भरपाईचं धोरण ठरवावं, अन्यथा पुढचा निर्णय मोर्चावेळी जाहीर करु, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त आश्वासनं देऊन गेले. ज्यांना शेती कळत नाही त्यांनी मदत केली. मात्र, ज्यांना ती कळते त्यांनी मदत द्यायला टाळाटाळ केली, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता.

मी मदत करणारा मुख्यमंत्री- उद्धव ठाकरे

महापुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात येत पूरस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी मी यापूर्वीही सांगितलं आहे की मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. पण सगळ्या पूरग्रस्तांना नक्की मदत करेन. आपण पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसल्याचं म्हणत मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

सरकारकडून मदतीची घोषणा

दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. त्यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (Raju Shetti calls morcha against maha vikas aghadi)

संबंधित बातम्या:

अकोटच्या 18 वर्षीय अपंग मुलाचा सर्पदंशाने मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर, पंचक्रोशीत हळहळ

भाजप आमदाराकडून पहिल्यांदाच MIM च्या खासदाराचं कौतुक, महाराष्ट्रात चर्चेचा विषय

उच्च न्यायालयाने सूचित केल्यानंतर तरी राज्यपाल 12 आमदारांची नियुक्ती करतील, राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार टोला

(Raju Shetti calls morcha against maha vikas aghadi)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.